You are currently viewing कमला एकादशी (पद्मिनी) एकादशी : २७ सप्टेंबर २०२०

कमला एकादशी २०२० : सध्या १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० अधिक मास सुरु आहे. अधिक मासात श्री हरी विष्णू आणि त्यांच्या सर्व रूपांची उपासना केल्याचे फळ हे अनंतगुणांनी वाढते.

महत्व कमला एकादशी चे

अधिक मास हे ३२ महिन्यांनी येतो आणि त्यात ३० दिवस पूर्ण हरीच्या कोणत्याही सेवेत राहावे असे शास्त्राप्रमाणे आहे तरी सुद्धा ह्या धकाधकीच्या जीवनात जर आपल्याला पूर्ण महिनाभर काही करता आले नाही तरी अधिक मासातल्या ह्या दोन्ही एकादशीचे व्रत करून ह्या मासाचे पूर्ण फळ मिळेल ह्यात शंका नाही. जर कुणाला बरीच वर्षे संतान प्राप्ती झाली नसेल त्यांनी सुद्धा ह्या एकादशीचा अनुभव घ्यावा.

कमला एकादशी ची कथा

श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला ह्या एकादशी चे महत्व समजून सांगितले कि अधिक मासात येणारी एकादशी त्याला कमला (पद्मिनी) एकादशी म्ह्णून संबोधिले जाते. पुरुषोत्तम मासात जो कोणी ह्या एकादशी चे व्रत विधी विधानाने करेल त्याला मृत्यूनंतर तो निश्चित पणे माझ्याजवळ वैकुंठात असेल.

श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सांगितले कि एके काळी पुलस्य मुनींनी हि कथा नारद मुनींना सांगितली.
त्रेतायुगात हयहय राजवंश मध्ये कृतवीर्य नावाचा राजा होता त्याला हजार पत्नी होत्या. पण त्याला कोणत्याही राणी पासून संतान प्राप्ती झाली नाही त्याने ह्यासाठी यज्ञ पूजा अर्चा सर्व काही करून पहिले पण त्यात त्याला यश मिळाले नाही.

कारण त्याला एका ऋषींचा शाप होता. ह्याने कंटाळून राजाने जंगलात जाऊन घोर तपस्या करण्याचा निर्णय घेतला आणि आपले राज्य आपल्या मंत्र्यांना सांभाळण्यासाठी दिले आणि तो जंगलात निघून गेला.

त्याने तपस्येला सुरुवात केली असता तिथे त्याच्या राणींमधील एक राणी जिचे नाव पद्मावती होते ती राजा हरिश्चन्द्राची गुणवान पुत्री होती. तिने पतिव्रता धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आणि सुख सुविधांचा त्याग करून कृतवीर्य बरोबर राहू लागली. राजा कृतवीर्याने गंधमादन पर्वतावर हजारो वर्षे भगवान विष्णूंची तपस्या केली तरी सुद्धा भगवंत त्याला काही प्रसन्न होईनात.

हे पाहता पद्मावती ला खूप दुःख झाले आणि ती सरळ सती अनसूया कडे गेली आणि तिने आपल्या पती बद्दल त्यांच्या तपस्येबद्दल सती अनसूया कडे सांगितले आणि त्याचा उपाय विचारला कि ज्याने तिच्या पतीची तपस्या पूर्ण होऊन नारायणाचे दर्शन होऊन तो चक्रवर्ती राजा बनेल आणि संतान सुख सुद्धा प्राप्त होईल.

सती अनसूयेने तिला अधिक मासात येणाऱ्या एकादशीचे व्रत विधी सांगितला. पद्मावतीने त्याचे तसेच पालन केले तिने निराहार व्रत करून ह्या रात्री जागरण सुद्धा केले तेव्हा नारायण तिला प्रसन्न होऊन तिच्या समोर प्रकटले आणि तिला आशीर्वाद देत पुत्र प्राप्ती चे वरदान देत म्हणाले कि सर्व मासात मला पुरुषोत्तम मास अधिक प्रिय आहे आणि जो कोणी व्यक्ती ह्या अधिक मासातल्या एकादशीचे व्रत करेल त्याला माझी कृपा प्राप्त होईल.

एकादशी ची व्रत विधी आणि एकादशी चे महत्व नियम हे माझ्या काही मागील एकादशीच्या पोस्ट वर वाचून घ्या.

>Kamika Ekadashi – कामिका एकादशी-16th July 2020

>एकादशी – हरिशयनी / देवशयनी / आषाढ़ी एकादशी

कमला एकादशी २०२० मुहूर्त

  • एकादशी तिथि आरंभ : २६ सप्टेंबर २०२० सायंकाळी ७ पासून
  • एकादशी तिथी समाप्ती : २७ सप्टेंबर २०२० सायंकाळी ७:४७ पर्यंत
  • एकादशी पारण (उपवास सोडणे) : २८ सप्टेंबर सकाळी ६:१० ते ८:२६ किंवा ९ पर्यंत.

धन्यवाद…..!

Leave a Reply