You are currently viewing गोवत्स द्वादशी – वसुबारस : गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२०

हिंदू संस्कृतीत मानव जीवनात गायीला मातेच्या समान मानले जाते. धार्मिक आणि वैज्ञानिक औषधी रूपात गायीने मानवाला पूर्ण समर्पित केल्याने तिच्या प्रति धन्यवाद आणि कृतज्ञता प्रकट करण्याचा सण म्हणजे वसुबारस.

पुराणाच्या आख्यायिका प्रमाणे समुद्र मंथनातून ५ कामधेनू निघाल्या होत्या. त्यात नंदा नावाच्या कामधेनूचा हा वसुबारस सण साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया गहू मूग वर्ज करून उपवास करतात. आपल्या मुलाबाळांना सुख लाभावे, ऋषी उत्पन्न चांगले व्हावे, सुख मिळावे हा त्यामागचा हेतू असतो. स्त्रिया ह्या दिवशी गवारीची भाजी आणि बाजरीची भाजी खाऊन उपवास सोडतात.

ज्यांना वरील काहीच जमत नसेल त्यांनी–

ह्या दिवशी कुठेही गाय आणि वासरू जर संध्याकाळी असतील तिथे जाऊन तिच्या पायावर पाणी हळद कुंकू वाहून तिची मनोभावे पूजा करावी तिच्या पायावर पाणी टाकावे आणि नमस्कार करून गायीला आणि वासराला गोड धोड खाऊ घालावे. शक्य असल्यास निरांजनाने ओवाळावे आणि गायीच्या अंगाला स्पर्श करावा. ज्या स्त्रियांना अजून संतती झालेली नाही त्यांनी सुद्धा हा प्रयोग जरूर करावा लाभ होतील.

असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.

जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

गाय आणि ज्योतिष

गायीला आणि आईला आपल्या संस्कृतीत एकसमान मान मिळतो हे मान्य करून घ्या. कारण तुम्ही अशा देशात जन्म घेतला आहे जिथे भौतिक सुखापेक्षा जास्त संस्कृती जपली जाते.

गाय हा विषय आज तुमच्या समोर मांडताना मला कोणत्याही वेगळ्या धर्माचा अपमान करण्याचा कोणताही उद्धेश नाही पण आपण हिंदू संस्कृतीत जर जन्माला आलो आहोत तर गायीचा अपमान आपल्या आईचा अपमान म्हणून समजा.

मागील काही सिनेमामध्ये तुम्ही तरुण पिढीने पाहिले असेल कि गायीला काही खायला दिल्याने काय जॉब मिळतो ? तर जर नाही असे मानले तरी मी म्हणेन कि गायीची सेवा केल्याने लाखो पापे आपली नष्ट होतात आणि आपण सन्मानाने समाजात वावरतो .

पुढे तुमचा प्रश्न असाही असेल कि जर गायीची सेवा केल्याने गाय पाळणारे किती समृद्धी झाले तर मुळात त्यांना गायीची सेवा करण्याचे पुण्य आहे असेच मी मानतो. कि देवाने त्यासाठी त्याना इथे जन्म दिला आहे हीच त्याची समृद्धी असेल.

हा विषय जास्त खेचू शकत नाही कारण इथे मग अंधश्रद्धेचा भाग होऊ लागतो पण हे नक्की आहे कि गाय हि आपल्या जीवनातील माय आहे. जी सतत आपल्याला २४ तास ऑक्सिजन देते. जी शेणातून सुद्धा सुखसमृद्धी आणते. जी दुधातून सुद्धा आपल्या लहान मुलांचे संगोपन करते. जिच्या गोमुत्राने सुद्धा अनंत बॅकटेरिया दूर पळतात. जिची प्रत्येक वस्तू हि काही न काही तरी कामाला येते.

तुम्ही काय कराल गायीची सेवा म्हणून ज्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर करण्याची ताकद मिळेल

तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर गाय असेल तर रोजची एक चपाती + गूळ गायीला जरूर द्या.
जी पहिली तुम्ही बनवाल चपाती ती मुख्य. ह्याने पितृदोष शिवाय पत्रिकेतील इतर दोष दूर होण्यास मदत मिळेल.

गायीचे गोमूत्र रोज घरात शिंपडा ह्याने घरातील निगेटिव्ह स्पंदने दूर होतात.

गायीच्या पोटाखालून आपल्या बालकांना एकदा तरी काढून घ्या हे करताना जरूर काही इजा होणार नाही ह्याची दक्षता घ्या तुम्हाला जमेल तशी.

जर राहू आणि राहू च्या दोषात किंवा महादशेत राहूची पत्रिका असेल नसेल तरी…

  • रोज गोमूत्र प्या.
  • रोज अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र घाला.
  • रोज गोमूत्र चा टिळा सुद्धा लावा.
  • रोज गोमूत्र घेऊन घरात शिंपडा.
  • रोज गायीचे दूध प्या.
  • महिन्यातून एकदा पंचगव्याचे प्राशन करा. पंचगव्य = (गायीचे दूध + त्याचेच दही + गोमूत्र + शेण + तूप ) हे सर्व गायीचेच असले पाहिजे ह्याचा एक गोळा चिमूटभर तयार करा आणि तो जिभेवर ठेवा आणि थोड्या वेळाने पाण्याबरोबर प्राशन करा. ह्यात शेण जो प्रकार आहे तो सुईच्या टोकाएव्हडा तरी घेतला तरी चालेल.

गायीच्या कोणत्याही सेवेत असताना पत्रिकेतील राहू मुळे जे दोष उत्पन्न होतात ते जातात.

आधीच्या पिढीत हे दोष म्हणजे त्याच्या घरात राहू नेहमी डी – ऍक्टिव्हेट असायचा मग काय काय चांगले असायचे ते पहा. कारण घर शेणाने सजविले जायचे घरात गोमूत्र असायचे घराच्या अंगणात गाय बांधलेली असायची.

मग

सर्व डिलिव्हरी नॉर्मल (आता एका डिलिव्हरी ला ५००००/- रुपये आणि सिजरीन सुद्धा)
घरात ५/५ भावंडे एकत्र संसार (आता दोन राहू शकत नाहीत एकाच घरात)

वसुबारस पासून लागा सेवेला कोणतीही अंधश्रद्धा समजू नका हा एक धर्माचा भाग समजा आणि करा.प्रत्येकाला जमेल असे नाहीच पण जिथे जिथे गौ सेवा होत असेल तिथे तिथे दान धर्म करू शकता तर करत राहा.

शहरी भागात काहीच होत नसेल तर निदान बाहेरचे कमी खा घरातील वस्तू सर्व गायीपासून बनलेली जास्तीत जास्त वापर करा हीच सेवा समजू शकतो आपण.

धन्यवाद…..!

Leave a Reply