You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ धनु राशी / धनु लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ धनु राशी / धनु लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR DHANU RASHI / DHANU LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे धनु राशी आणि धनु लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ धनु राशी / धनु लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ धनु राशी / धनु लग्न

धनु राशी आणि धनु लग्न म्हणजे आपली राशी जरी धनु नसली पण लग्न धनु असेल तर किंवा आपले लग्न धनु नसले पण राशी धनु असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

धनु राशी अणि धनु लग्नाच्या पत्रिकेत राहु पंचम स्थानी १८ महिने मेष राशीत असेल आणि केतू लाभ स्थानी तूळ राशीत असेल पंचम आणि लाभ स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू पंचमात ज्यांचे रेग्युलर शिक्षण सुरु आहे त्यांना थोडा त्रास जाणवेल. ज्यांना शिक्षणाबरोबर इतर काही शिकायचे असेल तर उत्तम परिणाम हा राहू देत आहे. काही जणांच्या शिक्षणामध्ये अडचणी सुद्धा दिसतील. पण प्राथमिक शिक्षणासाठी हा कालावधी गुरु मुळे उत्तम होत आहे.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना पंचमात येणारा राहू नोकरीच्या ठिकाणी त्रास असू शकेल. किंवा नोकरी व्यवसाय सुरु असताना सट्टा, जलद गतीने पैसा, शेअर मार्केट इत्यादी मध्ये सहभाग होण्यासारखा आहे जपावे.
केतूच्या लाभ स्थानातील भ्रमणामुळे काही अचानक होणारे लाभ समोर येतील त्या साठीची धावपळ सुद्धा दिसेल. किंवा मोठ्या आमिषाला प्रयत्न करण्याचा हा काळ सांगता येईल.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा धनु राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात करिअर मध्ये मोठे बदल दिसतील. ज्यांना देशाबाहेर जायचे असेल त्यांनी इथे प्रयत्न करावा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे धनु राशी किंवा धनु लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. इथे आपल्या सर्विसेस सुरु होतील. नोकरीतून लाभ मिळेल. प्रमोशन होईल. पैसा मिळेल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे धनु राशी किंवा धनु लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. संतान सुखासाठी चिंतेचा कालावधी म्हणू शकतो. संतान च्या बाबतीतील घटना त्रासदायक असतील.
  • केतू तूळ राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे धनु राशी/लग्न च्या व्यक्तींना घर जागा खरेदीसाठी उत्तम योग आहेत. ह्या कालावधीत स्वतःच्या सुखासाठी केलेली कोणतीही धडपड उत्तम असेल.
  • केतू तूळ राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी इथे पैसा खर्च होईल. इतरांना सल्ला द्याल. खूप युक्त्या लावण्याचा हा काळ असेल.
  • केतू तूळ राशीत २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे धनु राशी किंवा लग्न वाल्याना नोकरीच्या ठिकाणी मोठा निर्णय घेऊ नये घरी बसण्याचा हा काळ असेल. सांभाळावे. पण पैसा मिळत आहे काळजी नको. जे कंसल्टिंग च व्यवसाय किवा नौकरी करणार आहेत त्याना ह्या कालावधीत बरेच लाभ होतील.

उपाय —धनु लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी केसर चा टिळा लावून गुरु दर्शन घ्यावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply