आपण धनवान दानी आहात का– आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानाचा मालक जर त्याच्या उच्च राशीत असेल तर असा व्यक्ती धनवान, दानी, विख्यात होतो.
उदाहरण कुंडली १ पहा–

आपल्या पत्रिकेत जर प्रथम स्थानी १ किंवा ८ लिहिले असेल तर त्याचा स्वामी मंगळ हा १० नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो. १ असेल तर पत्रिकेच्या तिसऱ्या स्थानी १० असेल आणि ८ असेल तर मंगळ दशम स्थानी असेल.
उदाहरण कुंडली २ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी २ किंवा ७ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा शुक्र असतो आणि शुक्र १२ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो. २ असेल तर शुक्र लाभ स्थानात असेल किंवा ७ असेल तर शुक्र ६ व्या स्थानी असेल.
उदाहरण कुंडली ३ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी ३ किंवा ६ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा बुध असतो आणि बुध जर ६ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो. ३ किंवा ६ असेल तर बुध पहिल्याच स्थानी असेल.
उदाहरण कुंडली ४ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी ४ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा चंद्र असतो आणि चंद्र जर २ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो.
उदाहरण कुंडली ५ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी ५ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा रवी असतो आणि रवी जर १ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो.
उदाहरण कुंडली ६ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी ९ किंवा १२ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा गुरु असतो आणि गुरु ४ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो. ९ असेल तर गुरु अष्टमात असेल आणि १२ असेल तर गुरु पंचम स्थानी असेल.
उदाहरण कुंडली ७ पहा–

आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानी १० किंवा ११ लिहिले असेल तर त्या राशीचा त्या स्थानाचा मालक हा शनी असतो आणि शनी जर ७ नंबर बरोबर लिहिला असेल तर वरील योग होतो. १० असेल तर शनी दशमात असेल ११ असेल तर शनी नवमात असेल.
वरील योग हा १००% आपल्याला धनवान, दानी, आणि विख्यात पुरुष स्त्री बनवेल पण असे होत नसेल तर आपली राशी हि आपल्या लग्नाच्या राशीशी मिळतीजुळती नसते किंवा त्याच्या विरुद्ध असू शकते. असे माझे स्वतःचे मत आहे.
जसे मेष राशी आहे आणि आपले लग्न हे १०/११ चे असेल तर असे होऊ शकते.
आपली राशी आणि लग्न ह्याचा तालमेळ सुद्धा ह्यावर काही प्रमाणात टक्केवारी कमी जास्त करू शकतो तरी सुद्धा विरुद्ध असले तर आपला लग्न स्थानाचा मालक हा उच्च असेल तर ८०% तरी रिझल्ट मिळताना दिसतो.
धन्यवाद…..!