You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : तुला राशी/तुला लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ तुला राशी/तुला लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ तुला राशीतुला लग्न

वरील कुंडली हि तुला राशीची चंद्र कुंडली आहे आणि तुला राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली तुला राशी किंवा लग्न कुंडली तुला असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

तुला राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा पंचम / पाचव्या स्थानी येत आहे. हे स्थान आपल्या मुलाबाळांचे, आपल्या स्किल चे प्रेमसंबंधांचे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या पंचम स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या तृतीय स्थानी आहे. ह्या स्थानाचा मालक तिसऱ्या स्थानी भ्रमण करताना आपल्या पराक्रमाबद्दल चांगले परिणाम देईल. लहान भावंडांसाठी आपण काही चांगली धावपळ कराल. कॉम्युनिकेशन च्या स्किल चा चांगला वापर करून त्यात डेव्हलोपमेंट कराल. हा काळ आपल्याला ऑनलाईन मध्ये जास्त प्रगती करून पुढे जाण्याचा असेल. जाहिराती क्षेत्रात असाल तर लाभ होतील.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या षष्ठ स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा पाचव्या स्थानी भ्रमण करणार आहे म्हणून १४४ दिवसात आपल्या सर्विसेस देताना आपल्याला जास्त मेहनत दिसते. आपण जर जॉब ला असाल तर काही काळासाठी घरी बसावे लागेल. जॉब मध्ये ह्या वेळी बदल दिसले तर ते चांगले नाहीत. पण गुरु ची दृष्टी ने आपण सेफ असाल.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : कन्या राशी/कन्या लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान पत्रिकेतील लाभ स्थान आणि इच्छापूर्तीचे आहे. बऱ्याच प्रमाणात आपण आपल्या इच्छा स्वतःच्या ज्ञानाने पूर्ण करू शकाल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान आपल्या भाग्याचे स्थान आहे म्हणून १४४ दिवसात काहीही झाले तरी आपले नशीब आपल्याला साथ देईल. नवीन सुरुवात करू शकाल. आपल्या बुद्धीने काही डेव्हलोपमेंट च्या गोष्टी साकारू शकाल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या व्यक्तिमत्वाचे आहे तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.तुम्ही स्वतःसाठी चांगले विचार करू शकाल. मानसन्मान वाढेल. एक चांगली पॉसिटीव्हिटी तुमच्यात निर्माण होईन चांगले कार्य हाती घ्याल. विद्यार्थी दशेत तुला राशी आणि तुला लग्नाच्या मुलांना विशेष प्रगती करता येत आहे.

काळजीचे काही मुद्दे

तुला लग्न आणि तुला राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.

गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या व्यय स्थानाचे आहे. विदेशात असाल तर जास्त मेहनत करावी लागेल. विदेशातून शुभ समाचार मिळण्यास विलंब होईल. गुंतवणूक सांभाळून करावी.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या पंचम स्थानी येत आहे. प्रॉपर्टीज आणि आईच्या सुखासाठी हा काळ थोडा कष्टदायक दिसेल. काही जणांना प्रॉपर्टी संबंधातील आधीचे विषय जास्त काळजीचे होतील. तरी तुम्ही सेफ असाल.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान कर्म स्थान आहे . त्यामुळे करिअर मधील एखादी उलाढाल आपल्याला त्रस्त करू शकेल. सावधानता बाळगावी लागेल. पैसे खर्च होतील. एखादी कोर्ट केस असेल तर त्यात जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण तुला राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक धन स्थान आणि दुसरे वैवाहिक स्थान. मारक बाधक स्थान जेव्हा ऍक्टिव्ह होते तेव्हा हा काळ जास्त चांगला नाही. व्यापारी असाल तर पैसा मिळेल काळजी नको. मात्र कुटुंब आणि वैवाहिक सुखात थोडे कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे धन स्थानातील मंगळ हा कौटुंबिक कलह देऊ शकेल सावधान. एखाद्या वेळ तुला राशी च्या मुलामुलींना हा काळ मंगळ कार्य करावणारा आहे पण त्यात जास्त कष्ट असतील. ओढाताण करून हे करावे लागेल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. तुला लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा सध्या अष्ठमातून जात आहे. म्हणून हा काळ आपणास इझी मनीं साठी उत्तम आहे. काही क्लेम मार्गी लागतील. पण येथील राहू पत्नीच्या किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी काही विशेष खंजरच करावयाला लावेल काळजी घ्या.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी उत्तम असेल ज्या जोडप्याना संतान विषयी ची आधीपासूनची काही कृती असेल तर हा काळ उत्तम असेल. वैदकीय सल्ला घेऊन पुढे जाण्यास हरकत नाही.

धन्यवाद…..!

Leave a Reply