You are currently viewing गुरुचा कुंभ राशीत प्रवेश- दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ते १३ एप्रिल २०२२

गुरुचा कुंभ राशीत प्रवेशगुरु हा ग्रह साधारण एका राशीत १३ महिने किंवा वर्षभर असतो नंतर तो पुढील राशीत असतो.
मात्र ह्यावेळी गुरु फक्त १४४ दिवस कुंभ राशीत असेल. मागील गुरु चे हे भ्रमण मकर राशीत होते तेव्हा तो २० नोव्हेंबर २०२० ते २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मकर राशीत होता. (Guru Rashi Parivartan 2021)

परंतु ६ एप्रिल २०२१ ला गुरु कुंभ राशीत आला होता आणि १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत तो तेथे मार्गी आणि वक्री ह्या दोन्ही अवस्थेत होता.

गुरु चे कुंभ राशीतील नक्षत्र भ्रमण खालीलप्रमाणे असेल

  • दिनांक २० नोव्हेंबर च्या मध्यरात्री दिनांक २१ सुरु असताना १२:३० ला गुरु कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत गुरु ची डिग्री ०० असेल
  • कुंभ राशीत तेव्हा मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र २ रे चरण सुरु असेल. दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु धनिष्ठा नक्षत्री असेल.
  • दिनांक २ जानेवारी २०२२ ला जेव्हा गुरु ६:४० डिग्री वर येईल तेव्हा तो धनिष्ठा नक्षत्रातून बाहेर पडेल आणि शततारका नक्षत्रात जाईल. दिनांक २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत गुरु शततारका राहूच्या नक्षत्री असेल
  • २ मार्च २०२२ ला गुरु जेव्हा २० डिग्री वर जाईल तेव्हा तो पूर्वभाद्रपदा नक्षत्रात जाईल. दिनांक २ मार्च ते दिनांक १३ एप्रिल संध्याकाळी ४ वाजता जेव्हा गुरु ३० डिग्री क्रॉस करेल तेव्हा तो मीन राशीत प्रवेश करेल

वरील सर्व विवेचन पाहता गुरु कुंभ राशीत धनिष्ठा ,शततारका आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून जात असताना सर्व राशी आणि सर्व लग्नाच्या व्यक्तींना ह्याचे वेगवेगळे अनुभव येतील.

ते काय असतील ह्याचे संपूर्ण विवेचन आपल्याला पुढे देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशी नुसार आणि त्याच्या लग्न चार्टनुसार दोन लेख वाचण्याची विनंती आहे.

हेही वाचा :- मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

समजा आपली राशी मीन असेल आणि आपले लग्न वृषभ असेल तर मीन राशी आणि मीन लग्न ह्यावर गुरु चे राशीपरिवर्तन आणि वृषभ राशी आणि वृषभ लग्न ह्यावर गुरु चे राशीपरिवर्तन हे दोन्ही लेख वाचून घ्या.

६ नोव्हेंबर २०१९ पासून गुरुने जेव्हा धनु राशीत प्रवेश केला तेव्हा धनु राशीत शनी सुद्धा होता नंतर ते आत्तापर्यंत गुरु आणि शनी हे जवळ जवळ एकाच राशीततून बराच काळ पदार्पण करत होते. आत्ता कुठेतरी शनी ला सोडून गुरु शनी च्या पुढे जात आहे. आत्ता शनी मकर राशीत आहे.

वरील परिस्थितीत ६ नोव्हेंबर पासून ते आत्तापर्यंत संपूर्ण विश्वाला चांगले गेले नाही. कारण गुरु स्वाश आहे कुठेतरी तो शनी बरोबर गुदमरून स्वतःला अस्थिरतेच्या ठेवत होता. म्हणून गुरु चे धनु आणि मकर हे राशी परिवर्तन चांगले गेले नाही. माझ्या मतानुसार हा कुंभ राशीतील प्रवेश बऱ्याच समस्येतून मार्ग दाखवेल अशी अशा करूया.

ह्याला पुष्टी देण्याचे कारण म्हणजे गुरु मधल्या काही वेळेत म्हणजे ६ एप्रिल २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत कुंभ राशीत होता त्या परिस्थितीत त्याने बऱ्याच अंशी मोकळा स्वाश घ्यायला लावला. पण त्यात सुद्धा तो वक्री असल्यामुळे त्रास काही सुटला नाहीच.
ह्या गुरु च्या कुंभ राशीतील प्रवेश आपल्याला सुखी आणि समृद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply