You are currently viewing १२ नंबर चा नीच बुध आणि विवाह सुख? १००% खालील विषयांत नाही

१२ नंबर चा नीच बुध आणि विवाह सुख ? १००% खालील विषयांत नाही

वरील पत्रिकेत १२ नंबर चा बुध हा सर्व स्थानात दाखविला आहे. आपल्या पत्रिकेत १२ नंबर बरोबर कोणत्याही एका स्थानात असू शकतो.जर असे असेल तर सर्व अविवाहित आणि विवाहित तरुण तरुणींना खालील लेख महत्वाचा आहे.

जेव्हा हा बुध ग्रह मीन राशितून जात होता तेव्हा आपण जन्म घेतला आहे. इथे त्याच्या सर्व चांगल्या आणि वाईट बाबी लहानपणापासून च्या न देता फक्त विवाह सुख कसे असेल ते टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

अशा व्यक्तींना बुध पत्रिकेत मीन राशीत असल्यामुळे बुध ग्रहाची ती नीच राशी असल्यामुळे विवाहानंतर बरेच त्रास झाल्याचे दिसून आले आहे.

पुरुषांना

साधारण ह्या त्रासात पैशा संबंधित एखादे व्यवहार हा विषय वैवाहिक जीवनातला रस काढून घेतो किंवा आपण एक व्यापारी असाल तर एखादे पैशासंबधित व्यवहार हे खूप त्रासदायक होऊन बसतात ज्याने विवाहाचे सुख घेताना त्रास होताना दिसेल. जर साधे जॉब करणारे असाल तर कोणतीतरी शक्कल लावून पैशाचे व्यवहार करून संकटे ओढवून घेताना दिसतात.

महिलांना

आपण विवाहानंतर जर जॉब करत असाल तर त्यात बऱ्याच युक्त्या करून नुकसान करून घेताना महिलांना इथे पहिले आहे. आणि जर फक्त घरातील गृहिणी असाल तर पैशाच्या व्यवहारावरून घरातील काही वाद दिसतील. असे काहीही होत नसेल तर अशा महिलांना आपल्या वाणीने घरातील रिलेशन संभाळता येत नाही. किंवा त्यांच्या वाणीचा कोणताही प्रभाव दिसत नाही.

वैवाहिक सुखात दोघांना जर आजारपण हा विषय मधे येत असेल तर अशा व्यक्तींना त्वचा रोग, मेंदूचे आजार, लक्षात न राहणे, भ्रमनिरास अशा त्रासांना सामोरे जावे लागते.

विवाह झाल्यावर १२ नंबर चा बुध हा साधारण पहिली १७ वर्षे जास्त त्रास देतो व्यक्ती त्या संकटातून बाहेर येण्यास एव्हढा मोठा कालावधी लागतो कि व्यक्ती वैवाहिक पार्टनर ला विवाह सुख देताना हैराण होत असतो.

आपल्या पत्रिकेतील इतर स्थिती आणि बुधा च्या डिग्री वर थोडे कमी जास्त परिणाम होऊ शकतील.

सल्ला

जर आपल्या पत्रिकेत १२ नंबर बरोबर बुध असेल तर विवाह च्या आधी जेव्हढे पैशाचे व्यवहार श्रीमंत बनण्यासाठी करायचे असतील ते करून घ्यावेत. विवाह नंतर आपल्याला ह्यात यश नाही. जेव्हढ्या युक्त्या आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या डेव्हलोपमेंट साठी लावाल त्याचे चांगले परिणाम हे विवाह होण्याआधी मिळतील विवाहानंतर लावलेल्या युक्त्या आपल्यासाठी खड्डा असेल ज्यातून निदान १७ वर्षे त्रास होईल. म्हणून करिअर पैसा मिळविण्यासाठी आपली हुशारी हि विवाह च्या आधी नंतर नाही.

उपाय

ज्यांना सध्या हा भोग आहे त्यांनी प्रत्येक बुधवारी मूग आणि गूळ गायीला द्यावेत. किंवा सातत्याने ४३ दिवस मुगाचे दान करावे.
किंवा प्रत्येक बुधवारी मुगाचे लाडू गणेशासमोर ठेऊन आपल्या समस्येविषयी प्रार्थना करावी.
आणि किन्नर ला बुधवारी जी जी मदत करता येत असेल त्याचा मान ठेऊन मदत करत जावी.
प्रत्येक बुधवारी तुरटीने दात घासून स्वच्छ करावेत. हा एक उत्तम उपाय आहे.

आपल्याला न पटणारे ह्या बुधा विषयी विश्लेषण

विश्वास असेल तर समजून घ्या नाहीतर सोडून द्या

  • १२ नंबर चा बुध मीन राशीत असताना एखाद्याचा जन्म म्हणजे मागील जन्मात किन्नर ला त्रास दिलेला असू शकतो किंवा त्याच्याबरोबर तुच्छ व्यवहार केलेले असतील तर हा बुध नीच राशीचा असताना त्याचा जन्म होण्याचे प्रकार होत असतील असे माझे स्वतःचे मत आहे.
  • दुसरे असे कि आपल्या घराण्यात जास्तीत जास्त मिसकॅरेज करवून घेताना सुद्धा अशा पापांचे ओझे वाहण्यासाठी बुध नीच राशीत जन्म देऊन त्रास देत असतो. म्हणून अशा प्रकारात जोडप्याना संतती झाल्यावर वरील बुध संबंधित त्रास जास्त जाणविले आहेत.
  • तिसरे असे कि मागील जन्मी कुणाबरोबर पैशाचे नीच व्यवहार आपल्या हातून झाले असतील असाही विचार करण्यास हा बुध ह्या जन्मी वाव देतो.

वरील तिन्ही विधाने हि कोणताही पुरावा नसताना दिली असली तरी ह्या जन्मी होणारे त्रास पाहून अंदाज बांधून भीती न बाळगता ह्या जन्मी आपण जास्तीत जास्त चांगली कर्मे करावीत असे माझे मत आहे.

अशा पत्रिकेत आपल्या मावशीला जास्त तिच्या वैवाहिक सुखात त्रास झालेला दिसेल. (असेल तर) किंवा तिच्या आरोग्याच्या तक्रारी फार असतील. एखादे मोठे ऑपरेशन सुद्धा दिसते.

अशा पत्रिकेत आपल्या घराण्यात एखादे लहान बाळ (१२ वर्षाखालील) हे अपघाताने गेलेले दिसेल.
अशा पत्रिकेत कोणीतरी मंद बुद्धी चा जन्माला आलेला असेल तर त्याचा विवाह संस्कार हा पूर्ण न झाल्याचे सुद्धा हा बुध इंडिकेट करतो.

विवाह करतांना १२ नंबर चा बुध आपल्या कुणाच्या पत्रिकेत असेल तर नक्की ज्योतिषीय सल्ला घ्यावा हि विनंती. कारण समोरच्या पत्रिकेत त्याचा बुध (म्हणजे त्याची बुद्धी) किती आपल्याला साथ देईल ह्यावर अवलंबून आहे.

हे विषय कोणत्याही ज्योतिष पुस्तकातील नाहीत अनुभवाने लेख लिहीत आहे पटले तर पुढे जा नाहीतर विषय सोडून द्या क्षमा असावी. बऱ्याच पत्रिकेत मला जे मिळाले ते मी मांडले आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply