You are currently viewing रमा एकादशी : बुधवार ११ नोव्हेंबर २०२०

रमा एकादशी मुहूर्त

  • एकादशी तिथि आरंभ :– ११ नोव्हेंबर ला पहाटे ३:२४ पासून ते १२ नोव्हेंबर रात्री १२:४० पर्यंत
  • एकादशी व्रत पारण तिथि (उपवास सोडणे) :- १२ नोव्हेंबर सकाळी ६:४२ पासून ते ८:५१ पर्यंत.

अश्विन मास च्या कृष्ण पक्षी रमा एकादशी दिवाळीच्या ४ दिवस अगोदर येते. आंध्र / कर्नाटक / गुजरात / महाराष्ट्रात हि अश्विन मासात येत असते. उत्तर भारतीय कॅलेंडर प्रमाणे हि एकादशी कार्तिक मास च्या कृष्ण पक्षी येते.

रमा हे लक्ष्मी चे सुद्धा एक नाव आहे. ह्याला काही ठिकाणी रम्भा एकादशी सुद्धा म्हणतात.

रमा एकादशी ची कथा

जो वाचेल त्याला एकादशीचे पूर्ण फळ मिळेल. जो श्रवण (ऐकेल) त्याला सुद्धा एकादशी चे फळ मिळेल. आणि ह्या वॉट्स अप फेसबुक च्या जमान्यात जो सेंड करेल त्याला सुद्धा एकादशी चे पूर्ण फळ मिळेल असे म्हणावे लागेलच.

प्रत्येक एकादशी च्या वेगवेगळ्या गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत ज्या कृष्णाने युधिष्टिर च्या आग्रहाखातर सांगून ठेवल्या आहेत.

युधिष्ठीर च्या आग्रहाखातर कृष्णाने रमा एकादशी च्या व्रताची कथा त्याला सांगितली ती अशी

पौराणिक युगात मुचुकुंद नावाचा प्रतापी राजा होता. त्याला एक सुंदर कन्या होती तिचे नाव चंद्रभागा होते. तिचा विवाह चंद्रसेन चा मुलगा शोभन ह्यांच्याबरोबर झाला. एकदा हे दोघे पती पत्नी मुचुकुंद च्या राज्यात गेले असता तेव्हाच रमा एकादशी होती हे पाहून चंद्रभागेला काळजी वाटू लागली कारण त्या राज्यात एकादशी च्या दिवशी कोणीही अन्न घेत नसे. मग कोणताही मनुष्यप्राणी त्या दिवशी अन्न खात नसत आणि उपवास करत.

तिने आपल्या पतीला शोभन ला सांगितले कि आपण ह्या दिवशी इथे नसायला पाहिजे होते कारण हे उपवास वगैरे तुम्हाला जमणार नाही पण शोभन ने उपवास करायचे ठरविले पण चंद्रभागेला माहित होते कि त्याची शारीरिक शक्ती हि उपवास झेपवू शकत नाही आणि तसेच झाले.

जसा जसा तो एकादशी चा दिवस एक एक तासाने जात होता तशी तशी त्याची प्रकृती बिघडत होती आणि त्याची प्राणज्योत मावळली.

त्याचे क्रिया कर्मानंतर पत्नी चंद्रभागा आपल्या पित्याकडेच राहिली आणि आपले धर्माचे पालन करत राहिली. इकडे शोभनला एकादशी चे फळ मिळाले आणि त्याने दुसरा जन्म घेतला आणि तो देवपूर चा राजा बनला जी एकदम सर्व सुखसुविधांनी नटलेली नागरी होती.

एक दिवस त्या देवपूर जवळून सोमशर्मा नावाचा ब्राह्मण जात असता त्याने शोभन ला पहिले आणि त्याला ओळखले. त्याला ह्याची हकीकत विचारात शोभन ने सोमशर्मा ला आपण केलेल्या एकादशी चे फळ मिळाले आहे असे सांगितले.

पण मी खूप अस्थिर आहे असे सुद्धा तो सांगण्यास विसरला नाही. नंतर त्या ब्राह्मणाने चंद्रभागेला येऊन हकीकत सांगितली आणि त्याच्या अस्थिरतेचे सुद्धा सांगितले. मग तिने त्या ब्राम्हणाच्या साहाय्याने आपल्या पतीला जाऊन भेटली आणि सोमशर्मा ब्राह्मणने आपल्या शक्तीच्या जोरावर सर्व स्थिर केले आणि तिथून ते दोघे एकत्र आले. आणि सुखात राहू लागले.

एकादशी टिप्स

  • उपवास करत असाल तर आदल्या रात्री म्हणजे दशमी पासूनच करावा म्हणजे फक्त भाजी पोळी भात नको.
  • एकादशी च्या दिवशी उपवास करत असाल तर निराहार किंवा फळे वगैरे घेऊन उपवास करावा (प्रकृती नुसार)
  • उपवास करत नसाल तर बाहेरचे खाणे टाळा सात्त्विक राहा भात नको.
  • शारीरिक संबंध नको (पुढची पिढी दुर्बल होत जाते)
  • खूप बिझी असाल तर नक्की एकादशी ला कृष्णाला तुलसी दल चढवा आणि बाहेर जा.
  • जे घरात फ्री आहेत त्यांनी नक्की प्रत्येक एकादशीला कृष्णाला पंचामृताने स्नान घालावे आणि ते तीर्थ आपल्या मुलांना जरूर द्यावे फरक पडेल .
  • घरात एखादी व्यक्ती अजून फ्री असेल तर ह्या दिवशी गायीला चणा दाल भिजवून + गूळ घालून द्या घरातील धन धान्य ला कधीही तुटवडा येणार नाही.
  • ह्या दिवशी विष्णू सहस्त्र नाम किंवा विष्णू अष्टोत्तर नामावली जरूर वाचून घ्या.
  • ह्या दिवशी गीतेचा ११ वा अध्याय घरातील मोठ्या वक्तींनी जरूर वाचावा त्यांना जमलं नाही तर लहानांनी सुद्धा वाचण्यास हरकत नाही ४२ पिढ्या मागच्या गेलेल्याना गती मिळेल. आणि आशीर्वाद सुद्धा. हा खास पितृदोषाचा उपाय आहे प्रत्येक एकादशी ला निदान ३ वर्षे केल्याने पितृदोष पूर्णपणे निघून जातो पुढे येणाच्या पिढीत मी मागे पितृदोषाच्या पोस्ट मध्ये ज्या ११ कुंडल्या दिल्या आहेत तसे ग्रह पुढील येणाऱ्या पिढीत दिसणार नाहीत.
  • ह्या दिवशी पिंपळाला एक दिवा आणि शिव पिंडी च्या जवळ एक दिवा देऊळ बंद होत असताना लावा. (दोन्ही दिव्यात तूप घालावे). ह्याने सुद्धा धन बाधा जी पितरांकडून काही दोषांमुळे होत असते ती जाते.
  • ह्या दिवशी अन्न दान जरूर करावे. अजून खूप नियम आहेत शास्त्रात पण धकाधकीच्या जीवनात एव्हढे तरी केलेत तरी पुरे.
  • ह्या दिवशी चुगली / भांडणे अजिबात नको.
  • घरातील केरकचरा काढताना किडे मुंग्या ह्या दिवशी आपल्या हाथून मरणार नाहीत ना ह्याची काळजी घ्या. कारण हे व्रत विष्णूचे आहे जो जगाचा प्रत्येक जीवाचा पालनकर्ता आहे.
  • साफसफाई करण्यास उत्तम दिवस अमावस्या (सकाळी फक्त) आणि शनिवार पण एकादशी असेल तर नाही.

दिवाळी आहे म्हणून एकादशी च्या दिवशी साफसफाई करू नये असे माझे मत आहे. कारण हे रमा एकादशी व्रत लक्ष्मी चे आहे. ह्या एकादशी पासून दिवाळीला सुरुवात होते. दिवे लावणे रांगोळी काढणे ह्याला सुरुवात करावी.

आपणा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद…..!

Leave a Reply