You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ तूळ राशी / तूळ लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ तूळ राशी / तूळ लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR TULA RASHI / TULA LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे तूळ राशी आणि तूळ लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ तूळ राशी / तूळ लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ तूळ राशी / तूळ लग्न

तूळ राशी आणि तूळ लग्न म्हणजे आपली राशी जरी तूळ नसली पण लग्न तूळ असेल तर किंवा आपले लग्न तूळ नसले पण राशी तूळ असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

तूळ राशी अणि तूळ लग्नाच्या पत्रिकेत राहु सप्तम (विवाह/मारक) स्थानी १८ महिने मेष राशीत असेल आणि केतू लग्न (प्रथम) स्थानी तूळ राशीत असेल सप्तम आणि लग्न स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू सप्तमातुन भ्रमण करत असताना त्या विद्यार्थ्यांना १८ महिने हे उत्तम परिणाम देणारे आहेत जे जे विद्यार्थी आपल्या स्वखरचने शिक्षण घेत आहेत. प्राथमिक विद्यार्थ्यांना हा नियम नाही. शिक्षणात थोडे कॉन्फयुज्ड होऊ शकाल लक्ष द्या. करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना सप्तम स्थानी येणारा राहू हा रोज पैसे मिळवून देणारा एखाद्या व्यवसाय नोकरी कडे आकर्षित करेल.

पण वैवाहिक जीवनातील धावपळ दिसेल. केतूच्या लग्न स्थानातील भ्रमणामुळे बरेच जण स्वतःला प्रेजेंट करण्यासाठी धावपळीत असतील. मार्ग मिळताना कठीण होईल. आधी चुकीच्या मार्गावर भटकंती होऊ शकेल. थोडा वेळ फुकट जाऊ शकेल. अचानक शारीरिक त्रास उद्भवू शकेल.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा तूळ राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात वैवाहिक घटना घडतील. ज्यांचे विवाह झाले नसतील त्यांचे विवाह नक्की होतील प्रयत्न करावा. ज्यांचा डिवोर्स होण्याचा पेंडिंग असेल त्यांचा देखील डिवोर्स होईल. आणि त्यापासून लाभ सुद्धा होतील. म्हणजे आपली डिमांड पूर्ण होईल.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे तूळ राशी किंवा तूळ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. ह्या वेळेस व्यापाराना स्वतःच्या व्यवसायात त्रास होईल. ज्यांचा पार्टनरशिप व्यववसाय असेल त्यांना त्रास आहे हे नक्की. खास परलिंगी पार्टनरशिप टिकणार नाही. नोकरीतील तुला लग्न राशीच्या जातकांना काही इशू नाही. कामे भरपूर वाढतील एव्हढेच.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे तूळ राशी किंवा तूळ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. इथे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व धावपळ असेल. लाईफ पार्टनर च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पैसा मिळेल.
  • केतू तूळ राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे तूळ राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे तब्येतीकडे काळजी घेण्याचा हा अवधी सांगण्यात येतो. स्वतःला प्रेजेंट करण्याचा हा पिरियड सुद्धा असू शकेल.
  • केतू तूळ राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे तुला राशी लग्नाच्या व्यक्ती अग्रेसिव्ह होतील. स्वतःला जे पाहिजे ते मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. इथे काही जणांच्या रिलेशन साठी त्रास दिसतात किंवा रिलेशन जपण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
  • केतू तूळ राशीत २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे तूळ राशी किंवा लग्न वाल्याना स्वतःबद्दल अचानक आपल्या समोर काही घटना येण्याचे प्रकार असतील वैवाहिक किंवा पार्नरशीप विषय जास्त असतील.
  • उपाय –तूळ लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक शुक्रवारी एक मुठी पीठ + साखर कोणत्याही झाडाखाली सोडावी.

धन्यवाद…..!

Leave a Reply