You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: सिंह राशी किंवा सिंह लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली सिंह राशी आणि सिंह लग्नाची आहे. जर आपण सिंह राशीचे आहात किंवा सिंह लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या सिंह राशी किंवा सिंह लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या पाचव्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत पाचवे स्थान सोडून सहावा व्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या सहाव्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. सहाव्या स्थानावरून स्पर्धा, आजार,कर्ज, शत्रू, कोर्टकेसेस, आपण जी समाजात सर्व्हिस देतो ह्या गोष्टी पहिल्या जातात.

दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल.

ह्या बद्दलचे ज्या ज्या समस्या आपल्याला झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे. ह्या वर्षी आपल्यावर नवीन कर्ज होऊ शकतील. काही कर्ज हे वैवाहिक इशू संपविण्यासाठी असतील.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे ज्ञान, संतती, शिक्षण पहिले जाते. ह्या पंचम स्थानाचा मालक गुरु हा पुढील स्थानात नीच होऊन आला आहे तो शनी बरोबर असेल ज्यात तुम्ही विद्यार्थी दशेत असाल ते हे वर्ष काही नवीन कोर्सेस करण्यासाठी खूप चांगले असेल. काहींना रेगुलर स्टडी ज्यांच्या सुरु आहेत त्यांना काही त्रास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेत ह्या वर्षी यश नक्की मिळेल.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत आठव्या स्थानी येत आहे मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने सहाव्या स्थानी येत आहे हा एक राजयोग असेल तुमच्या साठी कारण ह्यात आपण आठव्या स्थानाची चांगली फळे घेऊ शकता तुमच्या स्किल ला खूप वाव मिळेल.

आणि तुम्ही ह्या वर्षी आपल्या सर्व सर्व्हिस देण्यासाठी अग्रेसर असाल. जर व्यापार करत असाल तर हे वर्ष उत्तम जाईल जर सर्विस करत असाल तर त्यात प्रमोशन वगैरे नक्की होईल. फक्त तब्येतीची कुरबुर होताना काही त्रास जाणवला तर त्याकडे लक्ष द्या.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या १२ व्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे जर आपण विद्यार्थी असाल तर आपल्याला हे वर्ष बाहेर जाऊन शिकण्यासाठी उत्तम असेल. ज्यांना विदेशात जायचे असेल नक्की ह्या वर्षी प्रयत्न करू शकता. गुंतवणूक मात्र ह्या वर्षी करताना थोडा त्रास होईल. किंवा केलेली गुंतवणूक काढण्याचे योग येतील पण ते संतती आणि कुटुंबातील एखाद्या योग्य ऑपेरेशन करण्यासाठी असेल.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी दशम स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून कर्म स्थानात काही उठाठेवी घडतील नवीन नवीन युक्त्या लावाल पण सांभाळून. करिअर मध्ये जम्पिंग दिसेल पण येथील राहू सिंह राशीला आणि सिंह लग्नाला १८ महिने चांगले फळ देत नाही असे मी राहू च्या पोस्ट मधे अगोदरच लिहिले आहे. त्यात ह्या राहुला नीच गुरु पाहत आहे आणि राहू सुद्धा ९ व्या दृष्टीने गुरु ला पाहत आहे त्यामुळे काही वाद विवाद होत असतील तर त्यात तुम्ही मागे पडणार नाही पण करिअर ला कुठेही धक्का लागता कामा नये.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे जिथून तुमचे कुटुंब आणि पैसा पहिला जातो. गुरु ची इथे असणारी दृष्टी कुटुंबासाठी काही पैसा खर्च करण्याचा योग आहे. त्यात मुख्य आजार हा विषय असू शकतो. हि दृष्टी आपल्याकडे पैशाचा ओघ कमी करणार नाही नक्की.

गुरुचे उपाय

सिंह राशी आणि सिंह लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना असा सल्ला दिला जातो कि आपण गोरगरिबांना किंवा गायीला ह्या वर्षी गूळ आणि चण्याची डाळ देत जा गूळ हे आपल्या राशीचे दान आहे सूर्य उपासना सुद्धा ह्यात आपल्याला भरपूर काही चांगले परिणाम देईल.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे सिंह राशी आणि सिंह लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. — ह्यात जर आपल्याला काही आजार मागील असतील तर त्यात ऍक्टिव्ह होऊन ते दूर करण्याचा प्रयत्न कराल. काही स्पर्धा परीक्षा असतील तर त्यासाठी केलेले प्रयत्न वरील कालावधीत पॉसिटीव्ह असतील.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल — ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल – ह्यात तुम्ही प्रॉपर्टीज साठी किंवा आपल्या भाग्योदयासाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.– ह्यात करिअर बद्दल जे जे वर लिहिले आहे ते ऍक्टिव्ह असेल.
  • पण हा काळ आपल्यासाठी चांगला नसेल काळजी घेणे अति आवश्यक असेल.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मधील ज्या ज्या घटना होतील त्यावर पुन्हा सक्रिय होऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

सर्वात महत्वाचे सिंह राशी आणि सिंह लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

४) कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.———
ह्यात सिंह लग्न आणि सिंह राशीला आपल्या वैवाहिक सुखाची जास्त काळजी घ्यावी लागेल त्यात एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली तर १४/९/२०२१ पर्यंत सहन करा जास्त निर्णय घेऊ नका हा काळ वैवाहिक सुखासाठी चांगला नाही. जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा हा काळ चांगला जात नाही जे जे पार्टनरशिप करत आहेत त्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. पण जर पत्रिकेत तुमचा गुरु वक्री असेल तर वरील विषयात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील त्या विषयीच्या पेंडिंग प्रोसेस क्लिअर करताना तुम्हाला फायदे होतील. गुरु वक्री असेल तर व्यापारी जणांना सिंह राशी आणि सिंह लग्नाला हा खास पिरियड असेल रोज पैसा कमविण्याचा पण पार्टनरशिप नकोच.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply