You are currently viewing आपल्याला गुरु ची महादशा आहे का?

राहू च्या १८ वर्षाच्या महादशे नंतर गुरु ची महादशा सुरु होते ती १६ वर्षाची असते. गुरु ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रांच्या स्वामींचे फळ त्या व्यक्तीला गुरूच्या महादशेत मिळत असेल ते वेगवेगळे असू शकेल पण इथे कॉमन गुरु महादशेचे फळ वाचू शकता.

राहू च्या १८ वर्षाच्या महादशेत एकदा तरी व्यक्ती ज्योतिषाकडे जातोच आणि जर तो गेला असेल आणि तेव्हा तो पैशाने किंवा एखाद्या रोगाने पीडित असेल तर समोरील ज्योतिषी त्याला असे सांगू शकतो कि राहू च्या महादशेनंतर येणारी गुरु ची महादशा आपले संकट दूर करेल. पण ते तितकेसे खरे होताना दिसत नाही.

माझे मत ह्यावर असे —

 • जर आधीच्या राहूच्या महादशेत एखादे कर्ज असेल तर गुरु च्या १६ वर्षाच्या महादशेत हे कर्ज तसेच राहील.
 • जर आधीच्या राहू च्या महादशेत जर तुम्ही खूप डेरिंग करून पैसा मिळविला असेल तर येणारी गुरु ची महादशा तशी डेरिंग तुमच्याकडून काढून घेईल.
 • जर आधीच्या राहू च्या महादशेत जर एखादा आजार घेऊन तुम्ही गुरु च्या महादशेत जात असाल तर गुरु आपल्याला त्या आजारातून मुक्त करेल पण हे निगेटिव्ह सुद्धा असू शकेल. गुरु ची एक राशी १२ व्या स्थानी आणि हि मोक्षाची राशी असते. हे खास गुरु मारक आणि बाधक स्थानाचा स्वामी आहे का पाहावे लागेल.
 • सर्वाना गुरु १६ वर्षाच्या च्या महादशेत कर्ज होतेच जर हि महादशा वयाच्या २२ च्या पुढे असेल
 • सर्वाना गुरु च्या १६ वर्षाच्या महादशेत आपले घर एकदा तरी बदलावे लागते. त्यास कारणे हि वेगवेगळी असू शकतील.
 • सर्वाना गुरु च्या महादशेत जेव्हढा पैसा तुम्हाला पाहिजे तेव्हढाच देतो. अर्थात जर तुम्ही १०० रुपयाची मेहनत केलात तर तो १०१ देणारच नाही हे लक्षात असू द्यात. आणि दिले तर पुढे तो कर्जात सुद्धा ठेवेल नक्की.
 • सर्वानी गुरु च्या महादशेत एक लक्षात ठेवायला पाहिजे कि हि महादशा पैशाची नाही. ज्यांना ज्यांना ह्या महादशेत श्रीमंती मिळालेली असेल त्यांनी जरूर एखाद्या ज्योतिषाकडून आपली शनी ची महादशा कशी जाईल ह्यावर चर्चा करून घ्यावी. नक्की त्यात तुम्हाला शनी हा गुरु च्या महादशेत फळे चांगली देत नाही हे फिक्स आहे.
 • गुरु च्या १६ वर्षाच्या महादशे नंतर शनी ची १९ वर्षाची महादशा सुरु होते. त्यात जो व्यक्ती गुरु च्या महादशेत आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करेल त्याला पुढील १९ वर्षाची महादशा कधीच नीट जात नाही. त्यामुळे गुरु च्या महादशेत अति सात्विकपण ठेवायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला.

गुरु ची महादशा कुणाला चांगली जाते

 • जो जो सात्विकतेने वागेल.
 • जो जो ज्ञानाचा धर्माचा प्रसार करेल.
 • जो गुरु, शिक्षक, ज्ञान ह्याचा मान ठेवेल.
 • जो ह्या महादशेत कोणत्याही विद्यार्थ्याला कसलीही मदत करत राहील शिक्षणाचा प्रसार करेल अशा सर्व व्यक्तींना गुरु ची महादशा खूप चांगली जाईल.

आपला गुरु नीच आहे का ?

नीच राशीत गुरु आहे म्हणजे काय तर गुरु कर्क राशीत उच्च असतो आणि त्यासमोरील ७ वि राशी हि त्याची नीच राशी असते. नीच ह्याचा अर्थ इथे असा होतो कि गुरु इथे आपल्याला काही असामाजिक वृत्तीची फळे उपभोगायला लावू शकतो. समाजात दोनच प्रकारच्या व्यक्ती असतात एक चांगली आणि दुसरी वाईट. समाजाचा समतोल राखण्यासाठी दोन्ही माणसे समाजात असावी लागतात.

गुरु नीच आहे म्हणेज तुम्ही वाईट नाही फक्त एव्हढेच कि तुम्ही काहीतरी नवीन करायला आला आहात जे आत्तापर्यंत समाज करत नव्हता.

गुरु हे तुमचे ज्ञान आह, गुरु तुमचं वेळापत्रक आहे, गुरु तुमचे वैवाहिक सुख आहे, गुरु तुमचे शिक्षण आहे. म्हणून ज्यांचा गुरु नीच असेल त्यांना एकच सल्ला देण्यात येतो माझ्या तर्फे कि तुम्ही वरील विषयाचे तुमच्या त्या त्या वयात काही तरी वेगळे करून दाखविल्याशिवा गुरु तुम्हाला चांगले फळ देणारच नाही.

कारण कोणताही नीच ग्रह हा परंपरा तोडणारा असतो. कोणताही नीच ग्रह व्यक्तीला हा असामाजिक तत्वावर पुढे आणतो. कोणताही नीच ग्रह त्याचे कारकत्वात काही वेगळे पण करायला लावतो.

काही उदाहरण देतो —

जर एखादा विद्यार्थी विद्यार्थी दशेत असेल आणि तो जर त्याच्या करिअर साठी लागणारा पुढील अभ्यास त्याच्या परंपरेनुसार वेगळा नसेल तर तो कधीच ते शिक्षण पूर्ण करू शकणार नाही. झाले तरी त्याचे करिअर त्या शिक्षणातून होणारच नाही.

म्हणजे जर एखादा विद्यार्थ्याने वडील डॉक्टर आहेत म्हणून सायन्स घेतले आणि जर त्या मुलाच्या पत्रिकेत गुरु नीच राशीत असेल तर एकतर तो मेडिकल पूर्ण करू शकत नाही किंवा जरी झाला तरी तो त्याला त्यात करिअर करताना बऱ्याच अडचणी येतील.

म्हणून नीच राशीतील गुरु असेल तर शिक्षण हे काहीतरी वेगळे किंवा परंपरा सोडून केलेले असावे ह्यात मी असाही सल्ला देतो कि जर तुमच्या मागील पिढीचे शिक्षण हे आईवडिलांकडे झाले असेल त्यांच्या पैशातून झाले असेल तर अशा मुलांनी शिक्षण हे आईवडिलांकडे न राहता केले पाहिजे आणि त्यात स्वतःच्या कमाईतून केले तर अति उत्तम. हे करिअर साठी घेत असलेल्या शिक्षणासाठी आहे. प्राथमिक नव्हे.

गुरु नीच राशीत वैवाहिक उदाहरण

ज्यांचा गुरु नीच राशीत असेल १० नंबर बरोबर पत्रिकेत लिहिला असेल तर विवाहविषयक खालील मुद्दे वाचून घ्या. कामाला येतील.

विवाहात बऱ्याच अडचणी येत असतील तर त्यात परंपरा मोडून केलेला विवाह हा वैवाहिक सुख देऊ शकतो. धर्म बदलून केलेले विवाह म्हणजे नीच राशीतील गुरु असल्याशिवाय होत नाहीत. किंवा राहू गुरु असल्याशिवाय होत नाहीत.

जर तुम्ही हिंदू असाल आणि इतर धर्म नको असतील तर निदान जातीच्या बाहेर करणारे विवाह हे व्हावेत असे माझे मत आहे. जर हे हि पटत नसेल तर एखाद्याने वयातील अंतर हे इतरांना न पटणारे असेल असा विवाह करू शकतो. ह्यात मुलगी मुलापेक्षा मोठी. किंवा खूप लहान (१०/१२ वर्षे) असा विवाह.

काही जणांचा विवाह हा विधुर विधवा मुलामुलींशी होतो हे सुद्धा नीच राशीतील गुरुचे फळ असू शकते.

नोट — गुरु जरी लग्न कुंडलीत नीच राशीत नसेल तरी तो नवमांश कुंडलीत नीच राशीत असेल तरी गुरु हा वैवाहिक सुखासाठी नीच आहे असे मानावे लागेल.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

 1. Mrs Anushka Sane

  Vrushbh lagn , vrushik ras guru ,
  Janm ras sinh , Guru mahadasha effects
  Sanga ( rahu mahadasha ending 8 th June 2023 )

Leave a Reply