You are currently viewing हरिशयनी / देवशयनी/ आषाढ़ी  एकादशी २० जुलै २०२१

पौराणिक महत्व

देवशयनी एकादशी विषयी पुराणांत विस्तारपूर्वक वर्णन आहे त्या अनुसार भगवान विष्णू जे श्रुष्टी चे पालनकर्ता आहेत ते ह्या एकादशी पासून ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत ४ महिने पाताळ लोकी निवास करतात.सूर्य तुला राशीत जेव्हा प्रवेश करेल तेव्हा प्रबोधिनी एकादशी असते आणि त्या एकादशी ला देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात. (आषाढ़ी एकादशी २०२१)

ह्या ४ महिन्यात भगवान विष्णू क्षीर सागर मध्ये अनंत शय्या वर शयन करतात. ह्या मुळे धार्मिक कार्य ह्या ४ महिन्यात होत नाहीत. महत्वाचे कारण असे सुद्धा सांगितले जाते कि ह्या ४ महिन्यात शेती ची कामे जोर धरतात म्हणून लोकांनी जास्त धार्मिक कार्यात वेळ घालवू नये ह्यासाठी सुद्धा ह्याची प्रथा आपल्या ऋषीमुनींनी मांडून ठेवली असेल असे मी वाचले आहे.

पौराणिक ग्रंथात एका कथेवरून जेव्हा भगवान विष्णू वामन रूपात दैत्य राजा बली कडून ३ पाऊल भूमी मागतात तेव्हा भगवान पहिल्या पावलाने सर्व ४ दिशेने पृथ्वी आणि आकाश मापून घेतात, दुसऱ्या पावलाने स्वर्ग मोजतात, तिसरे पाऊल आता कुठे ठेवायला जागा नसते म्हणून खुद्द बली राजा ३ पावलाचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवण्यास सांगतो ज्याने त्याची वचन पूर्ती होते. ह्याने खुश होऊन बली ला पाताळ लोकी राजा होण्याचा आशीर्वाद भगवान विष्णू कडून मिळतो.आणि बली राजा भगवंतांना विनंती करतो कि तुम्ही माझ्या पाताळ लोकी सतत वास्तव्य करा. ह्याने माता लक्ष्मी ला चिंता होते आणि म्हणून माता लक्ष्मी ने बली राजा ला आपला भाऊ मानून त्याच्याकडून फक्त ४ महिन्यासाठी भगवंतांना पाताळलोकी वास्तव्य राहण्याची विनंती करते. 
आणि तेव्हापासून देवशयनी एकादशी ते देवऊठणी एकादशी हे ४ महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात.

एक क्लिअर प्रोग्रॅम ब्रम्हा विष्णू महेश यांचा पाताळ लोकी कार्यक्रम 

देवशयनी ते देव उठनी (प्रबोधिनी) एकादशी पर्यंत विष्णू त्यानंतर महाशिवरात्री पर्यंत शिव आणि शिवरात्री ते देवशयनी एकादशी पर्यंत ब्रह्मा पाताळ लोकी राहतात .

देवशयनी एकादशी मुहूर्त

  • देवशयनी एकादशी तिथी प्रारंभ – १९ जुलै २०२१ रात्री १०:०१ पासून.
  • देवशयनी एकादशी समाप्ती – २० जुलै संध्याकाळी ७:१९ २०२१ पर्यंत.
  • देवशयनी एकादशी व्रत पारण-(उपवास सोडणे) २१ जुलै २०२१ सकाळी ५:३६ पासून ते सकाळी ८:२१ पर्यंत.

एकादशीच्या अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून वाचन करावे

कशी करावी एकादशी , काय करावे काय करू नये
https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi

एकादशी टिप्स
https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-wednesday-11-november-2020/

धन्यवाद…..!

Leave a Reply