You are currently viewing रक्षाबंधन – ३ ऑगस्ट २०२०

रक्षाबंधन विशेष माहिती

रक्षाबंधन -ह्या दिवशी लक्ष्मी ने बली ला आपला भाऊ मानले होते. आणि वामन रुपी विष्णू त्याच्याकडून पुन्हा मागून घेतला होता. आपणास माहीतच असेल कि ३ पावले जमीन मागितली होती बली राजाकडे वामन अवतारात आणि तिसरे पाऊल बली च्या डोक्यावर विष्णूने ठेवल्यानंतर विष्णू ने ह्यावर प्रसन्न होऊन मी पाताळलोकी राहीन असे वचन दिले होते.

नंतर ह्याच रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मी ने बली कडून आपला पती मिळविला होता आणि फक्त तो ४ महिने पाताळलोकी राहून माझ्याकडे येईल असे वचन घेतले होते. ते नाते लक्ष्मी आणि बली चे बहीण भावाचे झाले आणि बली ने बहिणी साठी श्री हरी चा त्याग केला होता. चातुर्मास सोडून. (म्हणून फक्त चातुर्मासात श्री हरी पाताळ लोकी वात्सव्य करतात) 

राक्षसां समोर इंद्रासनाचे (स्वर्गाचे) रक्षण होत नव्हते म्हणून ह्याच दिवशी इंद्रा च्या पत्नी ने सर्व देवतांना रक्षा बांधून राक्षसांबरोबर लढण्यास आश्वस्त केले होते बहिणीचा आशीर्वाद दिला होता.

मान्यतेनुसार श्री कृष्णाला शिशुपालचे मुंडके उडविताना बोटाला जखम झाली आणि तेव्हा द्रौपदी ने त्या जखमेवर आपले वस्त्र फाडून लावले होते. त्याच वेळी कृष्णाने द्रौपदी ला आपली बहीण घोषित केले आणि ऐन वेळी ती जेव्हा कौरवां मध्ये असुरक्षित होती तेव्हा श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले होते. 

तेव्हापासून हि परंपरा सुरु झाली कि भावाच्या प्रत्येक संघर्षात त्याच्या लढाई साठी, त्याच्या विजयासाठी बहिणीने त्याच्या मनगटावर रक्षा सूत बांधावे आणि त्यास विजयाचा टिळा लावावा.

रक्षाबंधनात बहिणीने भावांच्या रक्षा हेतू विजयी टिळा बनविण्यासाठी

ह्या दिवशी शुभ मुहूर्त दिल्याप्रमाणे बहिणींनी आरतीच्या ताटात विजय तिलक बनविण्यासाठी चंदन, अक्षत, दही , आणि तुपाचा दिवा , राखी सजवून ठेवावी. 

हे सजविलेले ताट आधी देवासमोर ठेऊन प्रार्थना करावी आणि देवाला आरती दाखवावी, ह्यानंतर भावाला पाटावर बसवावे त्याचे मुख पूर्व दिशेला असावे.

प्रथम टिळा आणि त्यावर अक्षत लावावे नंतर राखी बांधावी आणि आरती ओवाळावी. शेवटी राखी उजव्या हातात बांधून भावाचे तोंड गोड करावे (मिष्टान्न भरवावे जे उपलभ असेल) – ह्यावेळी साधा गूळ साखर सुद्धा चालेल मिठाई असलीच पाहिजे असे नव्हे.

नंतर दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.

रक्षा बंधन आणि मुहूर्त विचार

ह्या दिवशी भद्रा काल मध्ये रक्षाबंधन करीत नाहीत. अशी मान्यता आहे कि रावणाने आपल्या बहिणीकडून भद्र काळात राखी बांधून घेतली होती आणि एका वर्षाच्या आत तो श्री रामाकडून मारला गेला.

दुसरे असे कि भद्रा हि शनी ची बहीण आहे. आणि ब्रह्म देवांनी तिला शाप दिला होता कि तुझ्या कालात जो कोणी शुभ कार्य करेल त्या कार्याचा नाश होईल. म्हणून कोणतेही शुभ कार्य भद्रा मध्ये करत नाहीत.

तसाच प्रकार राहू कालात सुद्धा असतो. म्हणून राहू आणि भद्रा काल शुभ कार्यासाठी धरू नये.

दिनांक २ ऑगस्ट रात्री ९:२८ ला पूर्णिमा आहे ती ३ ऑगस्ट च्या रात्री ९:२८ पर्यंत असेल. 

३ ऑगस्ट ला ह्या दिवशी भद्रा हि रात्री ९:२७ ला संपेल त्यानंतर रक्षाबंधन करण्यास हरकत नाही.

ह्या दिवशीच्या शुभअशुभ चौघडिया 

  • ९:३० ते ११:०७ = शुभ 
  • ११:०७ ते १२:४४ =रोग 
  • दुपारी १२:४४ ते २:२१ दुपारी =उद्वेग 
  • दुपारी २:२१ ते ३:५८ =चल 
  • दुपारी ३:५८ ते ५:३५ =लाभ 
  • सायंकाळी ५:३५ ते ७:१२ =अमृत 
  • सायंकाळी ७:१२ ते ८:३५ =चल 
  • रात्री ८:३५ ते ९:५८ =रोग 

राहू काल सोमवार असल्याने सकाळी ७:५३ ते सकाळी ९:३० पर्यंत असेल. 

वरील शुभ चौघडिया ह्या — अमृत , लाभ , शुभ , चल ह्या प्रमाणे क्रमवार असतील 

वरील अशुभ चौघडिया ह्या — उद्वेग , रोग , काल  आहेत ह्यात रक्षाबंधन करू नये. 

वरील सर्व वेळा मुंबई च्या आहेत. 

आपण ज्या शहरात आहात त्याच्या शुभ चौघडिया गूगल वर सर्च करू शकता. किंवा एखाद्या फ्री ऍप्स वर चेक करू शकता.

आणि जरी आपणास जमले नाही तर ह्याच वेळा घ्या पण त्याचा प्रत्येकाचा मधला २० मिनिटाचा वेळ घ्या.

रक्षाबंधन विशेष टीप खास बहिणीसाठी

सर्वात अगोदर घरातील श्री कृष्णाला राखी बांधण्याची पद्धती आहे. आणि इतर देवांना सुद्धा हा मान द्यावा असे माझे मत आहे.

नंतर बहिणीने भावाची आरती ओवाळून टिळा करताना आपल्या उजव्या अंगठ्याचा उपयोग करावा आणि टिळा वर घेऊन जावा. 

हे विजय टिळ्याचे प्रतीक आहे.

बहिणीने सुद्धा भावाला पाटावर बसविताना त्याच्या समोर स्वतः ला सुद्धा एक पाट घ्यावा आणि बसून आरती ओवाळून राखी बांधावी. त्यावेळी भावाचे मुख पूर्वेला आणि बहिणीचे मुख पश्चिमेला असावे.

नंतर घरातील दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.  ह्या परिस्थितीत जेव्हढे जमेल तेव्हढे करण्याचा प्रयत्न करा.

आपणा सर्वाना रक्षाबंधन आणि नारळी पूर्णिमेच्या शुभेच्छा

लेख आवडल्यास शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स खाली बॉक्स मध्ये द्या.

धन्यवाद….!

This Post Has 2 Comments

  1. Prajakta Kamble

    खूप छान माहिती

  2. Devendra Kunkerkar

    थँक्स . आपला असाच रिप्लाय पुढे सुरु ठेवा .

Leave a Reply