You are currently viewing नवरात्री आणि नवार्ण मंत्र

नवरात्री आणि नवार्ण मंत्र

||ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ||

नऊ अक्षरांच्या ह्या अदभूत मंत्रात आई भगवती दुर्गा च्या नऊ शक्तींचा समावेश आहे. ज्यांचा संबंध नव ग्रहांशी सुद्धा आहे.

ऐं : सरस्वती चा बीज मन्त्र आहे
ह्रीं : महालक्ष्मी चा बीज मन्त्र आहे
क्लीं : महाकाली चा बीज मन्त्र आहे

  • नवार्ण मंत्र च्या प्रथम बीज मंत्रात ” ऐं “ भगवती दुर्गा ची प्रथम शक्ति देवी शैलपुत्री ची उपासना केली जाते ज्यात सूर्य ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या दुसऱ्या बीजमंत्रात ” ह्रीं “ ने भगवती दुर्गा ची व्दितीय शक्ती ब्रह्मचारिणी ची उपासना केली जाते ज्यात चंद्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या तृतीय बीजमंत्रात ” क्लीं “ ने भगवती दुर्गा ची तिसरी शक्ती चंद्रघंटा ची उपासना केली जाते त्यात मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे
  • नवार्ण मंत्र च्या चतुर्थ बीजमंत्रात ” चा “ ने भगवती दुर्गा च्या चौथ्या शक्ती ची कुष्मांडा ची उपासना केली जाते ज्यात बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या पंचम बीज मंत्रात ” मुं “ ने भगवती दुर्गा च्या पाचव्या शक्ती स्कंदमाता ची उपासना केली जाते ज्यात गुरु ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या षष्ठ बीज मंत्रात ” डा “ ने भगवती दुर्गा च्या सहाव्या शक्ती कात्यायनी ची उपासना केली जाते ज्यात शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या सातव्या बीज मंत्रात ” यै “ ने भगवती दुर्गा च्या सप्तम शक्ती कालरात्रि ची उपासना केली जाते ज्यात शनी ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या अष्टम बीज मंत्रात ” वि “ ने भगवती दुर्गा च्या आठव्या शक्ती महागौरी ची उपासना केली जाते ज्यात राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
  • नवार्ण मंत्र च्या नवम बीज मंत्रात ” चै “ ने भगवती दुर्गा च्या नवव्या शक्ती सिद्धीदात्री ची उपासना केली जाते ज्यात केतु ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे.

कसा करावा नवार्ण मंत्र

स्नान करून स्वच्छ होऊन हा मंत्र जप करणे उत्तम. सकाळी सूर्योदय नंतर संध्याकाळी तिन्ही सांजेला अथवा रात्री ११ ते १ च्या दरम्यान उत्तम.

पूर्व दिशेला मुख असावे. बसायला आसन घ्यावे. रुद्राक्ष माळेवर हा जप करावा. रोज १ माळ ५/११/२१/५१ माळा जपू शकता. प्रथम आचमन करून घ्यावे हे रोज करावे.

पहिल्या दिवशी आपण ज्या कार्यसिद्धी साठी जप करत असाल त्याचा संकल्प करावा (आचमन आणि संकल्प कृपया मागील भाग ३ मधे पाहावे)

नवमी च्या रात्री हवन करून घ्यावे. (ह्याबद्दल पुढे माहिती दिली जाईल एक छोटासा हवन करण्यासाठी)

हा मंत्र नवरात्री नंतर सुद्धा रोज एक माळ केल्याने किंवा ह्याचा सव्वा लाख जप केल्याने सिद्ध होतो.
जीवनात कधीही ह्याची ५ लाख जप संख्या पूर्ण झाल्यावर त्यास ते जीवन सफल होण्याची प्रचिती नक्की मिळते.

लाभ आणि महत्व नवार्ण मंत्राचे

महा सवरस्वती महालक्ष्मी महाकाली ह्या तिन्ही शक्तींची उपासना एकाच मंत्रात होते आणि संकल्प सिद्धी होते.

सत्युगात मार्केंडेय ऋषींनी ह्या मंत्राचे अनुष्ठान केले आणि ७०० श्लोक लिहून दुर्गा सप्तशती लिहिली. त्रेतायुगात श्री रामाने अनुष्ठान केले. द्वापार युगात श्री कृष्णाने केले आणि अर्जुनाला सुद्धा हे करण्यास प्रेरित केले.

सर्व मंत्राचा सर्वोतोपरी सुमेरू आहे हा मंत्र. कोणत्याही आपल्या निगेटिव्ह शक्ती असतील तर निघून जातील आणि नसतील तरी त्या आपल्या अवती भोवती दिसणार नाहीत. चहू बाजुंनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांनी हा मंत्र केलाच पाहिजे स्वतःचे. ह्या मंत्राचे अनुष्ठान केले तर व्यक्तीच्या वाणीतून जे निघेल ते सत्य होते.

नवग्रहांच्या कोणत्याही पीडेतून मुक्त होण्यासाठी ह्या मंत्राची साधना केल्याने लाभ होतात.
धन-संपदा मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा ची प्राप्ती होते. आत्मविशास, बळ, साहस ह्यात वृद्धी होते.
शत्रू शांत होण्यासाठी सुद्धा ह्या मंत्राचा जप केल्याने शत्रू पीडा दूर होते. कोणताही उत्कीलं आणि शापोद्वार ह्या मंत्राला नाही.

सर्व मंत्रांबद्दल

मंत्र शब्दकोशात मननीयेते मंत्रायते– जे आपल्या आतल्या हृदयातून मनातून आतल्या आवाजाने निघते ते मंत्र. तेव्हा जास्त विचार करू नये नवरात्रीत रोज फक्त एक माळ तरी करावी. जास्त करण्याचा आधी प्रयत्न करू नये.

नवरात्रीनंतर सुद्धा रोज केले तरी चालेल आणि नंतर जशी जशी ह्याच्या शक्तीची अनुभूती येत राहील तशी तशी संख्या वाढवून ह्याने आपल्या इतर शक्तींना जागृत करता येईल असे माझे स्वतःचे मत आहे. लगेच ११/२१/५१ माळा करण्याची घाई करू नये.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    Best 👍 👌 information

Leave a Reply