You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : मकर राशी आणि मकर लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने मकर राशी आणि मकर लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या पंचम स्थानी (पत्रिकेचे ५ वे स्थान) आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण लाभ स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

मकर राशी आणि मकर लग्न
ज्यांची राशी मकर आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे १० ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

पत्रिकेचे पाचवे स्थान जिथे २ नंबर वृषभ राशी आहे हे ज्ञान स्थान आहे, हे शिक्षण , संतती , प्रेम चे सुद्धा स्थान आहे. ह्या बद्दल चे विषय हे पुढील १८ महिन्यात तुमच्यासाठी जास्त क्रियाशील असू शकतात ह्या राहू मुळे.

येथील राहू आपल्याला वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात टाकेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला ह्या राहुमुळे आपल्याला जास्त लाभ मिळविण्याच्या युक्त्या सुचतील पण जरा सांभाळून राहू समोर केतू लाभ स्थानी आहे.

मकर राशी आणि मकर लग्नाच्या व्यक्तींना संतती विषयक चिंता आणि काहीतरी धावपळ ह्या १८ महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ते लहान असतील तर आरोग्यासाठी आणि मोठे असतील तर त्याच्या वागणुकीसाठी ती चिंता असेल.

राहू येथे संतान सुखासाठी योग्य नसतो म्हणून ह्या राशी आणि लग्नाच्या मुलींना पुढील १८ महिने सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात येतो जर आपण कॉन्सिव्ह केली असेल आणि २/४ महिने झाले असतील तर.

राहू येथील मकर राशी आणि लग्न वाल्याना प्रेमात पाडेल किंवा आधीचे प्रेम असेल तर त्यात चिंता देऊ शकतो.

मकर राशी आणि मकर लग्न च्या विद्यार्थाना येथील राहू उत्तम फळे देईल जर काही कोर्से वगैरे करून तुम्ही डेव्हलोपमेंट करण्याच्या विचारात असाल. पण रेगुलर कॉलेज वगैरे च्या शिक्षणात मन लागणार नाही उलट तेथून काही ग्याप दिसेल.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी वृश्चिक राशीवर जिथे ८ लिहिले आहे तिथे केतू सुद्धा आहे म्हणून काही लाभासाठी प्रवृत्त व्हाल. पण त्यात थोडा उशीर होण्याची चिन्हे आहेत. काही इच्छा ह्या नवीन निर्माण होतील काही मिळविण्यासाठी. पण तर त्यात थोडे सांभाळून कार्य करा पुढील १८ महिने.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि लग्न स्थानावर प्रथम स्थानावर जिथे १० नंबर शनी ची मकर राशी आहे तिथे येत आहे. आधीपासून काही आजार असतील तर त्यावर लक्ष द्यावे. काही कामे उशिरा होण्याचे संकेत आहेत. तुमच्या ऍक्टिव्हिटी असामाजिक नाहीत ना ह्याचा विचार करावा नंतर त्याच्या मागे लागावे. कारण इथे राहू पहिल्या स्थानाला तुमच्या डोक्यात ज्ञान स्थानातून काही चुकीच्या कल्पना टाकू शकतो सावधान.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी हि भाग्य स्थानावर येत आहे जिथे ६ बुधाची कन्या राशी आहे त्यामुळे नवीन काहीतरी वाटा आपल्यासमोर भाग्योदय करण्यासाठी असतील. आधीचे कार्य तुम्ही त्यात नवीन काहीतरी कराल अथवा त्यात बदल करून नवीन काही तरी कराल पुढील १८ महिन्यात. हि दृष्टी आपल्याला आपल्या भाग्याची काही सुखद प्रचिती देऊ शकतात पण काही तरी नवीन असेल तरच ते शक्य आहे.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू आपल्या लाभ स्थानी वृश्चिक राशीत आहे ८ नंबर मध्ये त्यामुळे राहू च्या ७ व्या दृष्टीचे फळ सारखेच समजावे.

केतू ची ५ वी दृष्टी हि पराक्रम स्थानावर भावंडांच्या स्थानावर धावपळीच्या स्थानावर येत आहे इथे गुरु ची १२ नंबर ची मीन राशी आहे. इथे केतू च्या दृष्टीने तुम्ही काही वेगवेगळ्या प्रांतात, शहरात जाऊ शकता आपल्या पराक्रमासाठी. इथे आपल्या भावंडाना थोडा त्रास आहे. विद्यार्थ्यांनी नक्की काही करण्यासाठी जन्म स्थानापासून दूर जाऊन शिक्षण घ्यावे.

तुम्ही जर व्यववसायिक असाल तर हि केतू ची दृष्टी आपल्याला खूप धावपळीत ठेऊ शकेल. लाभासाठी आपल्याकडे ४/५ सोर्स निर्माण कराल.

केतूची ९ वी दृष्टी हि वैवाहिक सुखावर येत आहे जिथे ४ नंबर चंद्राची राशी आहे. ज्यांचा डिवोर्स पेंडिंग असेल त्यांना ह्यात रिझल्ट येऊ शकतो. ज्यांना विवाह ह्या १८ महिन्यात करायचा असेल त्यांना भरपूर मुली अथवा मुले पाहावी लागतील. त्यात चिंता दिसेल.

विवाह झालेल्याना लगेच वैवाहिक सुखाची एखादी धावपळ दिसेल त्यात त्रस्त होण्याचे बरेच दिसते ह्या केतूच्या दृष्टीने. इथल्या केतू ह्या दृष्टीने व्यावसायिक पार्टनरशिप मध्ये असतील तर इथे सुद्धा सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

उपाय

काही उपाय देतो ह्यासाठी ज्याने मकर राशी आणि मकर लग्नाला ह्या राहू केतुचे भ्रमण सुलभ जाईल.

  • आपण प्रत्येक शनिवारी महाकाली चे दर्शन घ्या जमेल तर तिथे गुगल चे धूप पेटवून प्रार्थना करावी. आणि ५ प्रकारच्या मिठाई चा नैवेद्य दाखवावा. हे प्रत्येक शनिवारी करता नाही आले तरी महिन्यातून एकदा करावे.
  • प्रत्येक शुक्रवारी लहान गरीब मुलींना काही ना काही मदत करत राहा. त्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत केलेली मदत राहू पासून चांगली फळे मिळतील.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व मकर राशीच्या आणि मकर लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply