आकाश मंडळात कोणताही ग्रह हा स्थिर नाही सूर्य सोडून प्रत्येक ग्रह हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असतो. त्यात शनी ला जशी एक प्रदक्षिणा करायला ३० वर्षे लागतात तशी गुरु ला एक प्रदक्षिणा करायला साधारण १२ वर्षे लागतात. त्यात हि प्रदक्षिणा करताना तो प्रत्येक राशीतून आणि नक्षत्रातून जात असतो. (जसे १२ राशीतून साधारण १२ वर्षे).
शनी एका राशीत २.५ वर्षे म्हणून ३० वर्षे पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारायला लावतो. गुरू एका राशीत साधारण १२/१३ महिने म्हणून १ वर्षं पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारायला लावतो. आणि राहू एका राशीत १८ महिने म्हणून १८ वर्षात त्याची एक प्रदक्षिणा पृथीभोवती होते. (अर्थात तो नेहमी उलटी प्रदक्षिणा करतो)
एव्हढा मोठा वेळ जेव्हा ह्या तिन्ही ग्रहांना लागतो तेव्हाच ह्यांचा माणसांच्या हालचालींवर आणि समाजावर फार प्रभाव सुद्धा होतो.
तो प्रभाव समाजावर जास्त होत असतो असे माझे मत आहे.
५ नोव्हेंबर २०१९ पासून २० नोव्हेंबर २०२० पर्यंत गुरु धनु राशीत होता. ( २४/१/२०२० पर्यंत गुरु बरोबर शनी सुद्धा ह्या दरम्यान होताच)
- ५/११/२०२० ते २०/११/२०२० — गुरु धनु राशीत
- २०/११/२०२० दुपारी १:३६ ते २१/११/२०२१ मध्यरात्री १२:३५ पर्यंत — गुरु मकर राशीत (ह्या कालावधीत राहू हा ऋषभ राशीतच आणि शनी हा गुरु बरोबर मकर राशीतच असणार आहे.)
- पण गुरु मकर राशीतून ५ एप्रिल २०२१ ला मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांपासून कुंभ राशीत जात आहे. ४.५ महिन्यात तो मकर राशीत आहे पण नियमानुसार गुरु जर १ वर्षे राशीत असतो तर तो कुंभ राशीतून पुन्हा मकर राशीत येणार हे नक्की.
- कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल. पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.
- १८ ऑक्टोबर २०२१ नंतर मकर राशीत गुरु पुढे जाण्यास सुरुवात करून ३० डिग्री पर्यंत जात राहील आणि मकर राशीत तो २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत च्या रात्री १२:३५ मिनिटापर्यंत असेल.
- गुरु च्या पूर्ण भ्रमणात गुरु कुंभेतून मकर राशीत वक्री असण्याचा प्रकार हा दिनांक २०/६/२०२१ ते १८/१०/२०२१ पर्यंत असेल.
गुरु चे नक्षत्र भ्रमण
आता गुरु कोणत्या कोणत्या नक्षत्रातून जात आहे ते पाहू:-
- २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल.
- पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल.
- ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल.
- २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.
- २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे.
तुम्ही विचार कराल कि हे आम्हाला वाचून काय कळणार?
मान्य आहे हे ह्यासाठी दिले आहे कि गुरु नुसता मकर राशीत जातो ह्याला एकच अर्थ नसतो तो कुणाबरोबर आहे. कोणत्या नक्षत्रात आहे त्याची काय अवस्था आहे ह्यावर त्याचे फळ देण्याचे गणित अवलंबून असते.
हे जर कळले नाही तरी चालेल पण गुरु चे हे फळ समाजावर आणि प्रत्येक राशीवर काय होतात हे पाहावे लागेल. आणि त्याचे विश्लेषण नक्की देण्यात येईल.
आत्ताच सांगून ठेवतो काय होईल कसे होईल ते पुढील लेखांतून आपल्याला वाचायला मिळेलच पण पुढे सर्वात कठीण काळ हा सर्व जनमाणसांसाठी २२/५/२०२१ ते २०/७/२०२१ ह्या कालावधीचा असेल.
पूर्ण गुरु च्या बदलाच्या कालावधीत २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत घडणाऱ्या मोठ्या घडामोडी.
- अर्थव्यवस्थेची तयारी प्रत्येकाला सांभाळून करावी लागेल.
- सोन्याचा भाव एकदम खाली कोसळेल आणि शेअर मार्केट मध्ये तेजी येईल पण मे महिन्यानंतर पुन्हा हीच तेजी उलट फिरेल आणि सोन्याचे भाव वाढतील.
- ह्या काळात धार्मिक मतभेत जास्त होतील.
- देशांतर्गत युद्ध होण्याचा संभव फार दिसेल. त्यात भारताची पकड मजबूत असेल. कारण भारताची राशी हि मकर आहे आणि त्यात गुरु नीच राशीत आलेला आहे त्यामुळे आपले ज्ञान लावून वेगवेगळ्या युक्त्यांनी भारत सर्वांवर आपली छाप टाकेल ह्याचे दुसरे कारण भारताचे लग्न ऋषभ आहे आणि तेथे राहू सुद्धा आहे. सर्वाना पुरून उरेल.
- सरकार लोकांच्या आंदोलनाच्या मुळे हैराण होईल.
- महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल आणि बिहार ह्या राज्यातील सरकारे जी सुरु असतील त्या राज्यात मोठे बदल दिसल्याशिवाय राहणार नाहीत. (तुम्ही म्हणाल आत्ताच बिहार मध्ये नितीश कुमार आलेत.) काही सांगता येत नाही नीच गुरु काय ज्ञान लावेल आपले. राजकारणात पक्षांतर्गत मोठे बदल सुद्धा दिसतील.
- पूर्ण गुरु चे मकर राशीतील हे भ्रमण नीच राशीत जाईल तर २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत जेव्हढे विवाह आपल्याला दिसतील त्यात ८०% विवाह हे सामाजिक नियम तोडून केलेले दिसतील. (जे जे विवाह आपण पाहताना तोंडात बोट घालतो तसे).
ज्या ज्या मुलामुलींचे विवाह रखडले आहेत ते विवाह करण्यास आता उत्सुक होतील मग तो कोणत्याही सामाजिक नियमांचे पालन करतीलच असे नाही.
जे जे प्रेमप्रकणात तरुण मुलं मुली आहेत जे ५/७ वर्षे लग्नाची वाट पाहत आहेत त्याचे विवाह हे ह्या वर्षी होणारच समजा पण ते काही विरुद्ध जाऊन करतील तेव्हा.
- नवीन कायदे येतील जे जनमानसाला पटणार नाहीत. आणि कायद्याचे उल्लंगघन जास्त दिसेल ह्या कालावधीत.
- शिक्षक, समाजातील संत, शैक्षणिक संस्था, कोणत्याही धर्माचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती ह्या कालावधीत अति समाजासमोर असतील. रोजच्या बातम्यांमध्ये एक तरी बातमी ह्यांच्याबद्दल जरूर पाहायला मिळेल.
- २० नोव्हेंबर च्या आधी ह्या संदर्भातील कोणीही कायद्याच्या कचाट्यात अडकले असतील तर ह्या वर्षी ते त्यातून स्वतःची आपल्या शकलेने सुटका करून घेतील. किंवा शनी त्यांना कायमची सुटका देईल.
- ज्या जोडप्यानं संतती होत नाही आहे त्यांनी ह्या वर्षी नक्की प्रयत्न करा पण कोणत्याही नैसर्गिक रित्या नव्हे. आय वी एफ / आय वी आय वगैरे जास्त रिझल्ट देऊ शकतील नीच गुरु ह्यात जास्त फळ देईल.
ह्या गुरु शनी युतीबद्दल माझे मत
कोणताही नीच ग्रह हा आपले नियम तोडूनच काम करताना दिसतो.
गुरु हा ज्ञान आहे आणि शनी हा श्रम, कायदा आहे.
शनी आधीपासून मकर राशीत होता आणि तेथे आता गुरु आलेला आहे. शनी नीच गुरु चे आपल्या राशीत स्वागत करेल आणि प्रथम तो जसे सांगतो तसे तो तात्पुरता तरी करेल.म्हणून कोणत्याही कायदा सुव्यवस्थेवर विश्वास ठेवता येणार नाही.
गुरु हा देवांचा आणि ग्रहांचा गुरु आहे आणि तो जेव्हा नीच तत्वावर येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी ह्या असामाजिक होण्याचे चान्सेस वाढतात. जसे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाला त्याचा नीच गुरु पत्ते कुटताना दिसेल. (हे उदाहरण समजावे)
संशोधनासाठी हा गुरु खूप चांगला असतो कारण कोणतेही संशोधन समाजाच्या नियमाच्या विरुद्ध असलेलेच फेमस होते आणि ते पुढे समाजासाठी सुद्धा कामाला येते. कारण कोणत्याही ज्ञानाचा नीच पणा येथे कामाला येतो.
गुरु जेव्हा २०/११/२०२० ला मकर राशीत आला दुपारी १:३६ ला तेव्हा शनी ३:२० डिग्री वर होता.
दोघे एकाच राशीत पुढे पुढे जात असतील पण दिनांक २१/१२/२०२० ला रात्री ९ नंतर गुरु आणि शनी एकाच डिग्री वर येतील ६ अंश १९ कला. इथून पुढे गुरु शनी च्या पुढे जात राहील आणि जास्त प्रभावात येईल.
पुढे ह्याचे विश्लेषण आपल्याला वेळोवेळी देण्यात येईल.
धन्यवाद…..!
Thank u for detailed information about Guru graha.