You are currently viewing प्रबोधिनी एकादशी- देव उठनी एकादशी- १४ नोव्हेंबर २०२१

प्रबोधिनी एकादशी– देव उठनी एकादशी- विष्णूप्रबोधोत्सव- कार्तिक शुक्ल एकादशी- दिनांक १४ नोव्हेंबर २०२१

मुहूर्त

  • एकादशी आरंभ:- दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ पहाटे ५:५०
  • एकादशी समाप्ती:- दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ सकाळी ६:४२
  • द्वादशी तिथी:- १५ नोव्हेंबर २०२१ सकाळी ६:४२ पासून १६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ८:०४ पर्यंत
  • १४ नोव्हेंबर २०२१ सूर्योदय ६:४५ पासून सूर्यास्त सायंकाळी ६:०० पर्यंत
  • १५ नोव्हेंबर २०२१ सूर्योदय ६:४५ पासून सूर्यास्त सायंकाळी ६:०० पर्यंत
  • १४ नोव्हेंबर २०२१ — स्मार्त एकादशी
  • १५ नोव्हेंबर २०२१ — भागवत एकादशी

वरील सर्व वेळा ह्या मुंबई च्या आहेत. आपल्या प्रदेशात सूर्योदय जर ६:४० च्या पूर्वी असेल तर एकादशी हि १५ नोव्हेंबर ला करावी. ह्यासाठी आपल्या घरातील दैनिक कॅलेंडर पहावे. अथवा गूगल चा सहारा घ्यावा.

१४ नोव्हेंबर २०२१ ला ६:४० नंतर सूर्योदय असणारी महाराष्ट्रातील शहरे खालील प्रमाणे आहेत.
मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, सातारा, चिपळूण, रत्नागिरीसह मालवणच्या उत्तरेकडील संपूर्ण कोंकण

१५ नोव्हेंबर २०२१ ला ६:४० च्या अगोदर सूर्योदय होणारी महाराष्ट्रातील शहरे खालील प्रमाणे आहेत.
पंढरपूर, सोलापूर, कोलापूर, कऱ्हाड, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, लातूर, नांदेड, बीड, जालना, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ह्या शहरात एकाच दिवशी १५ नोव्हेंबर ला प्रबोधिनी एकादशी आहे.

ज्यांची एकादशी १४ नोव्हेंबर ला असेल त्यांनी उपवास दिनांक १५ नोव्हेंबर दुपारी १ ते ३:१९ पर्यंत सोडावा. दुपारी १४ तारखेला हरिवासर दुपारी १ पर्यंत आहे.

ज्यांची एकादशी १५ नोव्हेंबर ला असेल त्यांनी उपवास दिनांक १६ नोव्हेंबर सकाळी ६:१६ ते सकाळी ८:०४ पर्यंत सोडावा.

तुलसी विवाहरभ – पंढरपूर यात्रा – चातुर्मास समाप्ती दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ ला असेल.

वरील मुहूर्त सोडून अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकतात. ह्यात आपल्याला प्रबोधिनी एकादशी चे महत्व आणि शाळीग्राम ची कथा ह्याविषयी अधिक माहिती मिळेल.

एकादशी चे महत्व आणि शाळीग्राम ची कथा

धन्यवाद…..!

Leave a Reply