गुरु राशी परिवर्तन २०२१ मेष राशी/मेष लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/
वरील कुंडली हि मेष राशीची चंद्र कुंडली आहे आणि मेष राशीची लग्न कुंडली आहे.
आपली चंद्र कुंडली मेष राशी किंवा लग्न कुंडली मेष असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.
मेष राशी/लग्नाच्या च्या कुंडलीत गुरु हा एकादश स्थानात जात आहे. हे स्थान लाभ/इच्छापूर्तीचे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम असेल तो वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या इच्छापूर्ती करण्यास समर्थ असेल.
वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या भाग्य स्थानी आहे आणि त्याचा मालक गुरु जर इच्छा पूर्ती च्या स्थानी लाभ स्थानी भ्रमण करत असेल तर आपल्याला भाग्योदयाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भाग्योदय होण्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. ज्याची आपण एव्हढे दिवस वाट पाहत होतात त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटी मिळतील.
एकादश स्थान हे मोठ्या भावंडांचे आहे इथे गुरु भ्रमण आपल्याला आपले नेटवर्क वाढविण्यासाठी मदत करू शकतो. मेहनतीचे फळ मिळेल.
गुरु ची दुसरी राशी मीन हि बाराव्या स्थानी आहे आणि हे एक व्यय स्थान आहे. त्यामुळे आपल्याकडून मागील वर्षी जे जे व्यय झाले असेल ते आपल्याला पुन्हा मिळू शकेल. गुंतवणुकीत लाभ होतील. परदेशातून शुभ समाचार मिळतील. मुलांना परदेशात पाठवू शकाल. विद्यार्थी बाहेरच्या शहरात आपला अभ्यास करण्यासाठी जात असतील तर संधी उत्तम मिळेल. फायदा होईल.
Table of Contents
गुरु ची ७ वी दृष्टी
गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले ज्ञान स्थान आहे ते संतान चे स्थान आहे आणि ते अफेयर्स चे किंवा प्रेम देणे घेणे ह्याचे आहे तसेच आपल्या शिक्षणाचे चे सुद्धा आहे. ह्या विषयी जर काही मागील वर्षी अडचणी होत असतील तर त्या दूर होतील. ज्या भगिनींना संतती न होण्याचा इशू होत असेल मागील काही वर्षी तर ह्या १४४ दिवसात डॉक्टर ची ट्रीटमेंट करून आनंद मिळविण्याची हीच संधी आहे. १३ एप्रिल पर्यंत ह्या विषय मागे लागा आणि हा विषय मार्गी लावा.
ज्या पालकांची अशी पत्रिका असेल त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणात प्रगती दिसेल. काही प्रेमप्रकरणे मार्गी लागतील.
गुरु ची ५ वी दृष्टी
गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान लहान भावंडे, शेजारी पाजारी, आपला पराक्रम, कम्युनिकेशन , धावपळ ह्या विषयीचे आहे. जर आपण ऑनलाईन काही व्यवसाय करीत असाल तर खूप उत्तम परिणाम दिसतील, पराक्रम चांगला दिसेल. इथे आपला बऱ्याच जणांशी संपर्क होईल आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात असू शकता. लहान भावंडांची प्रगती दिसेल, वरील सर्व विषयी इथे चांगले परिणाम दिसतील.
गुरु ची ९ वी दृष्टी
गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान वैवाहिक सुखाचे आहे. ज्यांचे विवाह मागील काही वर्षी होत नव्हते त्यांचे विवाह ठरतील. हे स्थान पार्टनरशिप चे आहे त्यामुळे त्यात आपल्याला सहकार्य लाभेल. हे स्थान व्यवसायाचे आहे म्हणून व्यवसायिकांना हे गुरुचे भ्रमण उत्तम आहे. नवीन व्यववसाय करण्यासाठी हा काळ उत्तम असू शकेल.
काळजीचे काही मुद्दे
मेष लग्न आणि मेष राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.
गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान जॉब चे आहे इथे आपल्याला पहिल्या पेक्षा जास्त राबावे लागेल . काही प्रमोशन बद्दल चे किंवा कामाबद्दलची वाईट अनुभव येऊ शकतील. जर आधीपासून काही शारीरिक रोग असतील त्यात धावपळ दिसेल. पैसे खर्च होईल.
कोर्ट केस मधील त्रास, कर्ज हे विषय असतील तर हे दिवस विशेष काळजी घ्या.
जिथे १० नंबर शनीची राशी लिहिली आहे तिथे हे गुरु पासून चे मागील स्थान असल्यामुळे वडिलांच्या तब्येतीकडे काळजी घ्यावी जर हा विषय आपल्याकडे आधी पासून असेल तर. ऑफिस ची जागा किंवा ऑफिस बदलण्याचे योग इथे दिसतात. आपण अजून लांब जाऊ शकाल.
जिथे ४ नंबर ची कर्क राशी आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल जर आधीपासून हा विषय आपल्याकडे असेल तर त्यात तुम्ही लक्ष द्या. १३ एप्रिल २०२२ पर्यंत घर घेण्याचा प्लान पुढे करा. घेत असाल तर काळजी घ्या. घर विकायचे असेल तर हा विषय उत्तम असेल मात्र घर जागा घेणे हितावह नाही.
गुरु चे नक्षत्रीय भ्रमण
गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण
२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण मेष राशीसाठी उत्तम असेल.
आपल्या स्वतःच्या प्रेसेंटेशन साठी हा काळ उत्तम असेल. वैवाहिक काही तंटे असतील तर ते सोडवू शकाल. नवीन व्यवसायासाठी हा काळ उत्तम असेल. पैसा मिळेल. कारण गुरु ५ डिसेंबर पर्यंत तुला राशीत असेल आणि गुरु तेथून मंगळावर आपली ९वी दृष्टी टाकत आहे.
५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत आपल्या अष्टम स्थानी जात आहे म्हणून गुरु ८ व्या स्थानाचे फळ जास्त देईल आणि पहिल्या स्थानाचे फळ सुद्धा. ह्यात आपल्याला अति सावधान राहायला लागेल. कुणाशी तंटे भांडणे आपल्याला फायद्याची नसतील. अचानक येणारे अपघात आणि काही गोष्टीत गुरु आपले रक्षण करेल पण सावधान राहावे.
गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण
गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. मेष राशीला राहू कधीही चांगले फळ देत नाही. राहू ह्या वरील दिलेल्या संपूर्ण कालावधीत आपल्या पत्रिकेत वृषभ राशीत आहे आणि वृषभ राशी हि धन स्थान आणि कुटुंब स्थानी असल्यामुळे ह्या विषयी आपल्या समोर हे दोन विषय अति धावपळीचे असू शकतील. ह्यात पैसा जास्त खर्च होईल. कुटुंबातील एखादा वाद विवाद साठी आपल्याला काळजी लागू शकेल. आपली इच्छापूर्ती करण्यासाठी कुटुंबा पासून दूर जाण्यास हा काळ खूप चांगला आहे. उजवा डोळा उजवा कान किंवा दाताचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याची ट्रीटमेंट ह्या कालावधी मध्ये करावी लागेल आणि पैसा खर्च होईल.
गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण
२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी सर्वात उत्तम असेल. संतान बद्दल चे काही प्रश्न ह्यासाठी मार्गी लागतील. वैवाहीक सुखात आणि व्यापारात हा काळ अति उत्तम असेल. आपल्या इच्छा पूर्ण होतील.
धन्यवाद…..!