You are currently viewing बुध शुक्र युती लक्ष्मी नारायण योग- नोकरी करून समाधान?

बुध शुक्र युती लक्ष्मी नारायण योग

वरील दिलेल्या लग्न कुंडलीत सर्व ठिकाणी बुध शुक्र एकत्र लिहून दाखविले आहे. आपल्या पत्रिकेत जर हे दोन ग्रह कोणत्याही एका स्थानात असतील तर लक्ष्मी नारायण योग होतो.

हा योग आपल्या बुद्धी कौशल्यासाठी खूप चांगला आहे. सतत कॅल्क्युलेशन साठी हा योग उत्तम असतो. पण जर आपण आयुष्यभर जॉब मध्ये असाल तर हाच योग शेवटी काहीच न देऊन जाताना पहिला गेला आहे.

म्हणून सल्ला असा देण्यात येतो ह्यांना कि आपण जरी जॉब करत असाल बरीच वर्षे आणि त्यात समाधान मिळत नसेल समाधान ह्याचा अर्थ चेक करा कि त्या जॉब मधून मिळालेल्या पैशातून आपण आपले घर नीट चालवू शकता का? आपण त्यातून मिळविलेल्या कमाईतून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे का? असे महत्वाचे प्रश्न किंवा स्वप्ने इथे नोकरीत असताना पूर्ण करताना त्रास पहिला गेला आहे. ह्यासाठी एकतर नोकरीत इन्सेन्टिव्ह ओव्हरटाईम असेल तर उत्तम नाही तर अशा सर्व व्यक्तींनी इतर काही तरी त्याबरोबर धडपड करून छोटा मोठा उद्योग करावा.

हि युती एक व्यापारी तत्वाची आहे आणि ज्यांनी ज्यांनी ह्यात व्यापार केले (कुंडलीत व्यापारी होण्याचे इतर नियम असतील) तर अशा सर्व मोठ्या व्यापाऱ्यांना हा योग उत्तम लक्ष्मी नारायण योग दिसून आलेला आहे.

मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या पत्रिकेत हा योग निश्चित असतोच. म्हणून एकदा आपली कुंडली चेक करून ह्या योगाचे फायदे होतात का ते चेक करून घ्या योग्य ज्योतिषांकडून.

आणि हे दोन ग्रह एकत्र नसतील तरी — खालील दिलेले नियम हे व्यावसायिक प्रवृत्ती नक्की देतात व्यक्तीला.

  • बुध शुक्राच्या नक्षत्री किंवा शुक्र बुधाच्या नक्षत्री
  • शुक्र बुधाच्या राशीत किंवा बुध शुक्राच्या राशीत ( शुक्र ६ मध्ये असेल तर थोडा त्रास होईल)

कृपया वरील दोन नियम ज्योतिषांकडून समजून घेणे.

धन्यवाद…..!

Leave a Reply