You are currently viewing कमला एकादशी- परमा एकादशी : १३ ऑक्टोबर २०२०

परमा एकादशी- सध्या १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० अधिक मास सुरु आहे. अधिक मासात श्री हरी विष्णू आणि त्यांच्या सर्व रूपांची उपासना केल्याचे फळ हे अनंतगुणांनी वाढते.

महत्व अधिक मासातील कृष्ण पक्षातल्या कमला (परमा) एकादशीचे

मागील २७ सप्टेंबर ला सुद्धा कमला (पद्मिनी) एकादशी होती ती शुक्ल पक्षातील होती आणि तिला पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणतात. अधिक मासातील जी कृष्ण पक्षातील एकादशी सुद्धा कमला एकादशी असते तिला परमा एकादशी म्हणून सुद्धा संबोधिले जाते

अधिक मास हे ३२ महिन्यांनी येतो आणि त्यात ३० दिवस पूर्ण हरीच्या कोणत्याही सेवेत राहावे असे शास्त्राप्रमाणे आहे तरी सुद्धा ह्या धकाधकीच्या जीवनात जर आपल्याला पूर्ण महिनाभर काही करता आले नाही तरी अधिक मासातल्या ह्या दोन्ही एकादशीचे व्रत करून घ्यावे असे मागील लेखात सुद्धा म्हटले आहे.

जर कुणाला अति दरिद्रता गरिबी ह्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यातून सुटण्यासाठी सुद्धा ह्या एकादशी चे व्रत करावे आणि त्याचा अनुभव पुढे घ्यावा.

कमला एकादशी ची कथा

श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला ह्या एकादशी चे महत्व समजून सांगितले कि अधिक मासात येणारी कृष्ण पक्षातील एकादशी त्याला कमला (परमा ) एकादशी म्ह्णून संबोधिले जाते. पुरुषोत्तम मासात जो कोणी ह्या एकादशी चे व्रत विधी विधानाने करेल त्याला आपल्या जीवनात कधीही दरिद्रता – गरिबी चा सामना करावा लागणार नाही.

श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सांगितले कि काम्पिल्य नगरात सुमेधा नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीसमवेत राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव पवित्रा होते. दोघेही धार्मिक होते. ते जनमानसाच्या सेवेत लिन होते. पण एक असा काळ त्याच्या जीवनात आला कि त्यांना दारिद्र्याचा सामना करावा लागला तेव्हा सुमेधा ने आपल्या पत्नीला ते गाव सोडून मी बाहेर जातो आणि तेथून काही तरी होईल का ते पाहतो असे सांगितले. तेव्हा पवित्रा म्हणाली कि व्यक्तीला धन आणि संतान सुख हे मागील जन्माच्या दान पुण्यावर मिळत असते. तेव्हा असा निर्णय घेऊ नका. आपण आलेल्या परिस्थितीशी सामना एकत्र करू.

त्याही परिस्थितीत त्याची पत्नी पवित्रा स्वतः उपाशी राहून आलेल्या अतिथी आणि साधुसंतांची सेवा करत होती तेव्हढेच दान पुण्य करत होती ती त्या गरिबीच्या अवस्थेत सुद्धा.

त्या दरम्यान कौंडिण्य ऋषी तेथे आले आणि दोघं पती पत्नींनी त्यांची सेवा केली त्यावर खुश होऊन आणि कौंडिण्य ऋषींनी त्यांच्या ह्या गरिबीच्या अवस्थेकडे पाहून कृष्ण पक्षातील कमला (परमा) एकादशी चे व्रत विधी विधानाने समजाविले.

तसे त्यांनी ते व्रत दोघं पती पत्नींनी केले आणि त्यानंतर त्यांना लगेच काही दिवसांनी त्यांच्या राजातल्या राजकुमाराने त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल त्यांना मानधन देऊन सन्मानित केले तेव्हापासून त्यांची गरिबी दूर झाली. आणि हे व्रत केल्यामुळे त्यांना वैकुंठ प्रवास सुद्धा झाला.

एकादशी ची व्रत विधी आणि एकादशी चे महत्व नियम हे माझ्या काही मागील एकादशीच्या पोस्ट वर वाचून घ्या.

https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi-16th-july-2020/

https://shreedattagurujyotish.com/ekadashi/

कमला एकादशी मुहूर्त

  • एकादशी तिथि आरंभ : १२ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ४:४० पासून
  • एकादशी तिथी समाप्ती : १३ ऑक्टोबर २०२० दुपारी २:३७ पर्यंत
  • एकादशी पारण (उपवास सोडणे) : १४ ऑक्टोबर सकाळी ६:२१ ते ८:४० किंवा ९ पर्यंत.

धन्यवाद…..!

Leave a Reply