गुरु परिवर्तन २०२० : मेष राशी किंवा मेष लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली मेष राशी आणि मेष लग्नाची आहे. जर आपण मेष राशीचे आहात किंवा मेष लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या मेष राशी किंवा मेष लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या भाग्य स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत भाग्याचे स्थान सोडून कर्म स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या कर्म स्थानी जी आहे त्यात आपल्याला कर्माबद्दल नवीन नवीन बदल करावेसे वाटतील आणि ते तुम्ही जरूर कराल. तसे झाले नाही तरी तुम्ही जे सध्या करिअर करत आहात त्यात प्रमोशन नक्की पाहायला मिळेल. किंवा त्यासाठी लागणारा प्रयत्न मेहनत ह्यात हे वर्ष जाईल.

गुरु आणि शनी ची दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या घर वाहन सुख जिथे ४ लिहिले आहे तेथे ह्यांची ७ वि दृष्टी येत आहे म्हणून ह्या वर्षी जर घर वाहन घेत असाल तर त्यात यश येईल पण त्याचा प्लॅन ६ एप्रिल च्या अगोदर करा.

जर तुमच्या पत्रिकेत गुरु वक्री असेल (लग्न कुंडलीच्या वर ग्रहांची माहिती असते त्यात गुरु च्या समोर (व) लिहिले आहे का पहा कॉम्पुटर कुंडलीत) तर दिनांक २०/६/२०२१ ते १८/१०/२०२१ जे कराल ते मिळेल.

गुरु ची ५ वि दृष्टी

गुरु ची ५ वि दृष्टी हि कुटुंब स्थानावर आणि धन स्थानावर येत आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुमची धावपळ होईल पण त्यात तुम्ही सेफ असाल. तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी आहे म्हणून खर्च वाढतील कुटुंबासाठी फाईट कराल हा भाग वेगळा.

गुरु ची ९ वि दृष्टी

गुरु ची ९ वि दृष्टी हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे कर्ज, स्पर्धा ह्यात जास्त ऍक्टिव्हेट व्हाल. जर जॉब करत असाल तर पुढे जाण्यासाठी नवीन जॉब च्या शोधात असाल. जर व्यापारी आहात तर नक्की ऐपत नसताना कर्ज घ्याल आणि व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल. आणि तसे केलेले उत्तम.

आजार

आधीचे काही आजार ह्या मंडळींना असतील तर त्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग मिळतील. त्याला दूर करणाऱ्या सर्व व्यवस्था तुमच्या समोर असतील. हि एक चांगली वेळ असेल.

प्रेम संबंध

ज्या मेष राशी आणि लग्न वाले प्रेमात असतील तर २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ ह्या काळात निर्णय होतील.

मेष राशीच्या लग्नाच्या सर्वांचे विवाह ठरण्याचे प्रकार आणि विवाह होण्याचे योग नक्की ह्या वर्षी आहेत प्रयत्न करण्यास हरकत नाही.

ज्यांचे विवाह रखडले आहेत त्या सर्वाना हा काळ अति उत्तम आहे फक्त एव्हढेच कि काही तरी सामाजिक नियम डावलून केलेले विवाह करायची वेळ आली तर ते आत्ताच करून घ्यावेत.

वैवाहिक सुख

ज्या आधी पासून मेष राशी आणि मेष लग्नाच्या व्यक्ती विवाह बंधनात आहेत आणि मागील २ वर्षांपासून जर काही त्रास होत असेल तर त्याचे निर्णय ह्या वर्षी तुम्ही घ्या २१/११/२०२१ पर्यंत आणि त्यातून लगेच बाहेर पडा मागचा पुढचा विचार न करता. पण हे किती योग्य आणि किती अयोग्य आहे ते पत्रिका पाहूनच ठरवावे.

गुरुचे उपाय

मेष राशी आणि मेष लग्न वाल्याना गुरुचे उपाय म्हणजे रोज कपाळावर केसर चा टिळा लावणे आणि रुद्राभिषेक करून घेणे.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे मेष राशी आणि मेष लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात संतान विषय, शिक्षण विषय, प्रेमाबद्दल चे विषय, ज्ञान लावणारे विषय हे थोडे त्रासदायक होतील त्यात त्या त्या वयोमानाप्रमाणे समजावे आणि आधीच्या घटना त्याबद्दल काही ऍक्टिव्हेट असाव्यात. पण ह्याच वरील पिरियड मध्ये हे विषय मिटवा. नंतर निर्णय घेण्यापेक्षा आत्ताच घ्या.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल — ह्यात घर वाहन सुख मिळेल. किंवा ते घेण्याचे योग दिसतील. पण इथे पैसे संपण्याचे (जाण्याचे) योग आहेत म्हणून जर चांगल्यासाठी खर्च होत असेल तर करून घ्या. नाहीतर दुसरीकडे पैसे जाणारच ह्या कालावधीत. इथे पैशाचे महत्व किती आहे ते कळेल.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल – ह्यात हेल्थ बद्दल काही ना काही विषय जरूर होतील. तसे झाले नाही तर तुम्ही जास्त अध्यात्मिक असाल. तंत्र मंत्राचा सपोर्ट घेण्याचा हा पिरियड असेल. अचानक काही लाभ होतील.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.— कुटुंबाकडून त्रास किंवा कुटूंबासाठी धावपळ हे दोन्ही विषय येथे असतील.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. — ह्यात आधीच्या सर्व झालेल्या घटना तुम्ही उत्तम रित्या हाताळू शकाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply