You are currently viewing DIWALI MUHURT 2022 । दीपावली शुभमुहूर्त तालिका

DIWALI MUHURT 2022: दीपावली शुभमुहूर्त तालिका – २०२२

रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी – २१ ऑक्टोबर २०२२

 • एकादशी मुहूर्त : एकादशी तिथी आरंभ — २० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ४:०४ मिनिटां पासून
 • एकादशी तिथी समाप्ती — २१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५:२२ मिनिट
 • एकादशी पारण (उपवास सोडणे) सकाळी ६:३५ ते ८:५४

रमा एकादशी कहाणी आणि एकादशी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि एकादशी बद्दल चे अनेक फायदे वाचून घ्या.

रमा एकादशी : महत्व आणि कथा


गोवत्स द्वादशी (वसुबारस) २१ ऑक्टोबर २०२२

 • गोवत्स द्वादशी मुहूर्त – सायंकाळी ६:१२ पासून रात्री ८:४० पर्यंत (२ तास २९ मिनिटे)
 • द्वादशी तिथी प्रारंभ – २१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५:२२ पासून.
 • द्वादशी तिथी समाप्त – २२ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६:०२ मिनिट.

हिंदू संस्कृतीतील गायीचे महत्व
वसुबारस सणाचे महत्व
गाय आणि ज्योतिष कनेक्शन – ह्याबद्दलचे अधिक मी मांडलेले विचार जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गोवत्स द्वादशी : वसुबारस


दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ – धनत्रयोदशी धन्वन्तरी जयंती, शनिप्रदोष, आणि यमदीपदान

धनत्रयोदशी २२ कि २३ ऑक्टोबर?

 • त्रयोदशी तिथी प्रारंभ – २२ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६:०२ मिनिटांपासून.
 • त्रयोदशी तिथी समाप्ती – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६:०३ मिनिट.
 • प्रदोष काल – सायंकाळी ६:११ ते ८:४० पर्यंत.
 • वृषभ काल – सायंकाळी ७:३४ ते रात्री ९:३४ पर्यंत

धनत्रयोदशी पूजन हे = त्रयोदशी + प्रदोष काली + आणि स्थिर लग्न ह्या मुहर्तावर करावी.

काही पंचांगाप्रमाणे शनिवारी द्वादशी समाप्ती सायंकाळी ६:०२ आहे आणि सूर्यास्त ६:०९ मिनिटांनी आहे. म्हणून ज्या गावी सूर्यास्त ६:०२ पूर्वी होत असेल त्यांनी धनत्रयोदशी हि दिनांक २३ ऑक्टोबर ला करावी असे दिले आहे. पण त्या दिवशी सायंकाळी ६ नंतर त्रयोदशी समाप्ती आहे आणि दुसरे कारण असे कि राहुकाळ सुद्धा आहे. म्हणून इथे मुंबई आणि पुणे चे दिनांक २२ ऑक्टोबर चे मुहूर्त देत आहे.
इतर शहरात हे पूजन करताना ह्यातल्या मधल्या वेळेचे पालन करावे. कारण धनत्रयोदशी हि त्रयोदशीलाच मानावी.

 • धनत्रयोदशी मुहूर्त — मुंबई सायंकाळी ७:३४ ते ८:४० पर्यंत , पुणे – सायंकाळी ७:३१ ते ८:३६ पर्यंत.
 • दीपदान- शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२
 • यमदीपदान मुहूर्त — दिनांक २२ ऑक्टोबर सायंकाळी ६:११ ते ७:२५ ( १ तास १४ मिनिटे)

धनतेरस संपूर्ण माहिती + कुबेर पूजन + धन्वन्तरी जयंती + आरोग्य मंत्र + दिनांक २२ ऑक्टोबर साठी खास टिप्स + यमदीपदान विधी मंत्र + प्रदोष पूजन हि संपूर्ण माहिती ह्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा मात्र मुहूर्त जे वर दिले आहेत ह्या वर्षीचे तेच पालन करा. (DIWALI MUHURT 2022)

धनतेरस , धन्वन्तरी जयंती, कुबेर पूजन

प्रदोष व्रत विशेष माहिती


नरक चतुर्दर्शी आणि लक्ष्मी पूजन – सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२२

 • अभ्यंग स्नान मुहूर्त – पहाटे : ५:२२ पासून ते ६:३५ पर्यंत ( १ तास १४ मिनिटे)
 • नरक चतुर्दशी चंद्रोदय – ५:२२ चन्द्रोदय
 • चतुर्दशी तिथी प्रारंभ – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६:०३ पासून.
 • चतुर्दशी तिथी समाप्ती – २४ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५:२७ मिनिट.

लक्ष्मी पूजन – सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२२

 • लक्ष्मी पूजन मुहूर्त – सायंकाळी ७:२६ पासून ते रात्री ८:३९ पर्यंत ( १ तास १३ मिनिटे )
 • प्रदोष काल – सायंकाळी ६:१० ते रात्री ८:३९ पर्यंत.
 • वृषभ काल – सायंकाळी ७:२६ ते रात्री ९:२६ पर्यंत.
 • अमावस्या तिथी प्रारंभ – २४ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५:२७ पासून.
 • अमावस्या तिथी समाप्ती– २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ४:१८ पर्यंत.

दिवाळीत लक्ष्मी पूजन करताना चंद्र स्वाती नक्षत्री + तिथी अमावस्या + स्थिर वृषभ लग्नी + प्रदोष काली ह्यांची वेळ साधून मुहूर्त काढला जातो.

वरील मुहूर्त जरी मुंबईचे असले तरी लक्ष्मी पूजन साठी महाराष्ट्रातल्या इतर राज्यांनी मागे पुढे ५/१० मिनिटे सोडून मध्य साधावा. किंवा आपल्या शहरातील पंचांगाचा उपयोग करून वेळ काढावी त्यासाठी प्रदोष काल. आणि वृषभ काल ह्या दोन्ही वेळा त्यात असल्या पाहिजेत ह्याची काळजी घ्यावी.

ज्यांना वरील मुहूर्त जमत नसेल खास व्यापाऱ्यांना त्यांनी खास निशिता काल मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करावे. ते अति शुभ असते.

 • निशिता काल – २४ ऑक्टोबर २०२२ रात्री ११:५८ पासून रात्री १२:४८ पर्यंत. (५० मिनिटे)
 • सिंह लग्न – १:५२ ते पहाटे ४ पर्यंत.

महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या ४ वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी

सर्व विधींची माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा

कलश निर्माण विधी
महालक्ष्मी जप विधी
महालक्ष्मी मंत्र
महालक्ष्मी पाठ
हवन विधी

महालक्ष्मी पूजन विधी, मंत्र, हवं विधी, कलश निर्माण विधी


गोवर्धन पूजन – बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२

 • गोवर्धन पूजन मुहूर्त – २६ ऑक्टोबर २०२२ सकाळी ६:३६ पासून ते सकाळी ८:५५ पर्यंत. ( २ तास १८ मिनिटे)
 • बलिप्रतिपदा + दीपावली पाडवा + भाऊबीज – बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२
 • प्रतिपदा तिथी प्रारंभ – २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ४:१८ मिनिटांपासून.
 • प्रतिपदा तिथी समाप्ती – २६ ऑक्टोबर २०२२ दुपारी २:४२ मिनिटांपर्यंत.

भाऊबीज मुहूर्त

 • २६ ऑक्टोबर २०२२ ला दुपारी १:३१ पासून ३:५० पर्यंत.
 • द्वितीया तिथी प्रारंभ – २६ ऑक्टोबर २:४२ पासून.
 • द्वितीया तिथी समाप्ती – २७ ऑक्टोबर २०२२ दुपारी १२:४५ मिनिटांपर्यंत.

यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज + दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व ह्या सर्व माहितींसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज + दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व

विशेष नोट :—- ह्या पोस्ट मध्ये जेथे जेथे लिंक दिल्या आहेत त्या मागील वर्षीच्या आहेत कृपया त्या वाचताना तेथील मुहूर्त घेऊ नये. फक्त त्याची विधी, महत्व आणि माहिती वाचून घ्यावी आणि काय करावे त्या दिवशी ते पाहावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply