You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ कर्क राशी / कर्क लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ कर्क राशी / कर्क लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR KARK RASHI / LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे कर्क राशी आणि कर्क लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ कर्क राशी / कर्क लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ कर्क राशी / कर्क लग्न

कर्क राशी आणि कर्क लग्न म्हणजे आपली राशी जरी कर्क नसली पण लग्न कर्क असेल तर किंवा आपले लग्न कर्क नसले पण राशी कर्क असली तर खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

कर्क राशि अणि कर्क लग्नाच्या पत्रिकेत राहु कर्म स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू चतुर्थ स्थानी तुला राशीत असेल कर्म आणि सुख स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — १२ महिन्यांसाठी गुरु भाग्यात आणि पंचमेश मंगळाच्या राशीत राहू काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न असेल. शिक्षणाच्या बाबतीत मोठे निर्णय घ्याल. उत्तम काळ असेल. करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना करिअर मधील मोठे बदल आहेत. ह्या १८ महिन्यांसाठी करावयाची इच्छा आणि धावपळ निर्माण करू शकाल.

आपण ज्या ज्या सर्विसेस मार्केट मध्ये देत आहात त्याच्या काहीतरी वेगळे करून दाखविण्याची धमक येईल. कुटुंबा साठी मोठे खर्च कराल. घर/जागा खरेदी साठी पैसा उभा करावा लागेल त्याच्या व्यवस्थेची धावपळ दिसते. आधीपासून काही त्रास असल्यास ह्या १८ महिन्यांत आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कर्क राशीच्या लग्न आणि राशींच्या जातकांना.

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा कर्क राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात घरातील मोठे निर्णय घेण्यासाठी असेल. आणि त्यावर पैसे खर्च होणार. घरापासून दूर जाण्याचा प्रयत्न ह्याच कालावधीत असेल ज्यांचे आधीपासून प्रयत्न असतील त्यांना ह्यात निर्णय घेता येईल. गव्हर्नमेंट च्या कामात ह्यात काही अडथळे निर्माण होतील सावध राहणे पैसे देऊन काम करू नये फसगत होईल. किंवा ह्या कालावधीत कुणाला दिलेले पैसे परत येणार नाहीत जपून व्यवहार करा.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कर्क राशी किंवा कर्क लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. घर घेणे जागा घेणे ह्यासाठी हा काळ उत्तम असेल व्यवहार करावा किंवा होईल. लाभ होतील. ज्यांचे लग्न झाले नाही आहे त्यांचा विवाह ह्या कालावधीत होण्याचे योग दिसतील. स्त्रियांकडून लाभ होण्याचा हा कालावधी असेल. प्रेमात यश असेल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कर्क राशी किंवा कर्क लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या कालावधीत सुद्धा घर जागा खरेदीसाठी उत्तम असेल. हाच काळ करिअरच्या मध्ये मोठा बदल घडवून आणेल.
  • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे कर्क राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे स्वतःच्या सुखासाठी धावपळ करताना दिसाल. मात्र त्यात अडचणी बऱ्याच येतील.
  • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे हाच काळ वर उल्लेख करण्यात आलेल्या आईच्या काळजीसाठी असेल.
  • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे बऱ्याच कर्क राशी किंवा लग्न वाल्याच्या नोकऱ्या जाण्याची चिन्हे दिसतील सावधान राहावे. किंवा घरातील वाद विवाद होण्याची चिन्हे आहेत.

उपाय —कर्क लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी किंवा रोज केसर गंगाजल मध्ये उजळून कपाळावर आणि नाभीवर टिळा करावा. आणि गौ सेवा करावी.

धन्यवाद…..!

Leave a Reply