You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : मीन राशी आणि मीन लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने मीन राशी आणि मीन लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या तिसऱ्या स्थानी आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण नवम स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

मीन राशी आणि मीन
ज्यांची राशी मीन आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे १२ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

राहू आपल्या पत्रिकेत जिथे २ लिहिला आहे ते स्थान पराक्रमाचे आहे आणि ह्या स्थानात राहू चे भ्रमण पुढील १८ महिन्यात आपल्याला पराक्रम दाखविल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या कडे असलेल्या धैर्याचा उपयोग करून घ्याल.

बऱ्याच दिवसात जी डेरिंग करता आली नसल्यामुळे जी जी कामे रखडली असतील ती ह्या पुढील १८ महिन्यात पूर्ण करण्यास नक्की हाती घ्याल.

हे स्थान आपल्या भावंडांचे सुद्धा आहे इथे मात्र तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही असले काही विषय असतील तर त्यात विरोध तंटे होऊ शकतील. शांत राहावे हा सल्ला.

ह्या १८ महिन्यात आपल्याला काही इतर शहरांतून जावे लागेल जर आपण एक व्यापारी असाल. आणि ते तुमच्या डेव्हलोपमेंट साठी हे उत्तम असेल.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी हि भाग्य स्थानावर जिथे ८ नंबर आहे तिथे वृच्चीक राशीवर येत आहे आणि तेथे केतू सुद्धा भाग्यातुन भ्रमण करणार आहे ह्याचा प्रभाव तुम्ही पुढील १८ महिन्यात भाग्योदय करण्यासाठी उत्सुक असाल. म्हणजे असे कराल कि जे सुरु आहेत त्यात काहीतरी वाढविण्याचा प्रयत्न कराल किंवा दुसरे काहीतरी करण्याचा प्रयत्न जरूर कराल.

थोडक्यात आधीच्या व्यवस्था काही वेगळ्या करण्याच्या पाहाल. पण हे करताना कुणाशी वाद विवाद होणार नाहीत ना ह्याकडे लक्ष द्या.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि लाभ स्थानावर येत आहे जिथे शनीची मकर राशी आहे. जिथून व्यक्ती आपल्या इच्छा प्रकट करतो. त्यामुळे पुढील १८ महिन्यात तुमच्या इच्छेला उधाण येईल. खूप मोठ्या इच्छा धराल काही नसताना. आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्न कराल.

काही लाभ तुमचे उशिरा सुद्धा होतील काळजी घ्या तुमच्या वेळापत्रकाची नाहीतर त्रास होण्याचा संभव असेल. कारण मीन लग्न आणि मीन राशी हि गुरुची असल्यामुळे राहू कोणत्याही स्थानी आला तर आधी तुम्हाला पहिले ८ महिने त्रास देणार नक्की नंतर तुम्ही कणखर होऊन काम कराल.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी हि जिथे ६ नंबर ची राशी कन्या आहे त्यावर येत आहे. आपल्या आवडत्या राशीवर राहू ची दृष्टी खूप चांगले परिणाम देते.

मीन राशी आणि मीन लग्न वाल्याना अशा वेळी आपल्या वैवाहिक जीवनातल्या आत्तापर्यंत वाट पाहत असलेल्या कामात गती मिळेल आणि तुम्ही ते अचिव्ह कराल.

उदाहरणार्थ — जर वैवाहिक जीवनातील एखादी काळजी असेल आत्तापर्यंत जर घर घेण्याची तर ते जिद्द करून पूर्ण कराल. किंवा अशा इतर गोष्टी कि त्यात तुम्हाला डेरिंग करून पूर्ण करता येतील.

पण वैवाहिक जीवनात हे करताना स्वतःचे किंवा इतरांचे रिलेशन सांभाळून करावे लागेल कारण हाच काळ असा आहे कि काही संबंध इथे तुमचे तुटण्याचे असतील म्हणजे एखादे नाते वगैरे त्यापासून तुम्ही दूर व्हाल.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू पत्रिकेत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल पुढील १८ महिन्यात तर राहू च्या ७ व्या दृष्ठीपर्यंत ची सर्व फळे सारखीच असतील.

आणि केतूच्या ७ व्या दृष्टीचे फळ सुद्धा सारखेच समजावे.
फक्त भाग्योदयाच्या सर्व व्यवस्था केतू तुमच्या समोर अचानक आणेल आणि तुम्ही कन्फयुज्ड होणार नाही ना ह्याकडे लक्ष द्या.

केतूची ५ वी दृष्टी हि तुमच्या लग्न स्थानावर येत आहे. म्हणजे जिथे १२ नंबर ची मीन राशी लिहिली आहे. मीन राशीवर केतू ची दृष्टी म्हणजे तुम्ही तुमच्या स्किल ला प्रेसेंट करण्यासाठी धावाल. आणि हि धावपळ तुम्हाला थकवा आणेल. त्यामुळे काही तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाही ना ह्याकडे लक्ष द्या. आधीपासून चे जर आजार असतील तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही मानसिक कष्ट केतू मुळे होऊ शकतात.

केतू ची ९ वी दृष्टी

केतू ची ९ वी दृष्टी ५ व्या स्थानावर येत आहे जिथे चंद्राची कर्क राशी आहे त्यामुळे ज्यांना संतती आहे त्यांना आपल्या बच्चू साठी फार धावपळ दिसेल पुढील १८ महिन्यात त्यांना जास्त वेळ द्यावा लागेल.

ज्या मीन लग्न आणि राशी च्या स्त्रिया आहेत त्यांना कन्सिव्ह आणि त्यापुढील प्रोसेस ला सुद्धा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यात तुम्ही सेफ असाल.
केतू ची हि दृष्टी मीन लग्न आणि राशीवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा खास नाही मेहनत करावी लागेल कारण तुम्ही कॉन्फयुज्ड होण्याच्या अवस्थेत असाल.

उपाय

राहू आणि केतू च्या ह्या भ्रमणाचे मीन राशी आणि मीन लग्नाच्या व्यक्तीनी खालील उपाय करून घ्यावेत पुढील १८ महिने.

  • प्रत्येक गुरुवारी किंवा रोज केसर आणि गंगाजल किंवा चंदनाचा टिळा कपाळावर आणि नाभीवर लावा.
  • एखाद्या गुरु ची सेवा किंवा वाचन किंवा मंत्र जाप तुम्हाला चांगले परिणाम देतील खास गुरुवारी केलेले.
  • शुक्रवारी काही सफेद वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ दान करत जा.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व मीन राशीच्या आणि मीन लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply