You are currently viewing एकादशी – हरिशयनी / देवशयनी / आषाढ़ी एकादशी

महत्व एकादशी चे

एकादशी चे व्रत हे सर्व व्रतात मुख्य मानले जाते. एकादशी ज्या घरात होते त्या घरात अपमृत्यू सहसा होत नाहीत. एकादशी ज्या घरात होते त्या घरात चार हजारात ४० ००० /- ची ऍडजस्टमेन्ट होते.एकादशी जो कोणी करेल त्याला कधीही हॉर्मोन्स चा अन बॅलन्स राहत नाही. एकादशी च्या व्रतात मानसिक संतुलन होण्यास मदत होते.

  • पत्रिकेतील चंद्र कमकुवत असेल.
  •  ० ते ५ डिग्री चा जन्माच्या वेळी नीच राशीत असेल.
  •  राहू केतू च्या नक्षत्री किंवा त्यांच्या युतीत असेल.
  • चंद्र च्या मागे पुढे कोणताही ग्रह नसेल आणि त्याला कोणताही शुभ ग्रह पाहत नसेल. ( केंद्रम योग)

वरील सर्व स्थितीत चंद्र पासून ची फळे चांगली मिळत नाहीत.  

अशा वेळी आईला सुख देताना आणि तिला सुख देताना त्रास होतो स्वतः आईच्या आयुष्यात जास्त त्रास जबाबदाऱ्या असतात.म्हणून ह्यात एकादशी चे व्रत करणे जरुरीचे आहे. 

एकादशी च्या व्रताने मागची पिढी आणि पुढची पिढी दोन्ही बॅलन्स होतात. मागच्या पिढीचे दोष पुढे येण्यास किंवा पितृ दोषाचे त्रास वगैरे आणि पुढील पिढ्या व्यवस्थित मार्गक्रमण होण्यास मदत होते. 

एकादशी च्या व्रतात विष्णू रुपी कोणत्याही देवतेचे पूजन केल्याने जसे कृष्ण विठ्ठल वगैरे त्यात हा मुळात जगाचा पालन करता असल्याने ह्या व्रताचा नक्की फायदा हा कमी व्याप देऊन दिनक्रम व्यवस्थित चालण्यासाठी असतो.

मग आता करणार कि नाही एकादशी ?

कशी करावी एकादशी

तुम्ही आत्तापर्यंत जशी करता आहात तशीच करा पण काही जण खूप नियम पाळतात आणि नंतर जमत नाही.कारण बऱ्याच व्यापात सध्या लोक असल्याने त्यांना सर्वच गोष्टी जमत नाहीत.

पुढील स्टेप्स ह्या एकादशीच्या उपवासाच्या असतील तर वाचून घ्या.

  • ज्यांना एकादशी करता येत नाही त्याच्यासाठी

उपवास अगदीच जमत नसेल तर एकादशी च्या दिवशी पूर्ण दिवस हरी नाम / कृष्ण कृष्ण किंवा कोणताही विष्णू मंत्र जपावा. खाण्यापिण्यात सत्विकता बाळगावी. ह्या दिवशी भात खाऊ नये.नाश करू नये. चुगली / निंदा करू नये.मोठ्याने बोलू नये. आज एकादशी आहे हा शब्द जेव्हा जेव्हा बोलायला मिळेल इतरांशी ह्याची सतत चर्चा करत राहावी.

  • जे उपवास करतात त्याच्यासाठी

उपवास करत असाल तर फळे दूध वगैरे घेऊ शकता. पण हा उपवास खरा दशमी पासून सुरु होतो म्हणजे आदल्या दिवसापासून, त्यात आदल्या दिवशी रात्री भात खाण्यास मनाई आहे (ह्याचे पौराणिक कारण आणि वैज्ञानिक कारण पुढील पोस्ट मध्ये देतो).

एकादशी च्या दिवशी सकाळी नित्य क्रमात विठ्ठल / कृष्ण ह्यांची पूजा करावी जमेल तशी. ह्यात महत्वाचे कि घरात जर कृष्ण असेल तर गेली १५ दिवस त्याला अंघोळ घातलेली नसेल तर ह्या दिवशी तुमचे कर्त्यव्य असते मूर्ती स्थापना केली त्याची म्हणून अंघोळ घालणे. (लोक तशीच मूर्ती घरात ठेवतात काळी कुट्ट) त्यापेक्षा न ठेवलेली बरी जर एकादशीला तरी त्याला स्नान धूप नैवेद्य दाखवता ये नसेल.

स्नान घालताना पंचामृताचा वापर करून घ्यावा. घरात शंख नाद जरूर करावा. कोणत्याही एकादशी ला दक्षिणावर्त शंख स्थापन केलेला उत्तम त्यात पंचामृत घालून कृष्णाला स्नान घालावे (नसेल तरी असेच घालावे). हे तीर्थ घरातील प्रत्येकाला खास लहान मुलांना पाजणे उत्तम.  

देवळात जाऊ शकता खास दर्शनासाठी (हे उत्तम)

जाताना घरातून परिसरातल्या एखाद्या गायीला गौ ग्रास द्या जर ह्यात घरातील गूळ + चणा डाळ घेऊन जात असाल तर उत्तम. (चणा डाळ हि खास भिजविलेले असावी.)

दुपारी एखाद्या गरिबाला अन्न दान करता येते का ते पाहावे किंवा मदत तरी करावी दुपारी खास (मध्यान्ही जेव्हा सावली तुमची ० असते तेव्हा जर त्या दिवशी ह्या वेळी दान केले तर ते आपल्या पितरांना पोहचते).

संध्याकाळी दिवाबत्ती वेळी किंवा हि वेळ जमत नसेल तर रात्री आहारापूर्वी विष्णू सहस्त्रनाम जरूर वाचावे. कोणताही हरिनामाचा पाठ सुद्धा करू शकता. श्री सूक्त सुद्धा उत्तम ह्या दिवशी. तीन सांजेला Ekadashi च्या दिवशी पिंपळाला आणि शिव पिंडी जवळ तुपाचा दिवा लावणे उत्तम जमेल तर हे सुद्धा करावे. 

फलाहार झाल्यानंतर रात्री निजताना विष्णू / राम / विठ्ठल ह्यांचा नाम जप करून झोपावे तसे एकादशी ला जागरण करणे अति महत्वाचे असते. लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते.

वरील कार्यक्रम करताना घरातील सर्व सदस्यांनी हे वाटून घेऊन जास्तीत जास्त केले तर पूर्ण फळ त्या घराण्याला ३ वर्षात मिळेल ह्यात शंका नाही.

ह्या दिवशी कधीही शारीरिक संबंध करू नयेत पुढील पिढयांना खूप त्रास सहन करावा लागतो.

हरिशयनी / देवशयनी/ आषाढ़ी  एकादशी पौराणिक महत्व.

दिनांक १ जुलै २०२० ला देवशयनी आषाढी Ekadashi आहे. देवशयनी एकादशी विषयी पुराणांत विस्तारपूर्वक वर्णन आहे त्या अनुसार भगवान विष्णू जे श्रुष्टी चे पालनकर्ता आहेत ते ह्या एकादशी पासून ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत ४ महिने पाताळ लोकी निवास करतात.सूर्य तुला राशीत जेव्हा प्रवेश करेल तेव्हा प्रबोधिनी एकादशी असते आणि त्या एकादशी ला देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात.

ह्या ४ महिन्यात भगवान विष्णू क्षीर सागर मध्ये अनंत शय्या वर शयन करतात. ह्या मुळे धार्मिक कार्य ह्या ४ महिन्यात होत नाहीत. महत्वाचे कारण असे सुद्धा सांगितले जाते कि ह्या ४ महिन्यात शेती ची कामे जोर धरतात म्हणून लोकांनी जास्त धार्मिक कार्यात वेळ घालवू नये ह्यासाठी सुद्धा ह्याची प्रथा आपल्या ऋषीमुनींनी मांडून ठेवली असेल असे मी वाचले आहे.

पौराणिक ग्रंथात एका कथेवरून जेव्हा भगवान विष्णू वामन रूपात दैत्य राजा बली कडून ३ पाऊल भूमी मागतो तेव्हा भगवान पहिल्या पावलाने सर्व ४ दिशेने पृथ्वी आणि आकाश मापून घेतात, दुसऱ्या पावलाने स्वर्ग मोजतात, तिसरा पाऊल आता कुठे ठेवायला जागा नसते म्हणून खुद्द बली राजा ३ पावलाचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवण्यास सांगतो ज्याने त्याची वचन पूर्ती होते. ह्याने खुश होऊन बली ला पाताळ लोकी राजा होण्याचा आशीर्वाद भगवान विष्णू कडून मिळतो.आणि बली राजा भगवंतांना विनंती करतो कि तुम्ही माझ्या पाताळ लोकी सतत वास्तव्य करा. ह्याने माता लक्ष्मी ला चिंता झाली आणि म्हणून माता लक्ष्मी ने बली राजा ला आपला भाऊ मानून त्याच्याकडून फक्त ४ महिन्यासाठी भगवंतांना पाताळलोकी वास्तव्य राहण्याची विनंती केली. 

एक क्लिअर प्रोग्रॅम ब्रम्हा विष्णू महेश यांचा पाताळ लोकी कार्यक्रम 

देवशयनी ते देव उठनी (प्रबोधिनी) Ekadashi पर्यंत विष्णू त्यानंतर महाशिवरात्री पर्यंत शिव आणि शिवरात्री ते देवशयनी एकादशी पर्यंत ब्रह्मा पाताळ लोकी राहतात म्हणून आपण पुढील  ४ महिने शिव उपासना जास्त करतो (खास श्रावणात).

बघा जमले तर एकादशी करून बऱ्याच व्यापातून मुक्त व्हाल

Leave a Reply