You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : कन्या राशी/कन्या लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ कन्या राशी/कन्या लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

वरील कुंडली हि कन्या राशीची चंद्र कुंडली आहे आणि कन्या राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली कन्या राशी किंवा लग्न कुंडली कन्या असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

कन्या राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा षष्ठ / सहाव्या स्थानात येत आहे. हे स्थान रोग ऋण आणि जॉब चे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती थोडे मिश्रीत फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या षष्ठ स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या चतुर्थ स्थानी आहे. घरातील काही काळजी लागेल. प्रॉपर्टीज जागा फ्लॅट नवीन खरेदी नको विक्री चालेल. स्वतःच्या सुखासाठी धावपळ दिसेल. जॉब वरील ताण वाढेल.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या सप्तम स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा सहाव्या स्थानी भ्रमण करणार आहे म्हणून १४४ दिवसात पत्नीपासून दुरावा किंवा पत्नीला आजारपण ह्यापासून सावधान. काही कोर्ट केसेस असतील तर त्यावर जास्त धावपळ दिसेल. स्वतःला बरोबर दाखविण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : सिंह राशी/सिंह लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान पत्रिकेतील व्यय स्थान आहे जॉब साठी किंवा आपल्या सर्विसेस देण्यासाठी आपण बाहेर जाऊ शकाल. ह्या समयी कुणाला जर देशाबाहेर जाण्याचे प्रयत्न करायचे असतील तर त्यात चांगले. एखादी गुंतवणूक कराल ती चांगली असेल. सल्ला असा दिला जातो कि जर आपण ह्या १४४ दिवसात कोणत्या प्रोपेरीज विकून पैसा मिळविला असेल तर लगेच गुंतवणूक करून घ्या. काही आजारपण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात पैसा खर्च होईल. जन्मस्थळापासन दूर जाऊन ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला जातो.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान आपल्या कर्म स्थानाचे आहे म्हणून करिअर साठी हा काळ उत्तम असेल काही नवीन व्यापार किंवा सर्विसेस मध्ये नवीन सुरुवात दिसेल. पण त्यात पैसा गुंतवावा लागेल. आपले स्किल लावण्याची हि उत्तम वेळ असेल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या कुटुंब स्थानाचे आणि धन स्थानाचे आहे. ह्या गोष्टीत आपणाला जास्त सर्विस देऊन फळ मिळवावे लागेल. पण आपण सेफ असाल. पैसा येईल पण जास्त खर्च होईल. कुटुंबात मंगल कार्य होईल. अशांचे मंगलकार्य होईल ज्यांचा आधी घटस्फोट वगैरे झाला असेल त्यांना हि संधी उत्तम आहे. कुटुंबाची एखादी जुनी काळजी मिटविण्याचा प्रयत्न कराल.

काळजीचे काही मुद्दे

कन्या लग्न आणि कन्या राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल. गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या व्यक्तिमत्वाचे आहे. आपणाला स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी विशेष धावपळ करावी लागेल. लगेच कामे होणार नाहीत. काही प्रमाणात आपल्याकडे असलेले कॅल्क्युलेशन हे कामी न आल्यामुळे आपण त्रस्त व्हाल.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या पंचम स्थानी येत आहे. काही वेळा रिकामे राहण्याचा योग्य आहे सावधान. आपल्या स्किल चे प्रमोशन करण्यासाठी आपणास भरपूर प्रयत्न करून घ्यावे लागतील. मुलांसाठी जास्त वेळ द्यावा लागेल. विद्यार्थाना शिक्षणात थोडी जास्त मेहनत करावी लागेल.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान लाभ स्थान आहे . त्यामुळे काही लाभ अडकण्याची संभव बनतील इच्छा लगेच पूर्ण होताना दिसत नाही. तरी सुद्धा आपण सेफ असाल. जास्त काळजी करावी लागणार नाही. मोठ्या भावंडांपासून आपणास हा काळ दगदगीचा दिसेल किंवा त्यांना असे होऊ शकेल.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण कन्या राशी/लग्न साठी खास नाही कारण मंगळाची वृश्चिक राशी ३ ऱ्या स्थानी आणि मेष राशी अष्टमात येत आहे ३रे आणि ८ वे स्थान ऍक्टिव्ह असेल म्हणून दगदगी पासून सावधान काळजी घेणे.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे पराक्रमाची प्रयत्न कराल. पण मोठी झेप नको. लहान भावंडाना त्रास दिसेल

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. कन्या लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा सध्या नवम स्थानातून जात आहे. म्हणून हा काळ आपणास नवीन भाग्योदयासाठी नवीन नवीन कल्पना देईल करिअर चा निर्णय घ्याल अन नवीन काही करायचा प्लान कराल परदेशातील कन्या राशी साठी हा काळ उत्तम असेल

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी आरोग्य कर्ज सर्व प्रकाच्या सर्विसेस हे विषय समोर असतील त्यात आपण जास्त प्रयत्नशील असाल.

धन्यवाद…..!

Leave a Reply