You are currently viewing चंद्रा पासून शुक्र १० व्या स्थानी? १००% चारित्र?

चंद्रा पासून शुक्र १० व्या स्थानी? १००% चारित्र?

पहिला चारित्र हा योग पाहण्यासाठी आपल्या लग्न कुंडलीत कुठेही चंद्र एका ठिकाणी लिहिला असेल त्यावर बोट ठेवा आणि घडाळ्याच्या उलट्या दिशेने १० व्या स्थानी या तेथे जर शुक्र लिहिला असेल तर अशा व्यक्तींना आपले चरित्र सांभाळण्याचा सल्ला देण्यात येतो. मग स्त्री पुरुष इथे भेद नाही.
अशा व्यक्तींच्या नजरेत आणि मनात फाजील भाव असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

अशा व्यक्तींना एक सल्ला देण्यात येतो कि शक्यतो बाहेरील परलिंगी व्यक्तींमध्ये जास्त मिसळू नये थोडे लांबच असावे. एखाद्या गुरुची साधना आपल्याला ह्यातून चांगले परिणाम देतील.

पुरुषांचा चंद्र शुक्र आणि घरजावई?

चंद्र शुक्र कोणत्याही स्थानी एकत्र किंवा चंद्र पासून ७ व्या स्थानी शुक्र

सासुरवाडीची जबाबदारी घेणे, तेथेच राहणे, जिथे सासुरवाडी असेल त्याच विभागात आपली डेव्हलोपमेंट करणे हे ह्या योगात हिताचे ठरते.

असा योग असताना जर एखाद्या व्यक्तीला आपल्या डेव्हलोपमेंट साठी काहीच करता येत नसेल करिअर मध्ये शून्य असेल तर आपण आपल्या बायकोच्या माहेरील शहरात किंवा तिच्या विभागात किंवा तिच्या घरात जाऊन राहण्याचा सल्ला दिला जातो. आणि मग तिथून भाग्योदयाला सुरुवात सुद्धा होते असे दिसते.

चंद्र शुक्र एकत्र कोठेही बसले असतील तरी हे पाहण्यात आले आहे आणि असे नसेल तर मुद्दामून तिच्या विभागात जाऊन काही डेव्हलोपमेंट होते का हा प्रयत्न करण्यास हरकत नाही. मात्र तेथे जाऊन उपयोग नाही सासूरवाडीत लक्ष असायलाच पाहिजे तेथील एक तरी जबादारी घेणे हा सल्ला दिला जातो अगदीच जमले नाही तर तेथील जे जे ड्यूज आहेत (लाईट, पाणी, बिल वगैरे) ते तरी भरावे.किंवा औषधांचा खर्च करावा.

स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र शुक्र एकत्र असतील किंवा चंद्रापासून शुक्र ७ व्या स्थानी असेल तर अशा सर्व स्त्रियांनी सुद्धा आपल्या पतीच्या घरातील व्यक्तींना मानसन्मान द्यावा नाहीतर फार वाईट परिणाम पाहण्यात आले आहेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply