You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : धनु राशी / धनु लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ धनु राशी / धनु लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ धनु राशी धनु लग्न

वरील कुंडली हि धनु राशीची चंद्र कुंडली आहे आणि धनु राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली धनु राशी किंवा लग्न कुंडली धनु असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

धनु राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा तृतीय / तिसऱ्या स्थानी येत आहे. हे स्थान आपल्या पराक्रमाचे आणि कॉम्युनिकेशन चे आहे धावपळीचे सुद्धा आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या तृतीय स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या प्रथम स्थानी आहे. जेव्हा प्रथम स्थानाचा मालक गुरु तिसऱ्या स्थानातून भ्रमण करत असेल तेव्हा ती धनु राशी किंवा धनु लग्नाची व्यक्ती स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी खूप धावपळ करेल. एकतर गुरु च्या दोन्ही गुणधर्माने ती खूप बिझी असेल. एकतर आपल्याकडे असले स्किल आणि संततीसाठीची धावपळ तुम्ही कराल. एखादी पारिवारिक धावपळ सुद्धा असेल हि वेळ खूप बिझी दिसेल आपल्यासाठी.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या चतुर्थ स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा मागील तिसऱ्या स्थानी भ्रमण करणार आहे म्हणून १४४ दिवसात आपल्याला ह्या दिवसात स्वतःच्या सुखासाठी किंवा मातृसुखासाठी ची धावपळ दिसेल. नवीन घर खरेदी घेण्याचा विचार करत असाल तर थांबावे किंवा एखादी जुनी प्रॉपर्टी विकत असाल तर ती आधी विकून नंतर नवीन घेता येईल. नवीन घर जागा घेताना कष्ट दिसतील.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान पत्रिकेतील भाग्य स्थान आहे. बऱ्याच प्रमाणात भाग्योदयाच्या नवीन संधी चालून येतील. नवीन बदल करून काही तरी पॉसिटीव्ह करण्याचा प्रयत्न नक्की कराल. नशीब साथ देईल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान सप्तम स्थान वैवाहिक सुखाचे आहे जर कुणाचे रखडलेले विवाह असतील तर इथे योग चांगला असेल. आधीच्या वैवाहिक अडचणी दूर होतील.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या पत्रिकेतील लाभ आणि इच्छापूर्तीचे आहे . तसेच ते मित्र परिवाराचे मोठ्या भावांचे आहे. मित्रांकडून किंवा मोठ्या भावंडांकडून सहकार्य घ्यावे किंवा मिळेल आणि आपली इच्छा पूर्ण होईल.

काळजीचे काही मुद्दे

धनु लग्न आणि धनु राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.

गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या कर्म स्थानाचे आहे. म्हणून करिअर बद्दल विशेष कार्य आपल्याला थोड़ी त्रासदायक ठरतील. कार्यक्षेत्रात बदल होण्याचा संभव अणि त्रास नाकारता येत नाही.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या धन स्थानी येत आहे म्हणून ह्या काळात कुटुंबासाठी पैसा खर्च होण्याची चिन्हे जास्त आहेत. कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत चांगले परिणाम दिसत नाहीत सावधानता बाळगावी लागेल.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान अष्टम स्थान आहे . गुरूचा सपोर्ट ह्या स्थानावर नसताना अति सावधानता बाळगावी लागेल. काही प्रमाणात आरोग्यासाठी धावपळ होऊ शकेल. पैसा त्यात खर्च होईल. अचानक आलेल्या संघर्षाला सामना होईल.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण धनु राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक पंचम स्थान आणि दुसरे बारावे / व्यय स्थान. त्यामुळे ह्या कालावधीत मुलांच्या शिक्षणाबद्दल काही काळजी वाटू शकेल. काही जणांना संतती बद्दलची धावपळ हि शहरापासून दूर जाऊन करावी लागेल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे बाराव्या स्थानातील जिथे ८ लिहिले आहे तेथे मंगल भ्रमण करताना गुरु ह्या नक्षत्राचे फळ हे व्यय करण्याचे देत आहे. ह्या कालावधी मध्ये आपल्याकडून काही गोष्टी वजा होण्याचे दिसत आहे. काही आपले पूर्वीचे खर्च वाढतील. संतती साठी चे खर्च ह्यात अति करावे लागतील. विद्यार्थ्यांना हा कालावधी थोडा जास्त मेहनतीचा असेल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. धनु लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा सध्या षष्ठ स्थानातून जिथे २ लिहिले आहे तेथून जात आहे. म्हणून ६ व्या स्थानाचे फळ राहू देण्यास सुरुवात करेल. आपण आपल्या सर्व सर्विसेस देण्यासाठी खूप प्रयत्नशील असाल ह्यात पैसा दिसेल. काही कर्जाचे विषय हे मार्गी लावाल. आरोग्याबद्दलच्या अडचणी इथे स्वतःच्या जोरावर दूर करण्याचा प्रयत्न दिसेल. नोकरीत बदल होऊ शकेल.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी तिसऱ्या स्थानाचे फळ देत आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रेसेंटेशन साठी हा कालावधी अति धावपळीचा होऊ शकेल. आपल्या स्किल चा उपयोग ह्या काळात जर वेगवेगळ्या शहरात जाऊन करीत असाल तर हि एक उत्तम संधी आहे. कम्युनिकेशन खूप वाढेल आणि त्याचा फायदा काही नवीन करण्यासाठी सुद्धा असेल. ह्या कालावधीत हाती पैसा टिकताना दिसणार नाही जपून खर्च करावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply