You are currently viewing बुधवार आणि बुद्धी

गणेशाचा वार बुधवार. गणेश हा बुद्धीचा कारक आहे. ह्या दिवशी गणेशाची कोणतीही छोटीत छोटी उपासना हि त्या व्यक्तीला बुद्धी स्थिर ठेण्यास मदत करेल.

सामान्य व्यक्तीला समजणारा एक योग — लग्न कुंडलीत कोठेही मंगळ आणि बुध एकत्र लिहिलेले असतील एकाच स्थानी तर अशा व्यक्तींच्या हातून जीवनात अशी एखादी चूक होतेच कि त्याला पुढे २०/२५ वर्षे हि त्या चुकीची आठवण राहून त्रास होत असतो. हे शिक्षणात , करिअर वेळी वैवाहिक विषयांत किंवा कोणत्याही वयात होतेच. हे पत्रिकेत समजून घ्यावे लागते.

मंगळ-बुध एकत्र असलेली अशी एकही पत्रिका नाही कि त्या व्यक्तीने एक चुकीचा निर्णय घेऊन पुढे २०/२५ वर्षापर्यंत त्रास काढला नाही. ह्या युतीचे काही चांगली फळे सुद्धा असतात पण येथे तो विषय नाही.

ज्योतिषांकडून समजून घेणारा योग:-

  • मंगळ आणि बुध हे एकमेकांच्या नक्षत्री आहेत का?
  • बुध वक्री आहे का ?
  • बुध ६/८/१२ ह्या स्थानी आहे का?
  • बुध ग्रहाच्या डिग्री ० ते ५ किंवा २७,२८,२९ आहे का?
  • बुध मंगळ समोरासमोर आहेत का ?

हे योग पत्रिकेत दिसतील तर अशा व्यक्तीच्या युक्त्या ह्या जास्त सफल होत नाहीत.

सल्ला असा देण्यात येतो कि कोणताही महत्वाचा निर्णय घेताना मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाकी छोट्या छोट्या निर्णयात हा नियम नाही.

धन्यवाद…..!

Leave a Reply