You are currently viewing श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२०- (गोकुळाष्टमी)

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२०- श्रावण महिन्यात, ऋषभ राशीत  (कृष्णाची राशी ऋषभ) कृष्ण पक्षातील अष्टमी, रोहिणी नक्षत्री श्री कृष्णाचा जन्म झाला.

प्रत्यके वर्षी ह्यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी चा सूर्योदयापासून उपवास करावा रात्री १२ नंतर श्रीकृष्णाच्या बाल मूर्तीचे स्नान धूप दीप करून पाळण्यात सजवून घालावे आणि नैवैद्य दाखवून पूजन करावे.

नैवेद्यात लोणी + साखर जरूर दाखवावी

श्रीकृष्णाच्या सजावटी मध्ये मोरपंख जरूर लावावे माथ्यावर.

नंतर श्री कृष्णाची आरती करावी आणि रात्रभर कृष्ण भजन , कृष्ण लीला श्रवण , नाच गाणे वगैरे करून रात्रभर जन्मोत्सवाच्या आनंद साजरा करावा अशी रीती आहे.   

रात्री फराळात काही ठिकाणी शेगल्याची (बारीक पानांची) भाजी आणि राजगिरा पुरी + दही खाण्याची प्रथा आहे. प्रांत प्रदेश प्रमाणे ह्यात कुठे कुठे फराळात फरक दिसेल. (आपल्या पद्धतीने फराळ करावा) 

ह्या दिवशी दुधाचे पदार्थ चहातील दूध सुद्धा वर्ज करण्याची रीती आहे कारण कृष्ण जन्म झाल्याशिवाय हे पदार्थ खाऊ नयेत अशी मान्यता असावी.

दुसऱ्या दिवसाची उत्तरपूजा

दुसऱ्या दिवशी काला करण्याची पद्धती आहे. ह्यात पोहे, ज्वारीच्या लाह्या, धण्याच्या  लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय आहे अशी मान्यता आहे (जे जे त्या त्या ठिकाणी मिळेल ते ते घ्यावे काला करण्यासाठी)

श्री कृष्ण जन्माष्टमी २०२०- मुहूर्त

  • श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ:- ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजून ०७ मिनिटे.
  • श्रावण वद्य अष्टमी समाप्ती:- १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटे.
  • श्रीकृष्ण जन्मोत्सव:- ११ ऑगस्ट २०२० रोजी रात्रौ १२:०५ ते १२:४७ पर्यंत. 

ह्या वर्षी मुहूर्त गोंधळ

प्रत्येक वर्षी चंद्र ऋषभ राशीत असताना अष्टमी तिथी  आणि रोहिणी नक्षत्र असताना कृष्ण जन्मोत्सव येतो. पण ह्या वर्षी 

११ ऑगस्ट ला ९:०७ ते १२ ऑगस्ट ११:१५ सकाळी पर्यंत अष्टमी आहे. 

पण तेव्हा रोहिणी नक्षत्र नसून हे नक्षत्र १२ ऑगस्ट च्या रात्री १२ नंतर १३ ऑगस्ट उजाडता पहाटे ३:२७ पासून सुरु होत आहे.

कृष्ण जन्मोत्सव हा अष्टमीचा असल्याने जरी रोहिणी नक्षत्र मिळत नसले तरी शास्त्राप्रमाणे ११ ऑगस्ट ला रात्री १२ नंतर हा जन्मोत्सव साजरा करावा कारण १२ तारखेच्या सकाळी ११:१५ पर्यंत अष्टमी आहे नंतर नवमी सुरु होते.

पण भारतात काही ठिकाणी हा जन्मोत्सव १२ ला रात्री साजरा होईल.

श्री कृष्ण जन्माष्टमी चे काही प्रयोग (विश्वास ठेऊनच करावे)

धन संबधी

जेव्हा आपण रात्री बाळकृष्णाला मोरपंख अर्पण कराल तेव्हा दुसऱ्या दिवशी हे मोरपंख तिजोरीत ठेवावे ह्याने धन संबधी शुभता मिळेल.

संतान प्रश्न

ज्या जोडप्याना बरीच वर्षे लग्न होऊन संतान चे सुख मिळत नाही अशा पती पत्नींनी दोघांनी दिवसभर उपवास करावा 

मोनोमन ॐ क्लीं कृष्णाय नमः चा जाप करावा (मानसिक)

बाळ कृष्णच्या पूजेत कृष्णाला पंचामृताने स्नान घालावे. कृष्णाला पिवळे वस्त्र घालावे आणि सजवावे. कृष्णाला आसन हे पिवळेच घालावे.

पिवळी फुले अर्पण करावीत आणि पिवळ्या फळांचा नेवैद्य + लोणी + साखर सुद्धा दाखवावी. 

आणि दोघांनी कृष्णाचा पाळणा हलविताना मनोमन कृष्णाकडे पुढील वर्षापर्यंत आमच्या घरात पाळणा हलू देत अशी प्रार्थना करावी.

याचक बनून केलेली हि प्रार्थना नक्की त्याच्या पर्यंत पोहचून हा प्रयोग सफल झालेला दिसेल. कुणाला एका वर्षात तर कुणाला ३ वर्षात.

तेथे संतान गोपाळ मंत्र जरूर दोघांनी १/१ माळ केल्याने उत्तम फळ मिळेल ह्यात शंका नाही.

पण काही शारीरिक दोष असतील तर डॉक्टर महत्वाचा असेल. ट्रीटमेंट ला हा प्रयोग नक्की सफलता देईल असे समजून करावा.

संतान कष्ट

ह्यात आपण एक प्रयोग जरूर करा जे आपण कृष्णाला पती पत्नी मिळून स्नान घालाल ते आपल्या मुलांना जरूर पाजा. आणि गोपाळ कृष्णाकडे जरूर प्रार्थना करा. ह्याने खूप फरक पडेल ज्यांची मुले ऐकत नाहीत. (कोणत्याही वयातील)

दहीहंडी च्या दिवशी मिळालेला एक हंडी चा तुकडा तुमचे नशीब बदलवू शकेल

ह्यावर्षी जर पॉसीबल असेल तर आपण जेव्हा दहीहंडी फुटेल तेव्हा काही तुकडे हंडीचे आपणाला मिळतील त्याला दही हळद कुंकू लागलेले असेल. तसे च्या तसे ते घरात आणावे. धन स्थानी ठेवल्याने धनासंबंधीच्या समस्या असतील तर दूर होतील. 

मुलांच्या शाळेच्या ब्यागेत ठेवल्याने त्यांच्या अभ्यासात स्मरणशक्तीत प्रगती जाणवेल. 

जर ऑफिस च्या ड्रॉवर मध्ये ठेवले तर तेथील वातावरणात होणारे त्रास जाणविणार नाहीत. 

जर स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेट वर लाल कपड्यात बांधल्याने किंवा गल्ल्यात लाल कपड्यात बांधून ठेवल्याने व्यवसायात प्रगती जाणवेल. 

स्वतःच्या वाहनात सुद्धा असेच ठेवल्याने सुरक्षितेची जाणीव सदा राहील. वरील प्रयोग लाल कपड्यात लाल धाग्याने बांधून करावा आणि एक वर्षभर तसेच ठेवावे नंतर ह्याच दिवशी बदलावे.

वरील प्रयोगाचे ज्योतिषीय महत्व 

  • वरील प्रयोगातील दही हे शुक्राचे प्रतीक आहे.
  • मातीचा तुकडा हे शनी चे प्रतीक आहे. 
  • त्याचा रंग हे मंगळाचे प्रतीक आहे. 
  • त्याला लागलेली हळद हे गुरु चे प्रतीक आहे.

वरील प्रयोगात हे कान्हा ह्या लाल मातीच्या भांड्याला फोडतो तेव्हा शनी मंगळ शांत होतात. 

त्यातील लागलेली हळद आणि दही आपण घरी घेऊन जातो म्हणून शुक्र आणि गुरु स्ट्रॉंग होतात.

ह्याने सुखसमृद्धी लागते असा ज्योतिषीय समज आहे.  करून पाहण्यास हरकत नाही.

पण हा प्रयोग कोणत्याही अडचणींचा सामना करून उगाच करू नये स्वतःला सांभाळून करावा तुकडा उचलताना.  

धन्यवाद……!

This Post Has 3 Comments

  1. पांडुरंग विठ्ठल लाड

    धन्यवाद, छान माहिती दिल्याबद्दल

  2. Jayashri Nalawade

    This information is very best 👌👌

  3. Shilpa

    खुप छान विशेषण केले आहे…

Leave a Reply