वृश्चिक राशी अडीचकी ( शनी लहान पनौती) | Shani Transit for Scorpio
Table of Contents
नियम
जेव्हा एखाद्या राशीपासून शनी ४थ्या राशीत भ्रमण करीत असतो तेव्हा त्या राशीला शनीची लहान पनौती किंवा शनीची अडीचकी किंवा ढैय्या लागली असे म्हणतात. आपली राशी जर वृश्चिक असेल तर वरील नियम आपणास लागू पडेल. आणि जर आपले लग्न वृश्चिक असेल आणि राशी दुसरी कोणतीही असेल तर मात्र आपणास लहान पनौती नसली तरी शनीचे भ्रमण हे आपल्याला खाली दिलेले वाचण्यास हरकत नाही.
जेव्हा शनी कुंभ राशीत असेल जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यन्त तेव्हा गुरु राहू आणि केतू हे कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे शनी चे फळ प्रत्येक राशीला मिळण्याचा संभव असेल.
वृश्चिक राशीला किंवा लग्नाला गुरु राहू केतू यांची गोचरी दिली आहे. त्यावरून शनी आपल्याला कसे फळ देईल हे सुद्धा समजण्यास मदत होईल.
- गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत पंचम स्थानी.
- गुरु मेष राशीत १/५/२०२४ पर्यंत असेल.– वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत षष्ठ स्थानी.
- गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत सप्तम स्थानी.
- राहू ३०/१०/२०२३ पर्यंत मेष राशीत असेल — वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत षष्ठ स्थानी.
- केतू ३०/१०/२०२३ पर्यंत तुला राशीत — वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत द्वादश स्थानी.
- राहू ३०/१०/२०२३ ते १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत — वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत पंचम स्थानी.
- केतू ३०/१०/२०२३ ते १८/८/२०२५ पर्यंत कन्या राशीत –वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत एकादश स्थानी.
आपली राशी किंवा आपले लग्न वृश्चिक असेल तर १७/१/२०२३ च्या आधी ८४ दिवसात आपण ते पाहिलेच असेल कि आपल्या बद्दल ज्या ज्या घटना होत आहेत त्या आपल्या इच्छेविरुद्ध होत आहेत. मानसिक ताण वाढत आहे. पण हे आपल्या जन्माच्या शनीवर सुद्धा अवलंबून असेल.
येथे आपणास दिनांक १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असताना काय फळ देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न असेल.
येथे फक्त विषय मांडले जातील.
वर दिलेल्या कुंडलीत जी आपली लग्न कुंडली किंवा राशी कुंडली आहे ती पहा शनी आपल्या सुख स्थानात येत आहे. जेव्हा शनी सारखा शिस्तप्रिय न्यायप्रिय ग्रह आपल्या लग्नस्थानापासून किंवा राशीपासून चौथा येत असतो तेव्हा हे सुखस्थान असल्यामुळे आपल्या सुखाचे तो लाड करत नाही तर ह्या राशी लग्न वाल्याना थोडे अलर्ट करतो स्वतःच्या सुखापासून वंचित करण्याचा प्रयत्न करतो.
तशा काहीशा घटना ह्या आपल्याबद्दल सुद्धा होऊ शकतील. पण त्या सर्व आपल्या भल्यासाठीच असतील ह्यात शंका नको कारण शेवटी शनी हा आपल्या मुलत्रिकोण राशीत येत आहे. चौथा भाव हा मातृसुखाचा, प्रॉपर्टीचा, वाहनसुखाचा सुद्धा आहे. त्यामुळे आईची आणि वाहन सुखाबद्दल थोडी काळजी लागेल मात्र प्रॉपर्टी सुखाचा आनंद मिळेल.
शनी वृश्चिक राशी किंवा लग्न कुंडलीला चांगली फळे देताना थोडी कंजुषी करेल कारण मंगळाची राशी हि त्यास जास्त सूट होत नाही.
त्यामुळे शनी हा वैराग्याचा सुद्धा कारक असल्यामुळे काही वृश्चिक राशी लग्न वाल्याना ह्या कालावधीत आपल्या सुखाचा सुद्धा कंटाळा येऊ शकेल.
शनी च्या दृष्टी
जन्म स्थानाच्या वेळी आपल्या पत्रिकेत शनी जेथे बसला असेल तेथे तो चांगली फळे देतो आणि त्या संबंधित घटना आपल्याकडून करवून घेतो.
जन्म स्थानाच्या वेळी शनी ज्या राशीत असतो त्या राशीपासून ३ ऱ्या, ७ व्या आणि १० व्या स्थानावर आपली दृष्टी टाकतो. ह्या शनी च्या तिन्ही दृष्ट्या चांगल्या मानल्या गेलेल्या नाहीत. त्या त्या स्थानापासूनच्या विषयी व्यक्ती थोडा हैराण असतो आपल्या जीवनात. किंवा त्या स्थानातील चांगल्या परिणामांसाठी व्यक्ती सतत मेहनत करीत असतो. हे कोणत्या कोणत्या स्थानावर त्याची दृष्टी पडली आहे ह्यावर अवलंबून असते.
मात्र शनी जेव्हा एखाद्या स्थानावर मर्यादित कालावधीत गोचरीने भ्रमण करतो तेव्हा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर येत असते तेथून तो त्या व्यक्तीला उजेडात आणतो त्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या २.५ वर्षाच्या कालावधीत तो त्या त्या गोष्टी त्याच्याकडून करवून घेतो. आणि तो जेथे बसलेला असतो त्या विषयी चे विषय सुद्धा व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी मदत करतात.
शनी ची ३ री दृष्टी
वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न कुंडली साठी शनी चतुर्थ स्थानातून भ्रमण करीत आहे सध्या आणि तेथून तो आपली तिसरी दृष्टी हि आपल्या षष्ठ स्थानावर देत आहे जिथे १ नंबर लिहिले आहे. तेथे मंगळाची मेष राशी येते आणि सध्या तेथे ३०/१०/२०२३ पर्यंत राहू सुद्धा तिथेच आहे. हा प्रकार आपल्याला स्पर्धेत आणेल, शत्रू पासून त्रास दाखवेल, किंवा नोकरीच्या ठिकाणी थोडा त्रास होण्याची शक्यता असेल.
ज्यांना आधीपासून काही आजार असतील त्यांनी काळजी घ्यावी .एप्रिल पर्यंत गुरु मीन राशीत असेल. तेव्हा एप्रिल पर्यंत खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल कारण आपल्या धनस्थानाचा मालक धनु राशीचा गुरु हा पापकर्तरी योगात एप्रिल पर्यंत असेल. हा काळ विद्यार्थी दशेतील मुलांना चांगला नव्हे किंवा पालकांना आपल्या पाल्याच्या साठी सुद्धा बराच पैसा खर्च करणारा असेल मात्र त्याचा चांगला परिणाम होताना दिसत नाही.
शनी ची सातवी दृष्टी
हि जिथे ५ सिंह राशी आहे तिथे येत आहे. आपल्या कर्म (दशम) स्थानावर येणारी हि दृष्टी आपल्या करिअर मध्ये मोठ्या घडामोडी नक्की आणेल चांगल्या किंवा वाईट हे आपल्या पत्रिकेतील मंगळ आणि रवी वर अवलंबून असेल. त्या घटना ह्या शनीच्या भ्रमणात २०२३ आणि २०२४ मधील ह्या दोन्ही वर्षी १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ला होतील कारण तेथे दशमात दशमेश रवी सिंह राशीत असेल. त्याच्यावर शनी ची दृष्टी येईल.
आणि १६ सप्टेंबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ हा कालावधी सुद्धा आपल्याला करिअर च्या ठिकाणी काळजीचा किंवा मोठ्या घटनांचा दिसू शकेल कारण रवी कन्या राशीत असेल आणि शनी पासून तो ८ व्या राशीत असेल . तेव्हा इथे कोणतेही मोठे निर्णय घेऊ नये. हे दोन्ही वर्षासाठी असेल २०२३ आणि २०२५.
शनी ची १० वी दृष्टी
आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी जिथे ८ मंगळाची वृश्चिक राशी आहे त्यावर शनी ची १० वी दृष्टी आहे. हे आपल्या मानसन्मानाचे प्रेसेंटेशन चे स्थान आहे आणि आपल्या हेल्थ चे सुद्धा त्यामुळं प्रथम आपण हेल्थ ला सांभाळावे. तुमच्या लग्नस्थानाचा मालक मंगळ आहे आणि तो जेव्हा २०२३ ला आणि २०२४ ला ४५ दिवसासाठी मिथुन राशीत अष्टमात येईल तेव्हा हा हेल्थ साठी आणि मानसन्मानासाठी कठीण काळ असेल.
वृश्चिक राशी च्या राजकारणी व्यक्तींनी जरा जपून राहावे ह्या कालावधीत. आत्मसन्मान सांभाळून कार्य करावे लागेल.
१२/३/२०२३ ते ९/५/२०२३ आणि २६/८/२०२४ ते २०/१०/२०२४ तो हा कालावधी असेल जेव्हा मंगळ मिथुन राशीत असेल.
गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत पंचम स्थानी.वृश्चिक लग्न किंवा राशी कुंडलीत पंचम स्थानी गुरु असताना वरील विद्यार्थ्यांसाठी आणि संतान सुखाबद्दल दिलेले विवेचन होण्याची खात्री दिसेल.
गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल — हा कालावधी आपणास थोडा सुखाचा जाऊ शकेल ह्यात शंका नाही.ह्याचे कारण धनेश आणि पंचमेश आपल्या लग्न स्थानाला पाहतील आणि आपण आत्तापयर्यंत जे जे सहन केले असेल ते ते सर्व सुखकारक होईल. असे म्हणतात कि शनी जाता जाता काहीतरी आपली चांगली व्यवस्था करून जातो.
तो हा कालावधी असेल ह्यात जे आपल्याला मिळेल ते आयुष्यभरासाठी लक्षात राहते असे माझे मत आहे. आठवून पहा जुलै २००२ ते २००५ च्या घटना. शेवटी ३/४ महिन्यात काय काय घडले होते आपण जर तेव्हा वयाच्या १२ वर्षाच्या पुढे असाल तर हे नक्की समजेल.
१/७/२०२३ ते १८/८/२०२३ मंगळ सिंह राशीत जात आहे तेव्हा तो आपल्या पत्रिकेत दशम स्थानी जिथे ५ लिहिले आहे. सिंह राशीच्या समोरील कुंभ राशीत शनी असल्यामुळे इथे आपल्या करिअर मध्ये मोठ्या चांगल्या घटना घडतील. मेडिकल च्या विद्यार्थ्यांना आणि साकरकारी नोकरदारांना हा कालावधी उत्तम असेल.
असेच १५/३/२०२४ ते २३/४/२०२४ ला मंगळ कुंभ राशीतून जात असेल तेव्हा शनी + मंगळाची युती आपल्या चतुर्थ स्थानी येत असल्यामुळे ज्यांच्याकडे प्रॉपर्टीज चे योग आहेत त्यांना जरूर हे योग अप्लाय होतील किंवा नवीन घर घेण्याचे हे योग १००% समजा. आपल्या नवीन घराची स्वप्ने इथे पूर्ण होतील.
उपाय वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाचा
ह्या पूर्ण शनीच्या भ्रमणात हनुमान चालीसा रोज वाचणे, दुर्गा चालीसा किंवा स्तोत्राचे पठण करणे, मंगळवारी किंवा रोज गणेशाला दुर्वा घालणे हे आपल्या राशिस्वामीला मजबूत बनविण्याचे कार्य करेल. शनी साठी हनुमंताच्या मंदिरात प्रत्येक शनिवारी रुई ची माळ घालून तेथे तेल आणि काळे उडीद वाहणे ह्याने बऱ्याच प्रमाणात वृश्चिक राशीला त्यांचा हा कालावधी व्यवस्तीत जाईल ह्यात शंका नाही.
वरील लिंक वर जर आपण शनी च्या प्रत्येक नक्षत्राचा कालावधी पाहिलात तर त्यात ज्या ज्या वेळी शनी वक्री असेल त्या त्या वेळी आपल्याला वर दिलेली फळे हि अचानक आपल्या समोर असतील. ती चांगली किंवा वाईट हे आपल्या जन्माच्या शनीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. साधारण गणित करायचे झाल्यास एव्हढेच आपण पाहू शकता जर आपल्या पत्रिकेत शनी वक्री असेल आणि इथे भ्रमण काळातील शनी वक्री असताना तो आपल्याला चांगली फळे नक्कीच देतील.
वरील लिंक मध्ये दिलेल्या नक्षत्र भ्रमणाचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील ह्यासाठी आपण नक्कीच एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून सल्ला घ्या हि विनंती. कारण इथे प्रत्येक नक्षत्राबद्दलचे विवेचन सर्वांसाठी सारखे नसेल.
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८