You are currently viewing अधिक मास विशेष भाग- २

अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात.

हिरण्यकश्यप चा वध करण्यासाठी भगवंताने ह्या अधिक मासाची योजना केलेली दिसते.

पौराणिक कथेनुसार दैत्य राजा हिरण्यकश्यप कोणत्याही विष्णू शक्तीला मानत नव्हता आणि त्याचे अत्याचार हे वाढत चालले होते त्यात त्याने आपल्या पोटच्या मुलावर प्रल्हादावर सुद्धा अत्याचार करण्यास मागे पुढे पहिले नाही. हिरण्यकश्यपाने घोर तपस्या करून ब्रह्म देवाकडून वरदान मिळविले होते कि त्याचा मृत्यू हा ना सकाळी ना रात्री, ना घरात ना बाहेर , ना अस्त्राने ना प्रहाराने, आणि कोणत्याही १२ महिन्यात होणार नाही.

त्याची जेव्हा वेळ आली तेव्हा भगवान विष्णूनी नरसिंह रूप घेतले जे अर्धे पुरुष आणि अर्धे प्राण्याचे होते. ह्या वधात त्याने त्याच्या महालाच्या उंबरटयावर बसून त्याचा वध केला कारण हि जागा ना घरात होती ना घराच्या बाहेर होती.

भगवंतांनी त्याचा वध गोधुली वेला मध्ये केले ज्या वेळी ना दिवस होता ना रात्र होती. त्याला चिरण्यासाठी ह्या वधात नखांचा प्रयोग केला गेला ज्याने त्याच्यावर कोणत्याही शस्त्र अस्त्राचा प्रयोग केला गेला नाही. आणि तो कोणताही महिना नव्हता चैत्रापासून पुढील १२ महिन्याचा. मुद्दामून अधिक मास ची निर्मिती त्यामुळेच भगवंतांनी केली असावी.

भगवान विष्णूनी ह्याच सर्व गोष्टींचे पालन करून त्याचा वध केला. आणि समाजाला त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले. तो १३ वा महिना हा अधिक मास होता आणि म्हणून ह्याला पुरुषोत्तम मास म्हणतात.

चैत्र पासून १२ महिन्याचे काही ना काही महत्व असते पण त्यावेळी ह्या मासाचे काहीही महत्व नव्हते कारण ह्यात सूर्याचे संक्रमण होत नसल्यामुळे कोणतेच शुभकार्य होत नव्हते. ह्याला मल मास म्हणून सर्वानी बाजूला केले होते. (मल म्हणजे घाण )

पुराणांमध्ये अशी एक कथा येते कि ह्या मलमास ची देवीने आपले हे दुःख श्रीकृष्णाकडे मांडले आणि ह्याला कृष्णाने आपले नाव जे पुरषोत्तम सुद्धा आहे ते ह्या मासाला दिले. आणि असे वरदान दिले कि आत्तापासून पुरुषोत्तम मास मध्ये जो कोणी दान पुण्य विष्णू भक्ती करेल तो पूर्ण सुखी होईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply