Table of Contents
काय असते चंद्र ग्रहण
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रांगेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य च्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी ची चंद्रावर पूर्ण किंवा आंशिक छाया पडते. ह्याने चंद्र बिंब काळे दिसते ह्या प्रोसेस ला चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात.
ग्रहण लागल्याबरोबर चंद्र पृथ्वी च्या उपच्छायेत प्रवेश करतो त्याला इंग्रजी मधे (PENUMBRA) असे म्हणतात. नंतर हळू हळू चंद्र पृथ्वीच्या वास्तविक छायेत पदार्पण करतो ह्याला भुभा (UMBRA) म्हणतात. ह्यात वास्तविक चंद्रग्रहण होते.
पण बऱ्याच वेळा चंद्र भुभा मध्ये प्रवेश करतच नाही. आणि ग्रहण काळ संपतो ह्या प्रोसेस ला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. ह्यात चंद्र अगदी नेहमी प्रमाणे दिसतो. अगदी सूक्ष्म पणे पहिले तर त्यावर काही सावली दिसते नाहीतर चंद्र ह्यात स्पष्टच दिसतो.
चंद्र ग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ – वेध, स्पर्श, मध्य आणि मोक्ष वेळा.
- खण्डग्रास चन्द्र ग्रहण – चन्द्र ग्रहण प्रारंभ चंद्रोदयापासून १८:०५
- चन्द्र ग्रहण समाप्ती १८:१८
- चन्द्रोदय – १८:०५
- मुख्य ग्रहण वेळ १३ मिनिट ४२ सेकंड
- उपच्छाया प्रथम स्पर्श – दुपारी १:३३ पासून
- प्रच्छाया प्रथम स्पर्श – दुपारी २:४० पासून
- खग्रास प्रारंभ – दुपारी ३:४७ पासून
- परमग्रास चन्द्र ग्रहण – सायंकाळी ४:२९
- खग्रास समाप्ती – सायंकाळी ५:११
- प्रच्छाया अंतिम स्पर्श – सायंकाळी ६:१८
- उपच्छाया अंतिम स्पर्श – सायंकाळी ७:२५
- सूतक प्रारंभ – सकाळी ९:३२ पासून (लहान मुले, वृद्ध, किंवा अस्वस्थ व्यक्तींसाठी सुतक ३:१२ पासून पाळावे.)
- सूतक समाप्त – सायंकाळी ६:१८
नोट – वरील सर्व वेळा ह्या मुंबई च्या आहेत. पूर्ण भारतासाठी स्पर्श दुपारी २:४०, मध्य सायंकाळी ४:३० आणि मोक्ष सायंकाळी ६:१९.
हेही वाचा :- पौर्णिमेचे चंद्र स्ट्रॉंग करण्याचे उपाय
सुतक काळ
सुतक काळ लागल्यापासून ते ग्रहण स्पर्श होईपर्यंत स्नान, जप, देवपूजा, पाणी पिणे,श्राद्ध वगैरे करता येतील पण जेवण करू नये. नंतर सूर्यास्तापासून ते ग्रहण संपेपर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करणे हे करू नये. तसे जमेल आणि शक्य असल्यास ३:१२ दुपारी पासून ते सायंकाळी ६:१९ पर्यंत करू नये. ग्रहण संपल्यावर स्नान करावे
चंद्र ग्रहण कोठून दिसेल
हे चंद्रग्रहण प्रामुख्याने ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागातून दिसणार आहे. दक्षिण-पश्चिम युरोप आणि आफ्रिका खंडातून कोणतेही ग्रहण दिसणार नाही.
भारतात, संपूर्ण ग्रहण फक्त पूर्वेकडील भागांतून दिसेल तर आंशिक ग्रहण भारताच्या बहुतांश भागांतून दिसेल.
कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, रांची, गुवाहाटी, काठमांडू, टोकियो, मनिला, बीजिंग, सिडनी, जकार्ता, मेलबर्न, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क सिटी, लॉस एंजेलिस, शिकागो आणि मेक्सिको सिटी ही काही लोकप्रिय शहरे आहेत जिथे एकूण चंद्रग्रहण दिसणार आहे.
हिंदू धर्म आणि चंद्रग्रहण
चंद्रग्रहण ही हिंदू धर्मातील एक धार्मिक घटना आहे ज्याला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. जर चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसेल तर त्या चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्व नाही. केवळ पेनम्ब्रल चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणूनच ते पंचांगमध्ये समाविष्ट नाहीत आणि ग्रहणाशी संबंधित कोणतेही विधी केले जात नाहीत.
केवळ उघड्या डोळ्यांनी दिसणारे चंद्रग्रहण धार्मिक विधींसाठी मानले जाते. सर्व पारंपारिक कॅलेंडरमध्ये केवळ प्रच्छाया चंद्रग्रहण समाविष्ट आहे. जर चंद्रग्रहण तुमच्या शहरात दिसत नसेल परंतु इतर देशांमध्ये किंवा शहरांमध्ये दिसत असेल तर ग्रहणाशी संबंधित कोणतेही विधी केले जात नाहीत. परंतु जर हवामानामुळे चंद्रग्रहण दिसत नसेल तर अशा स्थितीत चंद्रग्रहणाचे सुतक पाळले जाते आणि ग्रहणाशी संबंधित सर्व खबरदारी पाळली जाते.
ग्रहणात किंवा ग्रहण संपल्यावर करण्याची महत्वाची कृत्ये
ग्रहण काळ, दिवाळी ची अमावस्या आणि होळी ची पूर्णिमा ह्या वेळा मंत्र सिद्धी साठी फार महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. ह्या काळात जो आपल्या इष्ट देवतेचा मंत्र असेल तो जप केल्याने त्याची प्रचिती फार सुंदर येते. संकटकाळी ह्या सिद्ध केलेल्या मंत्राचा जप केल्याने बऱ्याच प्रमाणात आपण सेफ मोड मधे असू. त्यामुळे जेव्हा जेव्हा वर्षातून हे दिवस येतात तेव्हा तेव्हा काही जप तप साधना हि व्यक्तीने केलीच पाहिजे असे मत आहे.
त्यासाठी चंद्र ग्रहणात चंद्राचा मंत्र सुद्धा आणि सूर्य ग्रहणात सूर्याचा मंत्र सुद्धा उत्तम मनाला गेला आहे.
स्पर्श मध्य आणि मोक्ष ह्या ग्रहणाच्या महत्वाच्या वेळा आहेत त्यात मध्य आणि मोक्ष ह्या वेळा अति महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत.
जमले तर ग्रहण स्पर्श झाल्यापासून किंवा मध्य सुरु असेल तेव्हापासून आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपणे हे फार सुंदर असेल.
ग्रहण मोक्ष झाल्यावर स्नान करावे आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे आणि गरीब किंवा ब्राह्मण व्यक्तींना चंद्राच्या वस्तूंचे दान करावे.
जर नोकरी व्यवसायात काही त्रास असतील तर मंत्र जप करून ग्रहण संपल्यावर सफेद मोती किंवा सफेद मोतीनी बनवलेले आभूषण दान करावे.
जर संततीच्या बाबतीत काही समस्या जाणवत असतील तर खेळणी, दूध किंवा कपडे गरजू आणि गरीब लहान मुलांना दान करावेत
घरातील क्लेश, तंटे किंवा काही समस्या जाणवत असतील तर साखर किंवा सफेद कपडे,कापड गरीब किंवा ब्राह्मण व्यक्तींना दान करावे.
जर कोणत्याही आर्थिक समस्या जाणवत असतील तर दूध किंवा तांदूळ किंवा त्यापासून बनलेल्या खिरीचे दान करावे.
जर घरात काही जास्त आजारपण असेल तर एक काचेचे बाउल घ्यावे त्यात पाणी भरून त्यात एक चांदीचा सिक्का टाकून त्यात आजारी व्यक्तीला आपला चेहरा पाहून ते बाउल गरिबांना दान करावे.
वरील कोणत्याही प्रकारची दाने जमतील तशी करावीत. अगदी शक्य नसेल तर सरळ थोडे पाव किंवा अर्धा किलो तांदूळ तरी ग्रहण संपल्यावर बाजूला काढावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तरी ते गरीब व्यक्तीला दान करावे स्नान केल्यावर.
धन्यवाद…..!