You are currently viewing ० ते ५ डिग्री किंवा २६ ते २९:५९ डिग्रीत पहिले स्थान ?

तुम्ही किती मजबूत आहात हे आजच जाणून घ्या

Degree

वरील इमेज मध्ये जे सर्कल करून दाखविले आहे ते आपल्या पत्रिकेत लग्न कुंडली जिथे दिली आहे त्याच पानावर निरयन स्पष्ट ग्रहाची पहिली लाईन हि लग्न स्थानच्या डिग्रीज दाखविते ते तसेच आहे का पहा. इथे मी ०:२८ डिग्री ची लग्न स्थानाची पत्रिका दिली आहे. इथे जर आपल्या पत्रिकेत ० ते ५ डिग्री किंवा २६ ते २९:५९ डिग्री पर्यंत असेल तर खालील लेख आपल्या साठी आहे. लक्ष द्या.

कोणतेही स्थान हे ३० डिग्री चे असते. मी इथे सर्कल करून दाखविलेले स्थान हे लग्न स्थान आहे पत्रिकेचे प्रथम स्थान म्हणतात त्याला.

पत्रिकेचे पहिले स्थान हे आपले स्वतःचे असते. आपल्या जीवनातल्या सर्व ऍक्टिव्हिटीज कश्या पद्धतीने आपण मांडणार आहोत त्याचे हे स्थान. आपण कसे बोलतो कसे चालतो समाजासमोर आपले प्रेसेंटेशन कसे असेल ते करताना आपण किती स्ट्रॉंग असू. आपला देह कसा आहे. बॉडी लँग्वेज कशी असेल. जीवनातल्या सर्व संघर्षाशी सामना करताना मी किती स्ट्रॉंग असेन ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे हि प्रथम स्थानावरून पाहिल्या जातात.

० ते ५ डिग्री चे लग्न स्थान

० ते ५ डिग्री पर्यंत जर लग्न स्थान असेल आणि जन्म झाला असेल तर आपण ज्या घराण्यात जन्म घेतला असेल तेथील परिस्थिती हि बेताचीच असेल. आपण ती परिस्थिती बदलू शकता पण त्यात आपल्याला बरेच काही त्रास जाणवतील.

पहिला त्रास हा आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर असे नसेल तर आपल्या शिक्षणात ज्या ज्या परिस्थिती असतील त्यात संघर्ष करावे लागतील. जर आपण करिअर ला सुरुवात करत असाल तर त्यात उशीर होऊ शकतो. जर विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर आपल्याला हा प्रकार एकतर तिथे उशिरा होण्याचा किंवा विवाह करण्यासाठी जे जे प्रेसेंट करायचे असते ते आपल्याकडे खूप कमी प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (उदा आरोग्य शिक्षण पैसा करिअर प्रॉपर्टीज किंवा कुटुंब)

वरील सर्व विषयात आपल्याला स्वतःसाठी धावपळ करावी लागेल आणि त्या गोष्टी मिळविण्यासाठी सतत आपल्या सामोरे निगेटिव्हिटी येत जाईल.

२६ ते २९:५९ डिग्री चे लग्न स्थान

२६ ते २९.५९ डिग्री पर्यंत ज्यांचे लग्न असेल त्यांना जन्म घेतल्याबरोबर आधीपासूनच तेथे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी असू शकतात. इथे सर्व काही रेडी असते मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करता जसे करिअर करण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी किंवा प्रॉपर्टी बँक बॅलन्स उभे करण्यासाठी तेव्हा तुम्हाला जास्त आधी निगेटिव्हिटी चा सामना करावा लागतो.

उपाय

वरील दोन्ही विषय जर आपल्याला तशाच जाणवत असतील आणि तुम्ही २०/२२ वर्षानंतर चे तरुण असाल तर खालील उपाय करण्यास सुरुवात करा.

  • पहिला उपाय: प्रथम कोणत्याही निगेटिव्हिटी पासून दूर राहण्यासाठी बाहेरील खूप कमी खात जा.इथे मी एक उदाहरण देतो कि जर अशा पत्रिकावाले हॉटेल मध्ये जाऊन सतत खात असतील आणि तो तिथे तुमच्या साठी बनवणारा आचारी वैतागून काही बनवत असेल तर त्याच्या मनातील विचार आचार हे तुम्हाला बनविलेल्या जेवणात येऊन त्याच धावपळीत तुम्ही लगेच येऊ शकता किंवा ते त्रास तुम्हाला जाणवू शकतील ज्या त्रासाचा तो विचार करत असेल पदार्थ बनविताना.

अशा पत्रिका जर श्रीमंत घराण्यात दिसल्या तरी मी जेवण बनवणारी बाई घरात ठेऊ नका म्हणून सांगतो कारण ती जो जो विचार करेल बनविताना ते ते विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यात कॉपी होताना दिसतील.

म्हणून कुणाच्या हातचे खाताना १० वेळा विचार करा. आपली आई बहीण बायको अशा व्यक्तींचेच हातचे खा जे तुमचे शुभ चिंतीत असतील.

  • दुसरा उपाय: नेहमी सात्विक भोजन करा. जर आपण नॉन व्हेजिटेरियन असाल तर लवकरात लवकर व्हेजिटेरियन होण्याचा प्रयत्न करा. कारण इथे जर तुमच्या प्रथम स्थानात शनी राहू केतू मंगळ रवी असेल उग्र ग्रह लिहिले असतील तर स्थिती भयंकर असू शकते कुणाला ऐकण्याच्या स्थितीत नसाल तुम्ही.
  • तिसरा उपाय: अशा सर्व पत्रिका वाल्याना सल्ला दिला जातो कि डोंगर, भुयारी मार्ग, स्मशान, जंगल, नदी किंवा समुद्रकिनारे जिथे जिथे एकांत असेल तिथे तिथे एकटे जाऊ नये. तिथून आपल्याला काही निगेटिव्हिटी मिळण्याची शक्यता फार असते.
  • चौथा उपाय: अशा सर्वानी कोणत्याही गुरु मार्गदर्शनात राहावे गुरु ची सेवा नेहमी करत राहावी. एखादी पोथी वाचन, स्तोत्र, गीता पाठ वाचत राहावे ज्याने जास्त त्रास होताना दिसणार नाही. आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी ला बळ मिळेल.
  • पाचवा उपाय: कोणतेही मोठे निर्णय घेताना योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा हे अति महत्वाचे असेल.

नोट — वरील डिग्रीवरील सर्व पत्रिकांमध्ये कितीही मोठे मोठे राजयोग जरी असले तरी ते किती प्रमाणात आपल्याला चांगले परिणाम देतील ह्यावर सुद्धा शंका येते. एकतर ते असलेले राजयोग आपल्याला आपल्या योग्य वयात परिणाम देत नाहीत जेव्हा त्याची गरज असते किंवा त्या राजयोगात चांगल्या घटना होताना दिसतच नाहीत. म्हणून योग्य ज्योतिषांकडून मार्गदर्शन करून घेणे हितावह ठरेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply