You are currently viewing संकष्टी चतुर्थी- ७ ऑगस्ट 2020- चंद्रोदय रात्री ९:५०

प्रत्येक पूर्णिमेच्या नंतर साधारण ४ थ्या दिवशी चतुर्थी तिथी येते. ह्या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे खास गणेशाची उपासना ह्या व्रतात करतात. श्रावणातल्या संकष्टीला व्रताची सुरुवात करून २१ संकष्टी केल्याने चांगले फळ मिळते.

का करावी संकष्टी चतुर्थी

जीवन जगताना अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते त्यात येणारी सर्व संकटे आपल्याला पेलविणारी नसतात. अशा सर्व संकटाना श्री गणेश संकटनाशक (“श्रीसंकष्टहरगणपती”) आहे म्हणून हे व्रत प्रत्येकाने करावे. जे महिन्यातून एकदाच येते.

कसे करावे संकष्टी चतुर्थी चे व्रत

सकाळी स्नानानंतर व्रताला सुरुवात करावी.

सकाळी गणेशासमोर उभे राहून गणेशाला दुर्वा आणि एक लाल फुल वाहून संकल्प करावा कि आजपासून किंवा आज मी हे व्रत ह्या ह्या कार्यसिद्धी साठी करत आहे त्यात येणाऱ्या सर्व संकटांचे तू हरण आणि मला आशीर्वाद दे. पूर्ण दिवस उपवास करावा. (झेपेल त्यांनीच)

दिवसभर गणेशाचे नामस्मरणात मनात असावे. चंद्रोदय आपल्या कॅलेंडर मध्ये लिहिला असतो तो पाहून एक तास अगोदर जर जमले तर अंघोळ करावी. 

घरातील देवघरात खास गणेशाची पूजा तुम्हाला येत असेल तशी करावी. गणेशाला दुर्वा आणि एक लाल फूल वाहावे. (येथे शास्त्रोक्त पद्धती दिली तरी ती किती जण करतात ह्यावर शंका आहे म्हणून देत नाही). पूजेत धूप दीप नैवेद्य दाखवावा ( मोदक २१ किंवा निदान ५ ) जमले नाही तर लाडू ५/२१ चालतात. (ताटाभोवती पाणी सोडावे)

पूजा झाल्यावर एका लाल आसन वर बसून श्री गणेश मंत्र म्हणावा.  ॐ गं गणपतये नमः

नंतर जरूर चंद्र दर्शन (दिसत असेल तर) करून उपवास सोडावा. काही जण तांदळाची चंद्र कोर हि देवाजवळच काढून त्याची पूजा करतात.

मंत्र १०८ वेळा बोलू शकता (एक माळा) किंवा ५/१० मिनिटे मन लावून म्हणा संख्येचे बंधन नको.

कोणी हे व्रत करावेच

 तसे सर्व लहान थोरांनी हे व्रत करण्यास हरकत नाही.

  • ज्यांचा जन्म चतुर्थीच्या दिवशी झाला आहे.
  • जे पत्रिकेत मांगलिक आहे. 
  • ज्यांना जास्त संकटाना आयुष्यात सामोरे जावे लागत आहे.
  • जे जे मंगळाच्या राशींचे आणि लग्नाचे आहेत (वृश्चिक,मेष) (लग्न स्थानात ८ किंवा १ असेल).
  • ज्यांच्यावर एखादे असे आरोप आहेत जे त्यांनी काही चुका न करता त्यांना सामोरे जावे लागत आहे.
  • ज्यांना हेल्थ मध्ये ब्लड प्रेशर किंवा रक्ताचा कोणताही आजार आहे.
  • ज्यांना आयुष्यात २/३ ऑपरेशन झाली आहेत किंवा होण्याचे चान्सेस आहेत.
  • ज्यांना अपघाताची भीती आहे. किंवा होत आहेत.
  • ज्यांना कोणतीही समस्या हि अचानक आलेली आहे. किंवा असे भास होत आहेत.

ह्या सर्व वरील कारणांसाठी पत्रिकेतील मंगळ जबाबदार असतो म्ह्णून आपण सिद्धिविनायनकाला रांगा लावतो खास मंगळवारी. आणि सिद्धिविनायक पावला तर पत्रिकेतील मंगळ चांगले फळ देतो आणि वरील समस्या सोडवितो.

पण देवळातच रांगा लावणे हे सुद्धा योग्य नाही घरी बसून सुद्धा तुम्ही गणेशाची उत्तम पूजा अर्चा करू शकता.

वेळ असेल तर देवळात जा. महत्वाचे काम सोडून नको.

पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि गणेशाचा खरा वार बुधवार आहे मंगळवार नव्हे.

वरील सर्व नोट हि ज्यांनी अजून पर्यंत संकष्टी व्रत केलेलंच नाही किंवा अति आपल्या कर्माच्या व्यापात आहेत किंवा वेळ काढू शकत नाहीत  जास्त त्यांच्यासाठी बेसिक माहितीची आहे. 

जे जे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने करतात त्यांनी आपले व्रत तसेच सुरु ठेवावे.

दोन्ही मध्ये फळ हे सारखेच मिळेल ते तुम्ही केलेल्या भक्ती प्रमाणेच असेल असे माझे मत आहे.

माझ्या कलाइंट्सना बेसिक उपायांत तुम्ही रोज गणेशाला दुर्वा वहा असे सांगतो. 

संकटे आल्यावर संकष्टीचे व्रत करण्यापेक्षा संकटे येणारच नाहीत ह्या साठी तुम्ही रोज दुर्वा वाहिला पाहिजे मी ह्या मताचा आहे.

कारण गणेशाला त्याचा ताप कमी करण्यासाठी दुर्वा वाहण्याची पद्धती आहे. आणि त्याचा ताप तुम्हाला ताप दिल्याशिवाय राहत नसेल कदाचित तर रोज आपल्या लहान मुलाबाळांना आत्तापासून रोज दुर्वा घालायला सांगा आणि तुम्ही सुद्धा वहा.

२ रुपयाचा हा उपाय २ लाखाचे सुख देऊन जातो.

कदाचित तुमची मुले हि मराठी संस्कृतीत शिकत नसतील तर निदान हे आता पासून कराच कारण वैवाहिक सुखात मंगळ करिअर मध्ये मंगळ जास्त दंगल करणार नाही.

तुम्ही म्हणाल कि बाकीचे धर्माचे लोक हे कुठे करतात. त्यांचा मंगळ दंगल करत नाही का

उत्तर- बाकीचे धर्म बायबल आणि कुराणाचा अभ्यास जेव्हढा केलेला असतो तेव्हढा आपल्याला गीतेचा बेसिक अभ्यास सुद्धा नसतो आणि तो आपण पुढे नेतही नाही पुढील चैन साठी.

प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करून संस्कृती पाळून जीवन जगावे नियमात राहावे.

ह्यावर उदाहरण देतो- जर शनिवारी १ ऑगस्ट ला ईद होती त्या दिवशी आपला श्रावण शनिवार होता. त्या दिवशी त्यांनी आपला धर्म पाळला. पण त्या दिवशी आपल्या तरुण पिढीने काय केले असेल श्रावण शनिवारचा एक तरी अध्यतिमीक कार्यक्रम केला असेल का?

ह्यावर विचार करून टिपणी द्या – उत्तर जरूर देईन.

सध्या एव्हढे पुरे….

पुढे अंगारकी संकष्टी आल्यावर एक पोस्ट राहू मंगळ बद्दल जरूर वाचा 

धन्यवाद….!

This Post Has 2 Comments

  1. Usha

    Very good

  2. Yadnesh Ramesh Dalvi

    Very True …. Nice 👍

Leave a Reply