You are currently viewing महालक्ष्मी ला प्रिय असणाऱ्या ४ वस्तूंची माहिती, लाभ आणि पूजन विधी

जाणून घ्या महालक्ष्मी ला प्रिय असणाऱ्या ४ वस्तूंची माहिती,लाभ आणि त्यांच्या पूजन विधी बद्दल

गोमती चक्र

सर्व सिद्धी योग, अमृत योग, रवी पुष्यमृत योग, दिवाळी, होळी या सर्व मुहूर्तावर गोमती चक्राला सिद्ध करता येते.

धन लाभ साठी ११ गोमती चक्र आपल्या पूजेच्या ठिकाणी एका वाटीत ठेऊन त्यासमोर ।।ॐ श्रीं श्रियें नमः ।। चा जाप ११ वेळा किंवा १ माळा जप केल्याने धनाच्या बाबतीत चांगले परिणाम दिसतात.

स्फटिक श्री यंत्र

स्फटिक श्री यंत्र हे महालक्षमी चे प्रतीक आहे. दीपावली च्या दिवशी स्फटिक श्री यंत्र सिद्ध केले जाते. स्फटिक श्री यंत्राची पूजा केल्याने धन धान्य सुखसमृद्दी पती पत्नी मध्ये मधुरता ह्यांचा लाभ होतो.

ह्याला अभिमंत्रित करून स्थापना करून जर ह्याची रोज पूजा केल्याने वास्तू दोष राहत नाही. ह्याची उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होते. व्यवसायात सफलता येते. धन संचय चांगले होते.ह्या यंत्राची स्थिर लग्नात पूजा केली जाते.

सर्वात आधी गणेश पुजन करून घ्यावे. गणेश आवाहन झाल्यावर प्रथम गंगाजल आणि दुधाने त्यावर एका ताटात घेऊन ।।ॐ श्रीं श्रियें नमः ।। म्हणत अभिषेक करावा. पुन्हा गंगाजल ने स्वच्छ करून लाल वस्त्रावर ह्याची स्थापना करावी. सफेद फुले आणि त्यावर हळद कुंकू वाहून नमस्कार करावा.

केसर आणि हळदीत अक्षता रंगवून १००१ अक्षता मोजून जपाला बसावे एक एक अक्षता श्री यंत्रावर अर्पण कराव्या नंतर त्या समोर सफेद मिठाई चा नैवेद्य दाखवावा. १००१ वेळा शक्य न झाल्यास ११ माळा जप करून घ्यावा श्री यंत्रासमोर.

मंत्र –।।ॐ श्रीं श्रियें नमः ।।

ज्यांची इच्छा प्राणप्रतिष्ठा हि ब्राह्म्हणांकडून करून घ्यायची असेल आणि जर ज्यांना पैशाचा काही अडचण नसेल त्यांनी प्राणप्रतिष्ठा जरूर ब्राह्म्हणांकडून करून घ्यावी. हे शक्य नसल्यास वरील प्रमाणे श्रद्धेने करावे.

एकाक्षी नारळ

एक डोळा असणारा एकाक्षी नारळ हा बाजारात खास महालक्ष्मी च्या पूजेसाठी मिळतो.तो लक्ष्मी पूजनात ठेऊन त्यावर लाल धागा ७ वेळा बांधून महालक्ष्मी ला अर्पण करावा आणि त्याची हळद कुंकू वाहून रोज पूजा करावी.

जे व्यापारी आहेत त्यांना व्यापारात लाभ होण्यासाठी दीपावली च्या दिवशी लाल कपड्यावर एक मुठी गहू ठेऊन त्यावर एकाक्षी नारळ स्थापन करावा त्याला सिंदूर चा टिळा लावावा धूप दीप दाखवून २१ माळा खाली दिलेला मंत्र जप करावा खास लाल पोवळ्या (मुंगा) च्या माळेवर.

आणि त्यानंतर लाल कपड्यासहित हे उचलून त्याची पोटली बनवावी (वर गाठ मारून) हि पोटली दुकानाच्या मुख्य दरवाजात मधोमध लावावी जेणे करून येणाऱ्या ग्राहकांची नजर त्यावर पडेल. हे अशक्य असल्यास दुकानाच्या गल्ल्यात ठेवावा ह्याने व्यापारात लाभ होतात. रोज ह्याला धूप दीप दाखवून सात्विक ठेवावे.

मंत्र- ऊं श्रीं श्रीं श्रीं परम सिद्धि व्यापार वृद्धि नम:।

दक्षिणावर्त शंख

दक्षिणावर्त शंख हा वामावर्त शंख म्हणून ओळखला जातो कारण त्याची निमुळती बाजू हि पूर्व दिशेला असेल तर ते दक्षिणेस उघडते. दक्षिणावर्त शंख जर घरात दुकानात स्थापित केला तर तेथे लक्ष्मी चा वास असतो.

दक्षिणावर्त शंख शुद्ध गंगाजल किंवा गायीचे दूध भरून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी घरात शिंपडावे घरातील वास्तू दोष दूर होण्यास मदत होते. दक्षिणावर्त शंखातले हेच पाणी किंवा दूध जर रोग्यास दिले तर रोग दूर होण्यासाठी चमत्कारिक अनुभव मिळतात.

दक्षिणावर्त शंखातले हेच पाणी अंघोळीच्या पाण्यात वापरल्याने ग्रहपीडा शांत होण्यास मदत होते.
दक्षिणावर्त शंख ची रोज पूजा करणाऱ्या पती पत्नी मध्ये क्लेश होत नाहीत. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी जरूर अनुभव घ्यावा.

दक्षिणावर्त शंखाची रोज पूजा करून मोठ्यात मोठे संतान दोष दूर होतात. (ज्यांना एक नाडी दोष आहे अशा जोडप्यांनी जरूर ह्याची पूजा करावी) दक्षिणावर्त शंखाच्या पूजनाने व्यक्तीला मान सन्मानाची प्राप्ती होते.

दीपावली पूर्वी हा शंख शुभ मुहूर्तावर घरी आणून त्याची दीपावली च्या रात्री शुभ वेळी स्थापना करावी. एका वाटीत थोडे तांदूळ ठेऊन त्यावर हा शंख स्थापन करावा त्यात गंगाजल किंवा गायीचे दूध भरावे आणि त्या समोर महालक्ष्मी चा मंत्र म्हणावा.

रोजच्या पूजेत शंख स्वच्छ करून नेहमी महालक्ष्मी मंत्र म्हणून तांदळाने भरलेल्या वाटीत ठेवावा किंवा हे अशक्य नसेल तर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावा.

वरील चारही वास्तू पैकी जे जे मिळेल ते घ्यावे आणि महालक्षमी समोर त्याची स्थापना करावी.
स्थापना करून रोज तेथे स्वच्छता करून पूजा करावी त्याची काही ना काही स्तुती स्तोत्र पाठ मंत्र जप करत राहावे.

धनयवाद…..!

Leave a Reply