You are currently viewing राहू/केतू परिवर्तन २०२२

राहू/केतू परिवर्तन २०२२- RAHU TRANSIT 2022
(12/4/2022 TO 30/10/2022 = 18 MONTHS)

राहू /केतू जे एक छाया ग्रह आहेत आणि त्यांचा भास जो प्रत्येक राशीत येतो तो १८ महिन्याचा असतो. मागील १८ महिने राहू वृषभ राशीत होता आणि केतू वृश्चिक राशीत होता. अर्थात त्यांची गती हि उलट्या दिशेने असल्यामुळे राहू/केतू हे दिनांक १२/४/२०२२ रोजी दुपारी २:५२ च्या दरम्यान राहू वृषभ राशीतून निघून मेष राशीत ३० डिग्री पासून सुरुवात करेल आणि केतू हा वृश्चिक राशीतून निघून तुला राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उलटे गतीने ३० डिग्री ने सुरु होईल.

हेही वाचा :- मी राहू बोलतोय राहू

राहू/केतू परिवर्तन २०२२- महत्वाचे मुद्दे

  • जेव्हा राहू एका राशी ला सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा राहू त्या राशीला आपल्या सारखे वागायला लावतो.
  • राहू हा ज्या राशीत येतो त्या राशीतल्या लोकांसाठी टार्गेट च्या मागे धावायला लावतो. गप्प बसवत नाही. राग निर्माण करतो. आणि इंडीव्हिजीवल गोष्टींच्या/सुखांच्या पासून तो दूर नेतो. रिलेशन ला कात्री लावू शकतो कारण ह्या सर्वांची त्याला काही पडली नसते तो त्या राशीवाल्याना समाजात स्पर्धात्मक ठेवतो मग त्यासाठी तो त्याच्याकडून काहीही करवून घेतो.
  • केतू हा ज्या राशीत येतो त्या राशीतल्या लोकांसाठी आधी धावपळ निर्माण करवतो आणि घटना अचानक करवून देतो त्यात तो समजतच नाही कि त्याच्याबरोबर हे काय सुरु झाले आहे. सतत बिझी ठेवतो.
  • हे दोन्ही ग्रह १२ एप्रिल २०२२ पासून जेव्हा राशी परिवर्तन करतील तेव्हा इतर राशींसाठी आणि सर्व लग्न कुंडली साठी वेगवेगळे परिणाम नक्की देईल पुढील १८ महिन्यांत. तेव्हा आपणास इथे पुढे येणारे राहू केतू राशी परिवर्तन ह्या सदरात दोन्ही पोस्ट वाचाव्या लागतील एक आपल्या राशीसाठी आणि दुसरी आपल्या पत्रिकेत जे लग्न आहे त्याप्रमाणे सुद्धा पहावे लागेल. आणि तशा घटना आपल्याबरोबर पुढील १८ महिन्यात होत आहेत का हे चेक करावे लागेल. इथे जे जे लिहिणार असेन ते सर्वांसाठी त्या राशी/लग्न वाल्याना असेल त्यात बराच फरक सुद्धा दिसून येईल कारण तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत राहू/केतू कसे आहेत त्यावरून ते सूक्ष्म सांगता येते. तरीसुद्धा इथे जे जे दिले असेल आपल्यासाठी त्याचा विचार नक्की करावा जेणे करून आपण थोडे तरी सावधान राहाल.

धन्यवाद…..!

Leave a Reply