You are currently viewing महालक्ष्मी पूजन : शनिवार १४ नोव्हेंबर २०२०

महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या काही वस्तू आणि थोडी पूजन विधी

दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी महालक्ष्मी चे पूजन तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे करा जशी तुमची श्रद्धा पद्धत असेल तसे आणि जेव्हडे जमेल तशी पूजा करावी. षोडोपचारे कुणाला जमत नसेल तरी चालेल श्रद्धा महत्वाची.

जर खालील वस्तू जर तुमच्या विभागात मिळत असतील तर जरूर वापर करा पूजनात (जे जे मिळेल ते ते घ्या )

हे एका ताटात घ्या आणि महालक्ष्मी च्या समोर हे सर्व देवीला अर्पण करा.

एक स्वस्तिक ताटात सुद्धा काढावे. स्वस्तिक काढताना केसर चा उपयोग जरूर करा.

९ किंवा ११ सफेद किंवा पिवळी कवडी त्याला केसर + गंगाजल मिक्स करून लावा. ११ गोमती चक्र ह्यांना सुद्धा एका छोट्या वाटीत ठेवा आणि दुसरया दिवसापासून देव्हाऱ्यात पूजेला ठेवा.

जर महालक्ष्मी पूजन करताना तुमच्याकडे मंडप उभारणी ची पद्धती असेल तर उसाचे वरचे पाते घ्या आणि ह्याचा उपयोग मंडपाची सजावट करताना वापरा एक ऊस छोटा ताटात सुद्धा ठेवा. महालक्ष्मी च्या हत्तीला प्रसाद म्हणून असतो हा.

कमल गट्टा ची १०८ माळा सुद्धा पूजनासाठी घेऊ शकता हि माळा फोटो च्या समोर ठेवा जर घट बसवीत असाल तर ह्या माळेवर घट बसवू शकता गोल गोल करून मधोमध. एक अजून माळ जपासाठी सुद्धा घेऊ शकता.

२ पाने घ्या त्यावर २ हिरव्या वेलची + २ लवंग तुपात बुडवून त्या पानावर ठेवा. महालक्ष्मी ला लाल गुलाब सुद्धा अर्पण करण्यासाठी ठेवा.

वरील सर्व साहित्य एका ताटात महालक्ष्मी ला अर्पण करण्यासाठी व्यवस्थित ठेवा आणि पूजनात महालक्ष्मी समोर हे ताट ठेऊन प्रार्थना करा.

महालक्ष्मी ला तिलक करताना जरूर केसर चा वापर करा. आरती करताना २ लवंग + कापराने आरती करा तूप टाकून. गुलाबाचे अत्तर कापसाने महालक्ष्मी ला अर्पण करा. ताटात किंवा घटाच्या सजावटीला घरातील दागिने सुद्धा ठेवू शकता.

कलश निर्माण विधी

जर कलश ठेवत असाल तर त्या पाण्यात थोडे गंगाजल मिक्स करा.थोडा दुर्वा + एक सुपारी + एक कॉइन + हळदी कुंकू एक चिमटी + अक्षता + त्या कलशाला आंब्याची पाने ५ / ७ लावून त्यावर नारळ ठेवा आणि कलशाला कुंकू ने स्वस्तिक काढा.
दरवाजाला गोंड्याच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण सुद्धा लावा. जिथे पूजन करणार आहात तेथे गोमुत्राने स्वच्छ पुसून घ्या.

एका पाटावर लाल कापड लावून घ्या. त्यावर महालक्ष्मी गणेश सरस्वती असा फोटो बाजारात मिळतो. किंवा आपल्या घरातील फोटो असेल तरी त्याची पूजा करू शकता. त्याला लागणारा एखाद्या सुंदर हार सुद्धा तयार करून ठेवा बाजूला.

महालक्ष्मी पूजन विधी

वरील सर्व तयारी करून झाल्यावर दिलेल्या शुभ मुहूर्ती पूजनाला सुरुवात करा. महालक्ष्मी पूजनात बसायला लाल आसन आणि लाल वस्त्र वापरावे.

पूजेला सुरवात करण्याच्या अगोदर तुम्ही कुठे आहात तुमचे नाव काय आईवडिलांचे कुलदेवतेचे नाव घेऊन आचमन करून पूजेला सुरुवात करा.

आता एक मुख्य दिवाळीचा दिवा लावा आणि त्या दिव्याने तुमच्या समया इतर दरवाजात लावणारे दिवे प्रज्वलित करून घ्या.

प्रथम श्री गणेशाचे पूजन म्हणजे दोन पानाच्या पानावर एक सुपारी स्वच्छ करून ठेवणे आणि त्यावर एक पळी पाणी सोडून स्नान घालून स्वच्छ करून पुन्हा ठेवणे आणि त्यावर गणेश मंत्र म्हणत हळद कुंकू दुर्वा एखादे लाल फुल घालून श्री गणेशाला पुढील पूजेसाठी मनोमन आमंत्रित करावे.

या नंतर महालक्ष्मी च्या पूजनाची सुरुवात करा.

पाटावर महालक्ष्मी च्या फोटो समोर किंवा बाजूला घट मांडा घटाखाली बॅलन्स होण्यासाठी तांदूळ अथवा तुम्ही आणलेली कमळगट्टा ची माळ गोल करून मधोमध घट स्थापन करा.

ह्या पूजनात विष्णू कुबेर आणि इंद्र सुद्धा फार महत्वाचे असतात जर त्याच्या मूर्ती उपलब्ध नसतील तर घटाच्या समोर थोडे थोडे तांदूळ ठेऊन त्यावर सुपारी ठेऊन त्यांचे आगमन सुद्धा येथे आहे अशी मनोभावे प्रार्थना करा आणि पूजेला सुरुवात करा.

खास गणेश साठी गूळ खोबरे एका छोट्या प्लेट मध्ये आणि महालक्ष्मी ला धने आणि गूळ आणि बत्ताशा,लाह्या शक्य झाल्यास सफेद किंवा गुलाबी मिठाई सुद्धा नैवेद्य म्हणून समोर ठेवा. ५ वेगवेगळ्या प्रकारची कोणतीही फळे ठेवा.

आता तुम्ही सर्व मूर्तींवर फोटोवर घटावर गंगाजल/पाणी शिंपडून हळद कुंकू वहा टिके लावून घ्या. कापसाने महालक्ष्मी ला गुलाबाचे अत्तर सुद्धा लावा. हे करताना मनातल्या मनात ।।ॐ श्रीं श्रियें नमः ।। किंवा श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हे मंत्र उच्चारात जावे.

महालक्षमी ला प्रसन्न करणारे जे वरील प्रमाणे ताट तयार करून घेतले आहे ते समोर ठेवून प्रार्थना करा कि मी माझ्या ऐपतीप्रमाणे तुझी सेवा म्हणून हे सर्व तुला अर्पण करत आहे. तेव्हा तुझा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू देत.

नंतर जिथे जिथे फळे , नैवेद्य ठेवले आहेत तिथे तिथे ॐ नैवेद्य समर्पयामि म्हणून पाणी सोडून घ्या.

आता तुम्ही महालक्ष्मी ची आरती करू शकता. ती आरती सर्व घराच्या कोपऱ्यात फिरवा. आणि पुन्हा पूजेच्या ठिकाणी येऊन काही चूक झाली असेल तर त्याची क्षमायाचना करा.

महालक्ष्मी जप विधी

महालक्ष्मी पूजनात महालक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी तिच्या पुढे मंत्र जप अति महत्वाचा आहे असे माझे मत आहे.

खाली काही मंत्र देतो ते लाल आसन लाल कपडे परिधान करून जपासाठी कमळगट्टा किंवा स्फटिकाची माळ घेणे अगदीच शक्य नसेल तर रुद्राक्ष हे सुद्धा जमत नसेल तर तुम्हाला जेव्हढा वेळ शक्य असेल तेव्हढा वेळ जप करून घ्यावा १५ मिनिटे ३० मिनिटे अगदी सव्वा तास सुद्धा. हा जप जर तेव्हा जमत नसेल तर हा जप रात्री निशित काळ मध्ये सुद्धा करू शकता.

एक लक्षात घ्या कोणताही मंत्र होळीची पूर्णिमा आणि दिवाळीची अमावस्या ह्या दिवशी निशित काळ मध्ये जपला तर तो सहज सिद्ध होतो.

सिद्ध होणे म्हणजे नेमके काय होते कि तो मंत्र तुम्ही कधीही तुमच्या कोण्याही कार्यसिद्धी साठी जपून गेलात तर ते कार्य पूर्ण होतेच. असा माझा स्वतःचा समज आहे. तेव्हा ज्यांना मंत्र जपाच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी जरूर घ्यावा.

जमेल तो मंत्र करा खाली काही महालक्ष्मी मंत्र देत आहे.

महालक्ष्मी मंत्र

  • ।।ॐ श्रीं श्रियें नमः ।।
  • ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।।
  • ॐ ऐं ह्रीं श्रीं ज्येष्ठ लक्ष्मी स्वयम्भुवे ह्रीं ज्येष्ठायै नमः ।।
  • ॐ ह्रीं क्लिं महालक्ष्म्यै नमः ।।
  • ।। ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिध्द लक्ष्म्यै नमः ।।

महालक्ष्मी पाठ

ह्यात महालक्ष्मी चे कणकधारा स्तोत्र , श्री सूक्त फार महत्वाचे आहे.

हवन विधी

ह्यात हवन विधी सुद्धा फार महत्वाचा असतो. ज्यांना हवन करायचा असेल त्यांनी हवन करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून आणून ठेवावे त्यात समिधा आंब्याची लाकडे गायीच्या गोवऱ्या गूगल धूप आणि हवन कुंड महत्वाचे आहे.

जिथे हवन करणार असाल तेथे मागे नवरात्रीत जसा विधी दिला आहे (वाचून घ्या तिथे फक्त हवनात अग्नीत स्वाहा करणारे साहित्य च्या जागी फक्त कमळगट्टाच्या १०८ बीज वापरावे) तशीच तयारी करावी. आणि नंतर हवन सुरु करून त्यात कमळगट्टा ची एक एक बीजे १०८ वेळा मंत्र म्हणून स्वाहा करावीत.

मंत्र : ॐ महालक्ष्मे नमः स्वाहा म्हणून एक एक बीज सोडावे १०८ वेळा असे झाले तर एक नारळ होमात टाकावा आणि नमस्कार करावा.

नोट : वरील सर्व पद्धती हि जास्तीत जास्त सोपी करून सांगितली आहे तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही महालक्ष्मी चे पूजन करून त्याचे फळ मिळवा अगदी श्रद्धेने. तुम्हाला जे लागेल जेव्हढे जमेल ते इथून घ्या.

तुम्हा सर्वाना महालक्ष्मी प्रसन्न होवो आणि तुमची खूप भरभराट होवो हीच तिच्या चरणी प्रार्थना

नोट : तुम्ही महालक्ष्मी ला जेव्हढ्या वस्तू ताटात अर्पण केलेल्या आहेत आणि ज्या खराब न होणाऱ्या आहेत त्या सर्व लाल कपड्यात बांधून तिजोरीत वर्षभर ठेऊ शकता. लाभ होतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply