You are currently viewing नवरात्रातील अष्टमी किंवा नवमी हवन कसे करावे

पुराणां मधील उल्लेखानुसार देवीच्या ह्या उपासनेत होम हवन केल्यानेच त्यात आपण केलेल्या साधनेचे पूर्ण फळ मिळते असा उल्लेख असल्याने नवरात्रीत अष्टमी आणि नवमी ला हवन विधीला फार महत्व आहे.

आपल्याला जमेल अशीच घरच्या घरी सोयीस्कर हवन विधी देत आहे पण त्यात जर तुम्ही तुमच्या प्रांत आणि रीतीप्रमाणे आधी करत असाल तर नवीन काही करण्याचा प्रयत्न नको.

कोणत्याही हवन सामग्री मध्ये बाजारात जी सामग्री मिळते ती घेऊन येऊ शकता पण खालील सुद्धा जी देत आहे ती महत्वाची आहे.

  • हवन सामग्री मध्ये साधारण आंब्याच्या लाकडाचा उपयोग करावा.
  • एका ताटात खालील वस्तू मिक्स करून घ्याव्यात.
  • १००/२०० ग्राम काळे तीळ जे गंगाजल शिंपडून शुद्ध करून घ्यावेत
  • जव, गहू, तांदूळ, २५/२५ ग्राम घ्यावेत
  • ११ लवंग, पंच मेवा (ह्यात काजू मनुका खजूर सुख्या नारळाचे तुकडे थोडे थोडे घ्यावेत)
  • गूगल धूप १० ग्राम (बाजारात काळ्या रंगाचा मिळतो साधारण ६० रुपये ५० ग्राम)
  • १०० ग्राम गूळ आणि थोडे मध.

वरील सर्व साहित्याला एका ताटात मिक्स करून त्यावर थोडे गायीचे तूप घालून एका बाजूला ठेवावे. त्याबरोबर १००/२०० ग्राम गायीचे तूप भांड्यात गरम करून त्यात मोठा एक चमचा सुद्धा ठेवून बसावे.

आता जिथे हवन करायचा असेल तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी गोमूत्र शिंपडून पुसून घ्यावे . तेथे मदोमध रांगोळी काढावी. विटा किंवा रेडिमेड हवन कुंड मिळते ते त्यावर ठेवावे आजूबाजूला रांगोळी पुन्हा काढून घ्यावी. विटांनी बनविलेला हवन कुंड असेल तर त्यात थोडी माती टाकावी ज्याने करून जमिनीवर त्याचा दाह होणार नाही.

स्वच्छ होऊन पूर्व दिशेला मुख करून बसावे हवन कुंडला नमस्कार करावा आणि आचमन करावे. (हा विधी मागील पोस्ट मध्ये दिला आहे) हवन कुंडाभोवती एक लाल धागा बांधून घ्यावा.
गणेश आवाहन करण्यासाठी एक विडा (पान सुपारी) ठेऊन त्यावर फुल दुर्वा घालून गणेश मंत्र म्हणून नमस्कार करावा. हे बाजूला पाटावर समोर ठेऊ शकता किंवा हवन कुंडावर जागा असेल तर तेथे.

हवन कुंडात चार पाच आंब्याच्या लाकड्या तोडून ठेवाव्यात जमल्यास गायीच्या शेणी सुद्धा त्याबरोबर चालतील. त्यावर थोडे तूप घालून २/४ कपूर ठेऊन अग्नी ला प्रज्वलित करावे. हि अग्नी पेटविताना खालील मंत्र म्हणावा आणि एक आहुती द्यावी तुपाची. (एकदम थोडे).
ॐ आग्नेय नम: स्वाहा. अग्नी व्यवस्थित पेटून घ्यावा ज्वाळा थोड्या वर आल्यावर.

नंतर खालील मंत्र म्हणत एक एक आहुती देत जावी (आहुती म्हणजे तुम्ही जी ताटात सामग्री घेतली आहे ती आणि जर शक्य असेल तर घरातील एखाद्याने एक दोन थेम्ब तूप चमच्याने सोडत राहावे प्रत्येक आहुती बरोबर) स्वतः ला जमत असेल तरी चालेल.
नोट — आहुती देताना अग्नी विझणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे जर असे होत असेल तर मधे मधे कापूरवडी घालावी.

ॐ गणेशाय नम: स्वाहा,
ॐ गौरियाय नम: स्वाहा,
ॐ वरुणाय नम: स्वाहा,
ॐ सूर्यादि नवग्रहाय नम: स्वाहा,
ॐ दुर्गाय नम: स्वाहा,
ॐ महाकालिकाय नम: स्वाहा
ॐ हनुमते नम: स्वाहा,
ॐ भैरवाय नम: स्वाहा,
ॐ कुल देवताय नम: स्वाहा,
ॐ स्थान देवताय नम: स्वाहा
ॐ ब्रह्माय नम: स्वाहा,
ॐ विष्णवे नम: स्वाहा,
ॐ शिवाय नम: स्वाहा
ॐ जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा, स्वधा नमस्तुति स्वाहा,

ॐ ब्रह्मामुरारी त्रिपुरांतकारी भानु: क्षादी: भूमि सुतो बुधश्च: गुरुश्च शुक्रे शनि राहु केतो सर्वे ग्रहा शांति कर: स्वाहा,

ॐ गुर्रु ब्रह्मा, गुर्रु विष्णु, गुर्रु देवा महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम: स्वाहा

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् मृत्युन्जाय नम: स्वाहा,

ॐ शरणागत दीनार्त परित्राण परायणे, सर्व स्थार्ति हरे देवि नारायणी नमस्तुते।

नंतर पूर्ण आहुती स्वरूपात—- एक नारळ , थोडे तूप , लाल धागा , पान , सुपारी , लवंग, जायफळ , आणि ताटातील उरलेली सामग्री हवन मध्ये सोडावी आणि हे सोडताना खालील मंत्र जमल्यास म्हणावा.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पुर्णात पूण्य मुदच्यते पुणस्य पूर्णमादाय पूर्णमेल विसिस्यते स्वाहा।

दक्षिणेच्या स्वरूपात एक दोन रुपये चा सिक्खा हवन वर ठेवावा. आणि भगवती दुर्गा देवीची क्षमायाचना करावी जे काही चुकले असेल कोणत्याही विधी विधानात त्याबद्दल माफी मागून नमस्कार करावा.

अगदीच अडचण असेल हवन थंड झाला कि मग हलवू शकता नाहीतर दुसऱ्या दिवशी त्यातील सर्व पाण्यात किंवा चांगल्या झाडाझुडपात विसर्जित करावे.

नोट — जिथे जिथे स्वाहा शब्द लिहिला आहे तेव्हा तेव्हा एक एक आहुती दिली जाते.

जे नवार्ण मंत्राची साधना नऊ दिवस करत आहेत त्यांनी नवमी ला हवन करावा — त्यात हवन विधी ची तयारी करून ॐ शरणागत दीनार्त परित्राण परायणे, सर्व स्थार्ति हरे देवि नारायणी नमस्तुते। च्या आधी जे जे दिले आहे त्यांनी आहुती दिल्यावर
१०८ वेळा नवार्ण मंत्राने आहुती द्यावी. आणि पूर्ण आहुती स्वरूपातील शेवटी दिलेला विधी करावा.

ज्यांनी सप्तशती चे ७ दिवसात पाठ पूर्ण केले आहेत त्यांनी अष्टमीला किंवा नवमीला हवन करू शकता.

हि एक सामान्य हवन विधी आहे आपल्या इथे ज्या पद्धतीने हवन करता येत असेल त्यांनी जरूर करावा ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी वरील माहितीचा आधार घेऊ शकता. जमेल तेच मंत्र हवन विधीत म्हणावेत अगदीच काहीच जमत नसेल तर गणेश आवाहन नंतर ॐ दूं दुर्गाय नमः स्वाहा असे म्हणत १०८ वेळा आहुती द्यावी.

हे हि जमत नसेल तर नुसता एका भांड्यात कपूर पेटवून त्यात ५ वेळा तरी आहुती द्यावी त्यात तूप गूळ आणि थोडा गूगल धूप घ्यावा आणि देवीकडे क्षमायाचना करावी आणि आपल्या साधनेची सांगता करावी. आहुतित जमेल तो देवीचा मंत्र म्हणावा. हा एक श्रद्धेचा भाग आहे विधी नाही. पण काहीच न करण्यापेक्षा हे बरे. जर तुम्ही नऊ दिवस उपवास, मंत्र , सप्तशती , किंवा कोणतीही साधना करत असाल तर.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Yogita

    Nice information. 🙏

Leave a Reply