You are currently viewing इंदिरा एकादशी- १३ सप्टेंबर २०२०

इंदिरा एकादशी महत्व

इंदिरा एकादशी- भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी हि एकादशी नेहमी पितृ पंधरवड्यात येत असल्यामुळे अशी मान्यता आहे कि ह्या एकादशी च्या व्रताचे पुण्य हे आपल्या पितरांना गती मिळण्यासाठी त्यांचा वैकुंठ प्रवास सुलभ होण्यासाठी किंवा यमलोकातल्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी उपयोगात येते.

इंदिरा एकादशी कथा

महाभारत काळात धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, “हे भगवान! भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे? कृपया मला त्याची पद्धत आणि फळे सांगा. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले कि या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पापांची नासधूस करुन पितरांना अधोगतीपासून मुक्त करील आणि मग श्रीकृष्ण कथा सांगतात ती अशी.

प्राचीन काळातील सतयुगाच्या काळात, इंद्रसेन नावाच्या भव्य राजाने महिषमती नावाच्या शहरात त्याच्या प्रजेचे प्रामाणिकपणे पालन केले. असे म्हणतात की राजाला कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती.

पुत्र, नातू आणि पैसा इत्यादींनी युक्त असलेला हा राजा विश्वाचा निर्माता भगवान विष्णूचा परम भक्त होता. एक दिवस राजा आपल्या सभेत आनंदाने बसला होता की अचानक महर्षी नारद आकाश मार्गावरून खाली उतरले आणि त्याच्या भेटीला आले. त्यांना पाहिल्यावर, राजा हात जोडून उभा राहिला आणि त्याने त्याचे स्वागत केले.

नारदाने राजाला विचारले कि हे राजन! आपले सात अंग तर कुशलपूर्वक कार्यरत आहेत ना ?
आपली बुद्धी धर्मात आणि आपले मन विष्णू भक्तीमध्ये राहते ना ? नारद मुनीच्या अशा गोष्टी ऐकून राजा प्रथम चकित झाला परंतु नंतर नम्रपणे सांगितले. कि आपल्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे आणि राज्यात धार्मिक कार्ये सुद्धा वेळोवेळी पार पडली जात आहेत. पण आपण येण्याचे खरे कारण सांगावे.

हे राजन मी जे पाहून आलो आहे ते जाणणे तुला अत्यंत आवश्यक आहे. मागील काही दिवसात मी ब्रह्मलोकातून यम लोकी गेलो असता तेथे मला तुमच्या पित्याचे दर्शन झाले. मला जाणून अति दुःख झाले कि एक धर्मशील राजा हा यमलोकी कसा असू शकतो. अधिक चौकशी करता मला असे कळले त्यांच्याकडून कि त्यांनी एकादशीचे व्रत भंग केल्यामुळे त्यांना हे दिवस पाहण्यास मिळत आहेत. मग त्यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे आणि ह्या व्रताला पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

राजाने लगेच नारद मुनींना ह्या पितृपक्षातील एकादशी चा विधी विचारला त्यात नारदाने राजाला सांगितले कि हे राजन तू ह्या व्रतात सकाळी लवकर उठून स्नान करून संकल्प करून घे कि आज दिवसभरातील एकादशीचे पुण्य कर्म मी माझ्या पितरांच्या नावे दान करीत आहे.

तसे राजाने केले आणि विधिपूर्वक त्या दिवशी श्राद्ध कर्म तर्पण सुद्धा केले. ह्याने लगेच त्यांचे पिता हे यमलोकातून वैकुंठ स्थानी प्रवासास निघाले. तेव्हा पासून ह्या एकादशीला इंदिरा एकादशी हे नाव देण्यात आले

एकादशी मुहूर्त

  • एकादशी प्रारंभ: १३ सप्टेंबर सकाळी ४:१५
  • एकादशी समाप्त: १४ सप्टेंबर पहाटे ३:१८

पारण (उपवास सोडण्याची वेळ) १४ सप्टेंबर दुपारी १२:५९ ते ३:२७ पर्यंत.

एकादशीचे व्रत कसे करावे हे खालील लिंक वर अवश्य वाचून प्रत्येक एकादशीचे नियम हे पाळून निश्चिंत राहावे.
एकादशी चे व्रत:- https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi-16th-july-2020/

धन्यवाद…..!

Leave a Reply