You are currently viewing जाणून घ्या जीवनात पैसा केव्हा केव्हा मिळेल


स्टेप क्रमांक १/२/३ खालील प्रमाणे चेक केल्यास आपल्याला सहज कळेल कि सर्वात पैसा जीवनात जास्त कोणत्या कालखंडात मिळेल. (KNOW WHEN TO GET MONEY IN LIFE)

  • पत्रिकेचे दुसरे स्थान हे धन भाव असते (पैशाचे स्थान)
  • पत्रिकेचे चौथे स्थान हे सुख भाव असते.
  • पत्रिकेचे नवम स्थान हे भाग्याचे असते.
  • पत्रिकेत एकादश भाव हे लाभ स्थान असते.
  • आणि व्यक्तीचे स्वतःचे व्यक्तिमत्व, ऍक्टिव्हिटी, ऍक्शन जिथून पाहतात ते स्थान म्हणजेपहिले स्थान

वरील सर्व स्थाने उदाहरण कुंडली क्रमांक १ मध्ये दिली आहेत.

स्टेप क्रमांक –१

वरील ४ स्थानात आपल्या पत्रिकेत १ ते १२ नंबर मधील कोणतातरी एक क्रमांक लिहिला असेल. एका पेपर वर हे सर्व नंबर्स लिहून घ्या .

ह्या सर्वांची बेरीज करा. समजा प्रथम स्थानी आपल्या पत्रिकेत ४ लिहिला आहे. धन स्थानी 5 असेल, आणि सुख भावात चतुर्थ भावात 7 असेल, तर भाग्य भावात १२ असेल आणि लाभ स्थानी २ असेल
तर ह्या नंबर्स ची बेरीज करून घ्या. ४+५+७+१२+२= ३०.

स्टेप क्रमांक – २

जर आपल्या पत्रिकेत १/२/४/९/११ ह्या ५ स्थानात खालील कोणताही ग्रह लिहिला असेल तर त्या समोर दिलेले नंबर्स एका ठिकाणी लिहून घ्यावे. उदाहरण जर प्रथम स्थानी गुरु लिहिला असेल तर ९ लिहावे आणि चतुर्थ स्थानी सूर्य (रवी) लिहिला असेल तर ७ लिहावे.
जेव्हडे ग्रह पत्रिकेत वरील ५ स्थानी लिहिले असतील त्या ग्रहांची सर्वांची बेरीज करावी.

उदाहरण कुंडली क्रमांक २ प्रमाणे पहा.

ह्या पत्रिकेत पहिल्या स्थानी केतू, दुसरे आणि चौथे स्थान रिकामी आहे, नवम स्थानी चंद्र आहे, लाभ स्थानी शनी आहे म्हणून ह्या सर्वांची बेरीज केतू ० + चंद्र ३ आणि शनी १ म्हणून ०+३+१=४

  • सूर्य ७
  • चंद्र ३
  • मंगल १०
  • बुध ६
  • गुरु ९
  • शुक्र ५
  • शनि १
  • राहु ०
  • केतु ०

आता आपण आपल्या भावांची बेरीज जी आधी ३० आलेली आणि ग्रहांची बेरीज जी ४ आलेली त्याची बेरीज करावी –३०+४=७.

स्टेप क्रमांक ३ पाहू

पत्रिकेत दुसरे स्थान हे धन स्थान आहे तिथे आपल्या पत्रिकेत कोणताही एक क्रमांक असू शकेल तो त्या राशीचा आकडा असतो.
जर १ किंवा ८ असेल तर त्याचा स्वामी मंगळ
२ किंवा ७ असेल तर शुक्र
३ किंवा ६ असेल तर बुध
४ असेल तर चंद्र ५ असेल तर रवी
९ किंवा १२ असेल तर गुरु आणि १० किंवा ११ असेल तर शनी त्या स्थानाचा मालक असेल.

त्याचा स्वामी जिथे पत्रिकेत असेल त्या स्थानापासून सर्वात शेवटी आलेली संख्या मोजावी आणि कोणते स्थान येते ते पाहावे.

उदाहरण कुंडली २ मध्ये धन स्थानी ५ लिहिले आहे आणि त्यामुळे धन स्थानाचा मालक हा रवी आहे. आता रवी कुठे लिहिला आहे तेथून जर ७ पुढे मोजले तर लाभ स्थानात २ लिहिले आहे म्हणून २ चा मालक शुक्र आहे. म्हणून ह्या व्यक्तीला शुक्राच्या महादशेत उत्तम धनलाभ मिळेल. शुक्राची महादशा २० वर्षाची असते आणि पूर्ण जीवनात हा व्यक्ती २० वर्षात एव्हढा पैसा कमावेल जो इतर महादशेत मिळणाऱ्या धन लाभापेक्षा जास्त असेल.

हेही वाचा :- आपण धनवान दानी आहात का

आपल्या पत्रिकेत महादशा पानावर प्रत्येक महादशा ह्या खालील प्रमाणे असतील
केतू ७ वर्षे , शुक्र २० वर्षे , रवी ६ वर्षे , चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे , राहू १८ वर्षे, गुरु १६ वर्षे, शनी १९ वर्षे , बुधे १७ वर्ष।

जेव्हा आपल्याला हि माहिती मिळेल कि सर्वात जास्त पैसा देणारी महादशा कोणती आहे तेव्हा आपण त्या महादशेत खूप काही चांगली प्रगती करून धनवान बनू शकता.

नोट — जर स्टेप क्रमांक २ मध्ये आलेली संख्या ० असेल तर जिथे धन स्थानाचा मालक लिहिला असेल तीच महादशा पैसा देणारी असेल.

वरील महादशा जर आपल्या वयाच्या २० च्या आधी किंवा ६० नंतर येत असतील तर काळजी करू नये. प्रत्येक महादशेत एक त्याच ग्रहाची अंतर्दशा असते त्या दशेत सुद्धा हा लाभ प्राप्त झालेला दिसेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply