You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ मकर राशी / मकर लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ मकर राशी / मकर लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR MAKAR RASHI / MAKAR LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे मकर राशी आणि मकर लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ मकर राशी / मकर लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ मकर राशी / मकर लग्न

मकर राशी आणि मकर लग्न म्हणजे आपली राशी जरी मकर नसली पण लग्न मकर असेल तर किंवा आपले लग्न मकर नसले पण राशी मकर असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

मकर राशी अणि मकर लग्नाच्या पत्रिकेत राहु चतुर्थ (सुख) स्थानी १८ महिने मेष राशीत असेल आणि केतू दशम (कर्म) लाभ स्थानी तूळ राशीत असेल पंचम आणि लाभ स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू चतुर्थात असताना प्राथमिक शिक्षणासाठी मकर राशीच्या किवा लग्नाच्या मुला मुलींना बऱ्याच अडचणी दिसतील. कही जणांच्या घरातील अडचणीच शिक्षणवर परिणाम होईल. लक्ष द्यावे. मकर राशी किंवा लग्नाच्या जातकाचे एखाद्या सुखाची वजाबाकी इथे नाकारता येत नाही जी आधी उपभोगलेली असेल.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना चतुर्थ स्थानी येणारा राहू घर जमीन जुमला घेण्यासाठी व्यस्त ठेवेल. घरातील एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी धावपळ होईल. शनीची तीसरी दृष्टी शनी कुंभेतून ज्या वेळी देईल तेव्हा तेव्हा आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी जर आधीपासून काही त्यात गडबड असेल तर विशेष लक्ष द्यावे.

केतूच्या दशम स्थानातील भ्रमणामुळे काही जणांच्या नोकरीत व्यवसायात लांब बदली होण्याचे संकेत दिसतील. बऱ्याच जबाबदाऱ्या एकदम येतील कामाच्या ठिकाणी.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा मकर राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात ह्यांच्यासमोर प्रॉपर्टी, जागा जमीन जुमला ह्यांचे विषय असतील. तर त्यात सरकारी कामाच्या गोष्टी त्रासदायक असतील. आधीपासून जर त्रास असेल तर वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मकर राशी किंवा मकर लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. ह्या वेळेस मुलांच्या शिक्षण किंवा त्याच्या करिअरबद्दल च्या धावपळी आपल्या समोर असतील. काही जण इथे प्रॉपर्टी जामीन जुमला ह्यासाठी कार्यरत असतील. घेण्यास हरकत नाही. पण पझेशन घेऊ नये. किंवा ह्या कालावधीत घराच्या टॉयलेट चे काहीच काम करू नये.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मकर राशी किंवा मकर लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. इथे आपल्या कार्यात बदल दिसेल किंवा ट्रान्सफर होईल. काही जण नोकरी बरोबर काहीतरी व्यवसाय इथे सुरु करतील. पैसा मिळेल.
  • केतू तूळ राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे मकर राशी/लग्न च्या व्यक्तींना नोकरी व्यववसायात गुंतवणुकीचा काळ समजावा किंवा पैसे खर्च करण्याचा हाच कालावधी असेल. कोणत्याही गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम नाही करू नये. पैसे पुन्हा मिळणार नाहीत दगदग होईल. असा सल्ला दिला जातो कि ह्या कालावधीत सोने खरेदी करू नये मकर राशीच्या लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी. घरातील कार्य असेल तर त्यास लग्नाचे सोने आधीच खरेदी करू शकता. किंवा ह्या कालावधीत सोने गहाण किंवा कुणालाही उधार उसने देऊ नये. किंवा चोरीस जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. जर वरील कोणत्याच गोष्टी घडणार नसतील तर हा कालावधी सांसारिक धावपळ एखादी घडवीत आहे असे समजावे ज्यात अधिक त्रास होईल.
  • केतू तूळ राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. मागच्या कालावधीत केलेले श्रम इथे आपल्याला खूप चांगले परिणाम देत आहे. पैसा मिळेल. नोकरीत बढती होईल. व्यवसायात मोठी मजल मारलेली असेल.
  • केतू तूळ राशीत २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे मकर राशी किंवा लग्न वाल्याना घरापासून लांब जाण्याचा योग दिसत आहे. यात्रेपासून लाभ होतील. आईच्या तब्येतीकडे लक्ष देण्याचा हाल कालावधी समजावा वर दिल्याप्रमाणे.

उपाय —मकर लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक शनिवारी पिंपळाला मोहरी च्या तेलाचा दिवा लावावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply