You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : धनु राशी आणि धनु लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने धनु राशी आणि धनु लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या षष्ठ स्थानी (पत्रिकेचे ६ वे स्थान) आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण बाराव्या स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

धनु राशी आणि धनु लग्न
ज्यांची राशी धनु आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ९ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

राहू जिथे वृषभ राशीत २ नंबर मध्ये आला आहे तुमच्या धनु राशीच्या आणि धनु लग्नाच्या पत्रिकेत हे पत्रिकेचे षष्ठ स्थान आहे हे तुमच्या आणि तुम्ही इतरांना देणाऱ्या सर्व्हिस चे आहे त्यामुळे इथे राहू तुम्हाला चांगले फळ देऊ शकेल. तुम्ही ज्या ज्या सर्विस इतरांना द्याल पुढील १८ महिन्यात त्या जिद्दीने आणि मेहनतीने द्याल त्यात तुम्हाला समाधान वाटेल. ज्या व्यक्ती जॉब करत आहेत त्यांना हा काळ खूप काही चांगले करण्याच्या संधी देईल ह्यात शंका नाही. पण त्यात तुम्हाला इतरांशी स्पर्धा ठेवावी लागेल तरच हे शक्य आहे.

हे रोग स्थान सुद्धा आहे त्यामुळे इथे ज्यांना आधीपासून काही पोटाचे त्रास किंवा शुगर चे त्रास आहेत त्यांनी जास्त लक्ष द्यावे.

हे स्थान कर्जाचे असल्याने मागील काही विषय कर्जाबद्दल वाढू शकतील पण ते तुमच्या डेव्हलोपमेंट साठी असतील चिंता नाही.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी वृश्चिक राशीवर जिथे ८ लिहिले आहे पत्रिकेच्या १२ व्या स्थानावर येत आहे आणि तिथे केतू चे सुद्धा १८ महिने भ्रमण आहे त्यामुळे तुमच्या सेविंग्स इथे जास्त होणार नाहीत. तुमच्या नावावरील एखादे डिपॉझिट हे अचानक काढावे तोडावे लागण्याची शक्यता फार दिसते. असे झाले नाही तर आरोग्यासाठी खर्च होऊ शकतील. असे हि नाही तर मग तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये पैसे गुंतवू शकाल. पण पैसे जाईल हे नक्की. तो चांगल्या कामासाठी जावा हीच इच्छा धरा बस.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि पत्रिकेत जिथे १० लिहिले आहे मकर राशी तिथे आहे हे कुटुंब स्थान धन स्थान वाणीचे स्थान आहे. ह्या राहू च्या दृष्टीचे परिणाम वरील विषयात पुढील १८ महिने दिसतील. वाणीला धार येईल जपावे. दोष निर्माण होतील.

पैसे मिळतील त्यात अजिबात काळजी करू नये. पण कुटुंब व्यवस्थेची धावपळ दिसेल. इथेच मकर राशी आली आहे आणि नोव्हेंबर मध्ये गुरु इथे नीच राशीत येत असल्यामुळे धनु राशी आणि धनु लग्न च्या लोकांना कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यापासून दूर राहा हा सल्ला.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी जिथे ६ लिहिले आहे कन्या राशीवर कर्म स्थानावर येत आहे. आणि त्यामुळे करिअरच्या गोष्टीत हे चांगले फळ देणारे असेल. पण जे रेगुलर करिअर असेल त्यात थोडा त्रास होईल नवीन निर्णय घ्यावे लागतील आपल्याला. आणि त्याचे बळ इथे राहू देईल.

जे जॉब मध्ये आहेत त्यांना प्रमोशन होण्याची शक्यता असेल पण अशांनाच जास्त शक्यता आहे कि जे जॉब मध्ये आपल्या शिक्षणाच्या संबंधित काहीही कामे करत नाहीत. (म्हणजे कॉमर्स वाले रिसेस्पनिस्ट आहेत) असे.

आणि जर तसे नसेल तर करिअर मध्ये तुमच्या स्किल ला इथे वाव मिळणार नाही असे दिसते तुम्ही निर्णय घ्याल ह्या १८ महिन्यात कोणतेही काम सहन करणार नाहीत तुम्ही जे तुम्ही आधी मजबुरीने करत होतात.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू जिथे आहे ती वृश्चिक राशी आहे आपल्या पत्रिकेत मंगळाच्या राशीत केतू आल्यामुळे आपल्या जमा ठेवी गुंतवणुकीला इथे काही धावपळी दिसतील बाकी केतू ची ७ वी दृष्टी जिथे राहू आहे त्यावर येत आहे त्याचे फळ राहू च्या ७ व्या दृष्टीसारखेच असेल.

केतू ची ५ वी दृष्टी हि जिथे पत्रिकेत १२ नंबर ची मीन राशी आहे त्यावर येत आहे. त्यामुळे प्रॉपर्टीज संबंधातील काही विषय आपल्यासमोर ह्या १८ महिन्यात नक्की असतील. त्यावर नीट विचार करून पुढे पाऊल टाका.

घरातील आधीचे तंटे काही असतील तर इथे रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. आईचे वय आणि आईचे आजार ह्याबद्दल चिंता दिसतील. असे नसेल तर आई हा विषय काही मिसमॅच चा होऊ शकतो त्यावर शांत राहा.

धनु राशीच्या आणि धनु लग्नाचे जे १० पर्यंत चे विद्यार्थी आहेत त्यांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या केतूच्या भ्रमणाचा. जर असे काही दिसत असेल तर पुढील नोव्हेंबर पर्यंत गुरु चे उपाय करावेत.

केतू ची ९ वी दृष्टी अष्टमावर येत आहे जिथे ४ नंबर ची कर्क राशी आहे पत्रिकेत. ह्यामुळे केतू ची दृष्टी ह्या स्थानावर धनु राशीला आणि धनु लग्नाला पायांचे किंवा कमरेखालचे त्रास होऊ शकतात जर आधी असतील तर त्यात थोडी जास्त काळजी घ्यावी. एखादे ऑपरेशन सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांना हे विषय आधी पासूनचे असतील.

उपाय

राहू आणि केतू च्या ह्या गोचरी साठी काही उपाय देतो.

  • रोज केसर गंगाजल चा टिळा कपाळावर नाभीवर लावा.
  • गुरुवारी केळी किंवा चणा डाळ गुळ गायीला द्या.
  • गुरु चे कोणतेही वाचन करून गुरु स्ट्रॉंग करण्याचे उपाय पुढील 18 महिने करा.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व धनु राशीच्या आणि धनु लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply