You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ कन्या राशी / कन्या लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ कन्या राशी / कन्या लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR KANYA RASHI / KANYA LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे कन्या राशी आणि कन्या लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ कन्या राशी / कन्या लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ कन्या राशी / कन्या लग्न

कन्या राशी आणि कन्या लग्न म्हणजे आपली राशी जरी कन्या नसली पण लग्न कन्या असेल तर किंवा आपले लग्न कन्या नसले पण राशी कन्या असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

कन्या राशि अणि कन्या लग्नाच्या पत्रिकेत राहु अष्टम स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू द्वितीय स्थानी तुला राशीत असेल अष्टम आणि दुसऱ्या – कुटुंब / धन स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू अष्टमात आणि केतू द्वितीयात १८ महिने आहे ह्याचा परिणाम पंचमेश शनी आहे म्हणून शनी जेव्हा कुंभ राशीत असेल तेव्हा जास्त मेहनत करावी लागेल. काही विद्यार्थी हे रेगुलर शिक्षण सोडून नवीन काहीतरी उद्योगाचे शिक्षण घेण्यास उत्सुक असतील.
करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना अष्टमात येणारा राहू पैसा देत आहे. व्यवसाय नोकरी विषयक चांगले अनुभव येतील.

द्वितीयात केतूचे भ्रमण कन्या राशी लग्न च्या जातकांना कुटुंबात एखाद्या आजारपणाबद्दल पैसा खर्च करावा लागेल असे दिसते किंवा एखादी घरातील व्यक्ती किंवा स्वतः कुटुंबापासून लांब दिसेल

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा कन्या राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात कुठेही मोठी गुंतवणूक करू नये वडिलांची काळजी घ्यावी जर वय आणि काही आधीच त्रास असेल तर. अगोदर च्या केलेल्या गुंतवणुकी तोडण्याचा हा काळ सांगता येईल. अचानक अपघात पासून सावधान राहावे.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कन्या राशी किंवा कन्या लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. हा काळ भाग्यापासून किंवा कुटुंबापासून कष्ठाचा काळ असू शकेल. घरातील स्त्रियांची काळजी घेण्याची हि वेळ समजावी. काही जणांना ह्यात अपॉर्च्युनिटी मिळेल पण त्याचा फायदा करता येणार नाही. प्रयत्न पूर्ण करावा. आणि आलेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कन्या राशी किंवा कन्या लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. हा कालावधी स्वतःला आरोग्य आणि अपघातापासून फार जपावे लागेल. पैशाचे मोठे व्यववहर होतील पण जरा जपून करावेत.
  • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे कन्या राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे कुटुंबासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. करिअर मध्ये प्रमोशन होण्याचे संकेत आहेत. पण रेगुलर जे काम असेल ते हातातून जाईल असे दिसते.
  • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. ह्या कालावधीत पैशाचे व्यवहार करू शकाल. संतती साठी प्रयत्न इथे करायला हरकत नाही जर डॉक्टर ची मोठी ट्रीटमेंट करत असाल तर. पैसा मिळेल. प्रॉपर्टी चे निर्णय इथं होतील.
  • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे बऱ्याच कन्या राशी किंवा लग्न वाल्याना अचानक संपत्ती मिळण्याचे किंवा वारसा हक्काचे निर्णय होताना घटना दिसेल. आधी कोणते ऑपरेशन रखडलेले असेल तर ते होण्यासारखे असेल. हाती पैसा येत आहे. व्यवस्थित हाताळणे.

उपाय —कन्या लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक बुधवारी गणेशाला दुर्वा वाहून गणेश अथर्वशीर्ष वाचावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply