मकर राशी साडेसाती चे दुसरे चरण | Shani Transit for Capricorn
जेव्हा शनी कुंभ राशीत असेल जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यन्त तेव्हा गुरु राहू आणि केतू हे कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे शनी चे फळ प्रत्येक राशीला मिळण्याचा संभव असेल.
मकर राशीला किंवा लग्नाला गुरु राहू केतू यांची गोचरी दिली आहे. त्यावरून शनी आपल्याला कसे फळ देईल हे सुद्धा समजण्यास मदत होईल.
- गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– मकर लग्न किंवा राशी कुंडलीत त्रितीय स्थानी.
- गुरु मेष राशीत १/५/२०२४ पर्यंत असेल.– मकर लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी.
- गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — मकर लग्न किंवा राशी कुंडलीत पंचम स्थानी.
- राहू ३०/१०/२०२३ पर्यंत मेष राशीत असेल — मकर लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी.
- केतू ३०/१०/२०२३ पर्यंत तुला राशीत — मकर लग्न किंवा राशी कुंडलीत दशम स्थानी.
- राहू ३०/१०/२०२३ ते १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत — मकर लग्न किंवा राशी कुंडलीत त्रितीय स्थानी.
- केतू ३०/१०/२०२३ ते १८/८/२०२५ पर्यंत कन्या राशीत –मकर लग्न किंवा राशी कुंडलीत नवम स्थानी.
आपली राशी किंवा आपले लग्न मकर असेल तर साडेसातीचे शेवटचे हे चरण आपणास बरेच काही देऊन जाईल. १७/१/२०२३ च्या आधी ८४ दिवसात आपण ते पाहिलेच असेल कि कितीतरी विषय हे आपल्याला सोडवीता आले आहेत.
येथे आपणास दिनांक १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असताना काय फळ देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न असेल.
येथे फक्त विषय मांडले जातील जे आपल्यासमोर ह्या साडेसातीच्या तिसऱ्या चरणात येतील.
मकर राशीला साडेसाती चे तिसरे चरण १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत — साडेसाती सुद्धा संपेल.
वर दिलेल्या कुंडलीत जी आपली लग्न कुंडली किंवा राशी कुंडली असेल तर शनी चे भ्रमण कुंभ राशीतून ११ नंबर च्या राशीतून होत आहे ते स्थान आपल्या पत्रिकेचे दूसरे स्थान आहे. ह्या स्थानावरून व्यक्तीचे कुटुंब, वाणी, अणि पैसा पहिला जातो. शनी इथे आल्यावर हे विषय साध्य आपल्या जवळचे होतील. म्हणजे कुटुंबासाठी आपण जास्त रोल मध्ये याल. कुटुंबा साठी पैसा खर्च कराल. मोठ्या जबाबदाऱ्या पडतील आणि त्या पार सुद्धा पाडाल हे नक्की कारण इथे शनी आपल्या मुलत्रिकोण राशीत असेल.आपल्या वाणीवर आपला प्रभाव पडेल हे नाकारता येत नाही. जर आपल्या पत्रिकेचा जन्माचा शनी उत्तम स्थितीत असेल तरच हे १००% खरे होईल.
Table of Contents
शनी च्या दृष्टी
जन्म स्थानाच्या वेळी आपल्या पत्रिकेत शनी जेथे बसला असेल तेथे तो चांगली फळे देतो आणि त्या संबंधित घटना आपल्याकडून करवून घेतो.
जन्म स्थानाच्या वेळी शनी ज्या राशीत असतो त्या राशीपासून ३ ऱ्या, ७ व्या आणि १० व्या स्थानावर आपली दृष्टी टाकतो. ह्या शनी च्या तिन्ही दृष्ट्या चांगल्या मानल्या गेलेल्या नाहीत. त्या त्या स्थानापासूनच्या विषयी व्यक्ती थोडा हैराण असतो आपल्या जीवनात. किंवा त्या स्थानातील चांगल्या परिणामांसाठी व्यक्ती सतत मेहनत करीत असतो. हे कोणत्या कोणत्या स्थानावर त्याची दृष्टी पडली आहे ह्यावर अवलंबून असते.
मात्र शनी जेव्हा एखाद्या स्थानावर मर्यादित कालावधीत गोचरीने भ्रमण करतो तेव्हा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर येत असते तेथून तो त्या व्यक्तीला उजेडात आणतो त्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या २.५ वर्षाच्या कालावधीत तो त्या त्या गोष्टी त्याच्याकडून करवून घेतो. आणि तो जेथे बसलेला असतो त्या विषयी चे विषय सुद्धा व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी मदत करतात.
मकर राशी आणि मकर लग्न कुंडली साठी शनी दुसऱ्या स्थानातून आपल्या सुख स्थानावर (चतुर्थ) पाहत आहे. जिथे १ नंबर लिहिले आहे. तेथे मंगळाची मेष राशी येते आणि सध्या तेथे ३०/१०/२०२३ पर्यंत राहू सुद्धा तिथेच आहे. हा प्रकार आपल्याला नवीन घर घडी घेण्यासाठी उत्सुकता आणेल. मात्र एप्रिल नंतर प्रयत्न करा कारण गुरु एप्रिल पर्यंत मीं राशीत असेल. इथे शनी ची दृष्टी आहे ऑक्टोबर २०२३ पर्यंत राहूवर राहील म्हणून घरातील वातावरणात काही आधीच्या घटना झाल्या असल्यास त्यावर निर्णय होतील. आईच्या तब्येतीची किंवा तिच्या सुखाची काळजी वाटते.
शनी ची सातवी दृष्टी
हि जिथे ५ सिंह राशी आहे तिथे येत आहे. आपल्या अष्टम स्थानावर येणारी हि दृष्टी फार चांगली नाही येथे
ह्या शनीच्या भ्रमणात २०२३ आणि २०२४ मधील ह्या दोन्ही वर्षी १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर आपल्या हेल्थ साठी जपावे रवी हा अष्टमात असेल आणि त्याच्यावर शनी ची दृष्टी येईल.
आणि १६ सप्टेंबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ हा कालावधी सुद्धा आपल्या भाग्यावर चांगला नसेल कारण रवी कन्या राशीत असेल आणि शनी पासून तो ८ व्या राशीत असेल . तेव्हा इथे कोणतेही मोठे निर्णय घेऊ नये. हे दोन्ही वर्षासाठी असेल २०२३ आणि २०२५.
शनी ची १० वी दृष्टी
आपल्या पत्रिकेत एकादश (लाभ) स्थानी जिथे ८ मंगळाची वृश्चिक राशी आहे त्यावर शनी ची १० वी दृष्टी आहे. हे एक इच्छापूर्ती चे स्थान असल्यामुळे आपण आपल्या इच्छा ह्यात कशाही पूर्ण कराल. त्यासाठी खूप प्रयन्त करून आपल्या इच्छा पूर्ण होतीलही. मागे ५ वर्ष्याच्या ज्या ज्या इच्छापूर्ती किंवा लाभ मिळवायचे बाकी होते ते ते इथे होईल ह्यात चिंता नको. त्याची तयारी मात्र सुरु करा.
गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — मकर लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी गुरु असताना वरील १० व्या दृष्टीचे विवेचन हे सुखकारक होईल कारण गुरु ची ७ वी दृष्टी आपल्या कर्म स्थानावर येत आहे ह्याच कालावधीत घटना नक्की चांगल्या घडतील अशी अशा आहे. ह्यात खास जे विद्यार्थी दशेतील मुले मुली आहेत त्यांना हा कालावधी अति उत्तम असेल. कारण गुरु लाभस्थानावर दृष्टी देत आहे पंचमातून आणि शनी सुद्धा लाभ स्थानाला पाहत आहे.
गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– मकर लग्न किंवा राशी कुंडलीत तिसऱ्या स्थानी. ह्या कालावधीत लहान भावंडांसाठी काहीतरी धावपळ होईल. आणि मकर राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एप्रिल पर्यंत थोडा त्रास आहे मात्र नंतर गुरु मेष राशीत जाईल तेव्हा विद्यार्थी दशेतील मुलांना चांगले आहे.
१/७/२०२३ ते १८/८/२०२३ मंगळ सिंह राशीत जात आहे तेव्हा तो आपल्या पत्रिकेत अष्टम स्थानी असेल. सिंह राशीच्या समोरील कुंभ राशीत शनी असल्यामुळे इथे आपल्या छोट्या मोठ्या घटना पीडा सहन करणाऱ्या असतील विशेष काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींचे आजारपण आधीपासून असेल त्यांना ऑपरेशन चा हा काळ नाकारता येत नाही मेडिकल तसे असेल तर नक्की होण्याचे चान्सेस आहेत.
असेच १५/३/२०२४ ते २३/४/२०२४ ला मंगळ कुंभ राशीतून जात असेल तेव्हा शनी + मंगळाची युती आपल्या द्वितीय स्थानी येत असल्यामुळे ज्यांच्याकडे आधीपासून कुटुंबात ताणतणाव वाटतो त्यांनी शांत राहणे गरजेचे आहे.
उपाय मकर राशी किंवा मकर लग्नाचा
ह्या पूर्ण साडेसाती मध्ये कधीही शनिवारी जर नॉनव्हेज खात असाल तर लगेच बंद करा. दशरथ कृत शनी स्तोत्र प्रत्येक शनिवारी वाचणे, प्रत्येक शनीवारी पिंपळाकडे मोहरी च्या तेलाचा दिवा लावणे, प्रत्येक शनीवारी गरजू व्यक्तींना तेल, उदंड, लोखंडी वस्तू, घोंगडी चे दान करत राहणे ह्याबरोबर प्रत्येक शनीवारी शनी मंत्र जरी जपला तरी राशीस्वामी स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. हे उपाय करून साडेसाती चा हा कालावधी सुद्धा आपणास शुभ जाईल.
वरील लिंक वर जर आपण शनी च्या प्रत्येक नक्षत्राचा कालावधी पाहिलात तर त्यात ज्या ज्या वेळी शनी वक्री असेल त्या त्या वेळी आपल्याला वर दिलेली फळे हि अचानक आपल्या समोर असतील. ती चांगली किंवा वाईट हे आपल्या जन्माच्या शनीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. साधारण गणित करायचे झाल्यास एव्हढेच आपण पाहू शकता जर आपल्या पत्रिकेत शनी वक्री असेल आणि इथे भ्रमण काळातील शनी वक्री असताना तो आपल्याला चांगली फळे नक्कीच देतील.
वरील लिंक मध्ये दिलेल्या नक्षत्र भ्रमणाचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील ह्यासाठी आपण नक्कीच एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून सल्ला घ्या हि विनंती. कारण इथे प्रत्येक नक्षत्राबद्दलचे विवेचन सर्वांसाठी सारखे नसेल.
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८