You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : सिंह राशी/सिंह लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ सिंह राशी/सिंह लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ सिंह राशीसिंह लग्न

वरील कुंडली हि सिंह राशीची चंद्र कुंडली आहे आणि सिंह राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली सिंह राशी किंवा लग्न कुंडली सिंह असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

सिंह राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा सप्तम/ सातव्या स्थानात येत आहे. हे स्थान आपल्या वैवाहिक सुखाचे आहे व्यापाराचे आणि आपल्या बिझिनेस पार्टनर चं आहे.. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम असेल तो वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या सप्तम स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या पत्रिकेत पंचम स्थानी येते जेव्हा ह्या स्थानाचा स्वामी वैवाहिक सुखाच्या स्थानी जातो आहे तेव्हा सिंह राशि किंवा लग्नाच्या व्यक्तींना प्रेमप्रकणात यश मिळेल. विवाह योग उत्तम आहेत. जोडीदाराकडून सल्ला मिळेल. व्यापार करीत असाल तर पार्टनर चे सहकार्य मिळेल. शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे.

12 नंबर ची मीन राशी आपल्या कुंडलीत अष्टमात आहे म्हणून ह्या समयी जे जे मिळेल ते धावपळ करूनच. थोडे कष्ट होतील पण त्यात तुम्ही मॅनेज करू शकाल. आयते मिळविण्यासाठी प्रयत्न करू नये. आरोग्याकडे विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्यांना ह्या आधी पशन वगैरे साठी प्रयत्न करावा लागला असेल त्यांना अजून उशीर होताना दिसेल.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : कर्क राशी/कर्क लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.तुम्ही स्वतःसाठी चांगले विचार करू शकाल. मानसन्मान वाढेल. एक चांगली पॉसिटीव्हिटी तुमच्यात निर्माण होईन चांगले कार्य हाती घ्याल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान आपल्या लाभ आणि इच्छापूर्तीचे आहे तसेच आपल्या मित्र मैत्रिणींचे आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यापारात चांगले लाभ होतील.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या नेटवर्क चे आहे आपले नेटवर्क वाढेल. भरपूर चांगल्या मोठ्या लोकांशी संपर्क होईल. लहान भावंडाना हि वेळ उत्तम आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण खुलून दिसाल. पराक्रम स्थानावर गुरु ची दृष्टी आपल्याला बऱ्याच क्षेत्रात चांगली कामगिरी दाखवेल.

काळजीचे काही मुद्दे

सिंह लग्न आणि सिंह राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल. गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या कुटुंबाचे आहे आणि धन स्थानाचे सुद्धा आहे. कुटुंबासाठी पैसे खर्च होईल. कौटुंबिक कलह होणार नाही ह्याकडे लक्ष द्या.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या षष्ठ / सहाव्या ष्टम स्थानी येत आहे. नोकरीत थोडा त्रास होईल काही बदल घडतील ते तुमच्या इच्छेविरुद्ध असू शकतात हे इशू जे जन्मस्थळापासून दूर आहेत त्यांना जास्त होतील.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान व्यय स्थान आहे परदेश वारी इथून पाहतात ह्याबद्दल थोडा त्रास आहे. परदेशातून अशुभ समाचार मिळतील.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण सिंह राशी/लग्न साठी उत्तम आहे कारण मंगळाची दोन स्थान 4/9 ऍक्टिव्हेट होणार आहेत त्याने आपल्या मातृसुख आणि प्रॉपर्टीज बद्दल चांगले दिसेल. एखादा बदल नक्की दिसेल. घर/प्रॉपर्टी बदलण्याचा किंवा शिफ्टिंग होण्यास हा काळ उत्तम आहे.

मंगळ ५ डिसेंबर पर्यंत तुला राशीत असेल आणि गुरु तेथून मंगळावर आपली ९वी दृष्टी टाकत आहे. तुला राशी पराक्रमात आहे मंगळ तेथे आपल्या पराक्रमात वाढ करेल. काही नवीन करण्याचा किंवा बदल करण्याचा प्रयत्न कराल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे ह्यात घराच्या बाबतीतले विषय आपल्या समोर असतील. एखाद्या नवीन प्रॉपर्टीज मध्ये हात घालू शकाल. घरातल्या कोणत्याही सुखासाठी आपण तत्पर असाल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. सिंह लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा सध्या दशम स्थानातून जात आहे. म्हणून आपल्याला नवीन व्यापार करण्यासाठी इच्छा निर्माण होईल. नोकरीत असणाऱ्यांना पार्टटाइम करावा लागेल. किंवा ते काही अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. दशमात राहू हा सिंह राशी लग्नाच्या लोकांना चांगले फळ देत नाही म्हणून बरीच मोठी उडी नको

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी सर्वात उत्तम असेल. गुरु च्या भ्रमणातील सर्वात उत्तम काळ हा असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply