हरतालिका व्रत- २१ ऑगस्ट २०२०

हरतालिका व्रत-२१ ऑगस्ट २०२०

  • पार्वतीने शंकरासाठी केलेले व्रत
  • पतीच्या प्रेमासाठी सौभाग्यवतींनी करायचे व्रत
  • योग्य पती मिळावा म्हणून तरुणींनी करायचे व्रत
  • एक निर्जला व्रत

हरतालिका आणि ज्योतिषीय कनेक्शन- माझे विचार

आजच्या युगातल्या वयात येणाऱ्या तरुण मुलींना कदाचित ह्या व्रताची पॉवर माहिती नसेल म्हणून हे विवेचन करण्याचा घाट घालत आहे.

गेल्या १४ वर्षाच्या ज्योतिष प्रॅक्टिस मध्ये बऱ्याच विवाहितांच्या पत्रिका पाहताना त्यातील ६०% पत्रिका ह्या वैवाहिक सुखात व्यत्ययाच्या आल्या असतील. ह्या विषयाचा अभ्यास हा स्त्रियांच्या मुलींच्या पत्रिकेतून ७ व्या स्थानावरून केला जातो कि मुलींच्या आयुष्यात वैवाहिक सुख किती टक्के आहे. ज्योतिष शास्त्राचे सर्व नियम येथे तंतोतंत बसतात ह्यावर माझे मत ठाम आहे. पण एका ठिकाणी असेही दिसले कि एकाच वेळी एकाच दिवशी दोन मुलींच्या पत्रिका पाहताना एकाला वैवाहिक सुख आहे आणि दुसरीला नाही. 

तेव्हा इथे मला ह्या बाबतीत ज्योतिष नियमांची शंका उद्भवली पण नंतर असे लक्षात आले कि काही व्रते नियम आपल्या परंपरेच्या धर्मातील रीती बरेच जण पाळत नाहीत कारण आपण आता अधुनिक काळात वावरतो अधुनिक विचार घेऊन जगत आहोत.

वैवाहिक सुख मिळविण्यासाठी त्यातलेच हे हरतालिका व्रत जाणून घ्या आणि खास मुलींना आणि स्त्रियांना सुद्धा हे व्रत केल्याने पत्रिकेतील सातव्या स्थानाचा विचार जास्त करावा लागत नाही असे माझे मत आहे.

ह्याचा अर्थ असा सुद्धा नाही कि जे हे व्रत करणार नाहीत त्यांना वैवाहिक सुख मिळणार नाही, चांगला पती मिळणार नाही  पण जर पत्रिकेत सातवे स्थान जरा जरी बिघडलेले असेल तर स्त्रियांनी ह्या व्रताचा जरूर अनुभव घ्यावा. 

शिवा साठी केलेली पार्वतीची तपस्या

भोलेनाथ शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने ह्या व्रताचा आरंभ केला. अन्न पाणी वगैरे चा त्याग करून तिने ह्यासाठी हे व्रत केले कारण तिचे वडील हे तिचा विवाह श्री विष्णू शी लावण्याचा प्रयत्न करत होते मात्र तिने मनोमन शिवाला आपला पती मानले होते.

तृतीया तिथीला आपल्या सखी सोबत ती अरण्यात गेली वाळूचे शिवलिंग बनवून त्यासमोर तप जप करून पूर्ण दिवस उपवास करून साधना केली. ह्या तिच्या व्रताने भगवान बोलेनाथ तिच्यावर प्रसन्न झाले आणि देवीला पत्नी रूपात तिचा स्वीकार केला.

शुभ मुहूर्त

तारीख: हरतालिका व्रत-२१ ऑगस्ट २०२०

पहाटे 05:53:39 ते 08:29:44 पर्यंत

अवधि : 2 तास 36 मिनिटे

प्रदोष काल मुहूर्त : 18:54:04 ते 21:06:06 पर्यंत

हरतालिका व्रत विधी 

विड्याच्या पानावर सुपारी खारीक बदाम एखादे नाणे ठेऊन सुपारीच्या स्वरूपात गणेशाची स्थापना करावी आणि ह्या व्रताचा संकल्प करावा. 

गणपतीला दुर्वा सेंदूर लाल फुल वाहून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 

नंतर वाळूने शिव पिंड बनविण्याची पद्धती आहे पण जर हे जमले नाही तर महादेवाच्या मंदिरात जाऊन वरील प्रमाणे गणेश स्थापना करून शिवाला अभिषेक करून बेलपत्र , शमीपत्र , फुले अर्पित करावीत. 

देवी पार्वतीची सुद्धा पूजा करावी तिला जे जे सौभाग्य शृंगारिक अलंकार अर्पण करता येतील ते ते करावेत.

नंतर नैवेद्य (खास खिरीचा) दाखवून कापूरवडीने आरती करावी.

ह्या व्रतात प्रतोषकाळीं भगवान शिवाचे पूजन अति महत्वाचे असते. पण काही ठिकाणी हे दुपारपर्यंत उरकण्याची पद्धती आहे ..

असो… पण असे करत असाल तर निदान हरितालिका ची कहाणी तरी प्रदोष काळीं वाचून घ्या.

ह्या व्रताचे खास महत्व म्हणजे हे व्रत निर्जल करावे. ( आजारी स्त्रिया, गर्भवती भगिनी ह्यांनी हे व्रत करण्याची आवश्यकता नसते) 

हरतालिका चा अर्थ

हर  + तालिका = हरतालिका 

हर म्हणजे हरण आणि तालिका ह्याचा अर्थ सखी 

पार्वतीची मैत्रीण पार्वतीला तिच्या वडिलांकडून हरण करून जंगलात घेऊन घेईल आणि तिथे जे व्रत केले त्या व्रताला हरतालिका असे नाव पडले असावे.

हरतालिका व्रताची कथा 

लिंग पूर्ण अनुसार हिमालयावर गंगाकिनारी देवी पार्वतीने आपल्या पूर्व जन्मी बाल्यावस्थी अधोमुख होऊन  पालापाचोळा खाऊन शिवाला पती स्वरूप मानून घोर तपस्या करत असताना हिमालयाला दुःख होत होते. ह्या दरम्यान नारदमुनी तेथे आले आणि त्यांनी हिमालयाला पार्वतीच्या विवाहासाठी विष्णू चा प्रस्ताव मांडला. हिमालयाने त्याचा लगेच स्वीकार केला सुद्धा. पण पार्वतीने ह्या प्रस्तावास नकार दिला. नंतर देवी पार्वतीने आपल्या सखीला ती हि तपस्या शिवा ला प्राप्त करण्यासाठी करत आहे मनोमन मी शिवाला आपला पती मनाला आहे असे सांगितले तसे सांगता तिची सखी तिला गपचूप घनदाट अरण्यात घेऊन गेली. आणि मग तिथे पार्वतीने वाळूने शिवलिंग बनवून शिवाची उपासना केली तो दिवस भाद्रपदातील तृतीया तिथीचा दिवस होता. तिथेच भगवान शिव तिच्या ह्या व्रताने प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी स्वरूपात स्वीकार केला.

आणि तेव्हापासून कुवारी मुली आपल्याला मनासारखा पती मिळविण्यासाठी, सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीचे प्रेम मिळविण्यासाठी ह्या व्रतात अन्न , जल , त्याग करून हे व्रत करत आल्या आहेत.

हरितालिका व्रत सुद्धा ह्या दिवशी करण्याची रीती आहे

‘हरितालिका’ नावाशी जुळणारे पण वेगळ्या पद्धतीने विधी करण्यात येणारे ‘हरिकाली’ व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं. या हरिकाली देवीमागे एक कथा आहे, असं म्हणतात. दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं. फक्त स्त्रियाच नाही पुरुष देखील तिची पूजा करतात. यात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन केले जाते. त्यानंतर पहाट उजाडायच्या आत तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे.

कुवारी मुलींनी आणि सौभाग्यवतींनी हे व्रत एकदा केले कि प्रत्येक वर्षी करावेच लागते ह्याची नोंद ठेवावी तेव्हा सुरु करताना दृढनिश्चयी  असण्याची नितांत गरज आहे. 

अगदीच जर उपवास सहन न करता आला तर शिव-पार्वतीची पूजा केल्यावर नारळ पाणी पिण्याची सुद्धा पद्धती आहे.

पण काही ठिकाणी ह्या व्रतात सौभाग्यवतीच्या वडिलांनी आणून देणारे शेळ केळं स्वीकार करण्याची पद्धती आहे. 

कुवारी मुलींच्या बाबतीत त्याच्या वडिलांनी हा भर स्वीकारावा.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    It is very beautiful information

Leave a Reply