अधिक मास
पुरुषोत्तम मास
अधि माह
मल मास
शुक्रवार १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर पर्यंत अधिकमास चा अवधी आहे.
काय आहे अधिक मास
तीन वर्षातून एकदा साधारण ३२ महिन्यानंतर हा मास येतो.
प्रत्येक महिन्यात १३,१४,१५,किंवा १६ तारखेला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो ह्या सूर्याच्या स्थितीला सूर्य संक्रमण म्हणतात. साधारणता सूर्य एका राशीत ३० दिवस असतो.
हि प्रक्रिया चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन ह्या महिन्यांत एकदा तरी होते कि सूर्य आपल्या राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
मात्र जर कोणत्याही महिन्यात हि प्रक्रिया होत नसेल तर त्या महिन्याला अधिक मास म्हणतात.
जसे ह्या वर्षी भाद्रपद महिना दिनांक १७/९/२०२० रोजी संपत आहे आणि नंतर अश्विन महिना सुरु होतो. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते मात्र ह्या वर्षी सूर्य हा पूर्ण अश्विन महिन्यात एकदा सुद्धा त्याने त्याची राशी बदलेली नाही.
दिनांक १६ तारखेलाच तो अमावास्ये आधि सिंह राशीतून कन्या राशीत गेला. आणि नंतर अश्विन महिना सुरु झाला. आणि ३० दिवसानंतर १७ ऑक्टोबर ला तो कन्या राशीतून तुला राशीत जात आहे आणि अमावस्येनंतर तो जाईल.
सध्या सोप्या भाषेत जर म्हणायचे झाले तर अशा वेळी एक अमावस्या पासून पुढील अमावस्या पर्यंत सूर्याचे संक्रमण हे एका राशितून दुसऱ्या राशीत होत नाही तोच अधिक मास म्हणून मनाला जातो (एरव्ही असे दिसत नाही). म्ह्णून ह्याला मल मास अर्थात अधिक मास म्हणतात.
खगोल शास्त्रीय दृष्ट्या
अधिक जाणून घेण्यासाठी खालील माहिती हि आपल्याला जास्त मदत करेल.
भारतीय गणना पद्धतीनुसार सूर्य १२ राशी कापायला ३६५ दिवस आणि ६ तास लावतो आणि चंद्राला हाच काळ ३५४ दिवस लागतात.
चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष ह्यात ११ दिवसाचा फरक पडतो जो तीन वर्षात एका महिन्यांबरोबर होतो.
ह्यासाठी चंद्राचा एक मास वाढतो त्याला १३ वा महिना म्हणतात अर्थात अधिक मास.
हा काळ साधारण तर तीन वर्षानंतर ३२ महिन्यानंतर येतो. सूर्यसंक्रमणाचा क्षय होतो ह्यावेळी म्हणून त्याला क्षय मास सुद्धा म्हणतात.
भगवान विष्णुं चा हा मास मानतात म्हणून ह्याला पुरषोत्तम मास सुद्धा म्हटले जाते.
पुढील भागात ह्या बद्दल अधिक माहिती देण्यात येईल.
धन्यवाद…..!