You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR SCORPIO RASHI / SCORPIO LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न

वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न म्हणजे आपली राशी जरी वृश्चिक नसली पण लग्न वृश्चिक असेल तर किंवा आपले लग्न वृश्चिक नसले पण राशी वृश्चिक असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

वृश्चिक राशी अणि वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेत राहु षष्ठ स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू बाराव्या स्थानी वृश्चिक राशीत असेल षष्ठ आणि बाराव्या स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू षष्ठात आणि केतू द्वादश स्थानी १८ महिने आहे ह्याचा परिणाम मध्ये काही विद्यार्थी राहू च्या भ्रमणामुळे बऱ्याच स्पर्धा-परीक्षेत भाग घेतील. राहू चे हे भ्रमण विध्यार्थ्यांना रिझल्ट आणण्यासाठी सहाय्यक ठरेल. गुरु सुद्धा पाचव्या स्थानात आहे म्हणून हा कालावधी वृश्चिक राशी आणि लग्नाच्या विद्यार्थ्यांना चांगला जात आहे.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना षष्ठात येणारा राहू बरीच वर्षे टिकलेल्या नोकरी मधून बाहेर पडायला लावेल काहीतरी नवीन करण्याची उमेद देईल. कर्ज मोठे घ्याल. आरोग्याची काळजी घ्यावी पीडा होत आहे सांभाळावे.
केतूच्या द्वादश स्थानातील भ्रमणामुळे काही डिपॉझिट्स काढावे लागतील ह्यावर लक्ष ठेवा. काही गुंतवणूक बंद होत आहे.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा वृश्चिक राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात व्यवसाय/नोकरीत बदल दिसतील. काही बदल हे तुम्ही स्वतः कराल. हा कालावधी घाईत निर्णय होत नाही ना ह्याकडे लक्ष द्या.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. इथे वैवाहिक जीवनातील व्यक्तींना कठीण दिसते. संबंध सांभाळावे लागतील. विवाहाचे निर्णय इथे होताना दिसतील.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. हा कालावधी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा काळ असेल. एखादे ऑपरेशन आधीचे काही असेल तर वरील काळात होत आहे. कर्ज घेण्याचा कालावधी दिसतो.
  • केतू वृश्चिक राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशी/लग्न च्या व्यक्तींना संततीच्या घडामोडी दिसतील. संतान च्या सुखासाठी इथे पैसा खर्च करावा लागेल. एखादा मोठा निर्णय कुटुंबासाठी घ्याल.
  • केतू वृश्चिक राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. ह्या कालावधीत नोकरी व्यववसायातील मोठे निर्णय घ्याल. पैसा मिळेल.
  • केतू वृश्चिक राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे वृश्चिक राशी किंवा लग्न वाल्याना नोकरीच्या ठिकाणी वादविवाद टाळावेत. काही जणांचे प्रमोशन होताना दिसेल पण ते ट्रान्सफर होऊन असेल किंवा तिथेच प्रमोशन झाले तर ते खूप त्रासदायक ठरेल.

उपाय —वृश्चिक लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा आणि श्री गणेशाला दुर्वा घालून गणेश मंत्र म्हणावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply