You are currently viewing शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना

शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना | Shani Kumbh Pravesh Nakshtra Wise Time Table

शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना

वरील दिलेल्या इमेज मध्ये शनी कुंभ राशीत असताना तो कुंभ राशीतील प्रत्येक नक्षत्रात कसा आणि केव्हा प्रवेश करेल हे दाखविले आहे.
कुंभ राशीत ३ नक्षत्र धनिष्ठा, शततारका, आणि पूर्वाभाद्रपदा. त्यातील धनिष्ठा नक्षत्रातील २ चरणे हि मकर राशीत असतात आणि पुढील २ नक्षत्रे हि कुंभ राशीत असतात. शततारका चारही चरणे हि कुंभ राशीतच असतात आणि पूर्वाभाद्रपदा ची ३ चरणे हि कुंभ राशीत आणि शेवटचे चरण हे मीन राशीत असते.

 • १७/१/२०२३ ला जेव्हा शनी कुंभ राशीत जात असेल तेव्हा तो सायंकाळी १७:५५ मिनिटांनी ० डिग्री पासून धनिष्ठाच्या ३ ऱ्या चरणात प्रवेश करेल आणि १५/३/२०२३ ला रात्री १:२५ वाजेपर्यंत तो तेथे राहील. तेव्हा तो ६:४० डिग्री आला असेल. नंतर तो शततारका नक्षत्रात प्रवेश करेल.
 • १५/३/२०२३ ला नंतर शनी शततारका नक्षत्री ६:४० डिग्री पासून पुढे १:२५ मिनिटांनी आपला प्रवास सुरु करेल. १७/६/२०२३ २२:५६ मिनिट ला तो जेव्हा १३:०१:४५ डिग्री ला येईल तेव्हा तो मागे मागे जाण्यास सुरुवात करेल. म्हणजेच तो वक्री होणार आहे.
 • १७/६/२०२३ २२:५६ मिनिट पासून तो १३:०१:४५ डिग्री पासून वक्री होत होत ६:४० डिग्री पर्यंत उलट प्रवास करत करत १५/१०/२०२३ रात्री १२ वाजता शततारका नक्षत्रातून बाहेर पडेल आणि तो पुन्हा धनिष्ठा नक्षत्रात जाईल.
 • आता तो धनिष्ठा नक्षत्रात १५/१०/२०२३ ला रात्री १२ वाजता प्रवेश करेल त्याचा प्रवास हा उलटच सुरु असताना ४/११/२०२३ दुपारी १२:३१ ला तो ६:१९:३२ डिग्री ला येईल. आणि तेथून तो मार्गी असेल म्हणजे पुन्हा सरळ चालायला घेईल.
 • ४/११/२०२३ दुपारी १२:३१ पासून तो पुन्हा ६:१९:३२ डिग्री वरून मार्गी प्रवास करत करत २४/११/२०२३ ला सकाळी ८:५८ ला ६:४० डिग्री ला येईल आणि पुन्हा धनिष्ठा नक्षत्र सोडेल. आणि शततारका नक्षत्रात प्रवेश करेल.
 • २४/११/२०२३ का सकाळी ८:५८ ला ६:४० डिग्री पासून शततारका नक्षत्रात त्याचा प्रवास सुरु होईल आणि ६/४/२०२४ दुपारी २ वाजता तो २० डिग्री ला आला कि शततारका नक्षत्रातून बाहेर पडेल. आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल.
 • ६/४/२०२४ दुपारी २ वाजता २० डिग्री पासून त्याचा प्रवास पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात सुरु होईल आणि ३०/६/२०२४ रात्री ००:३५ ला २५:१४ डिग्री पर्यंत तो सरळ सरळ गतीने (मार्गी) असेल. नंतर तो ह्या डिग्री पासून उलट प्रवास सुरु करेल
 • ३०/६/२०२४ रात्री ००:३५ ला २५:१४ डिग्री पासून पूर्वभाद्रपदा नक्षत्रात त्याचे वक्री भ्रमण सुरु होईल आणि मागे मागे सरकत तो ३/१०/२०२४ ला दुपारी १५:०५ वाजता २० डिग्री पर्यंत येईल आणि तो पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून उलट फिरत फिरत पुन्हा शततारका नक्षत्रात २० डिग्री पासून प्रवेश करेल.
 • ३/१०/२०२४ ला २० डिग्री पासून शततारका नक्षत्रात त्याचा प्रवास उलट (वक्री) होत होत १५/११/२०२४ १९:५१ मिनिटापर्यंत १८:२९:२१ डिग्री ला येईल तेव्हा तो पुन्हा सरळ सरळ मार्गी होईल.
 • १५/११/२०२४ १९:५१ मिनिटापर्यंत १८:२९:२१ डिग्री पासून शततारका नक्षत्रात त्याचा प्रवास मार्गी गतीने सुरु होत होत तो २७/१२/२०२४ ला २०:०९ मिनिटाला आपल्या २० डिग्री पूर्ण करेल. आणि नंतर तो पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात पुन्हा जाईल.
 • २७/१२/२०२४ ला २०:०९ मिनिटाला आपल्या २० डिग्री पासून शनी पुन्हा पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात येत आहे आणि तो २९/३/२०२५ रोजी २१:३० वाजता आपल्या कुंभ राशीच्या ३० डिग्री पूर्ण करेल आणि तो कुंभ राशीतून बाहेर पडेलनंतर तो मीन राशीत जाईल*

नोट- हा विषय जरी ज्योतिषीय असला तरी आपणा सर्वाना शनी ची नक्षत्र भ्रमण अवस्था कशी असेल हे समजण्यासाठी हा विषय येथे दिला आहे.

कारण पुढे ह्याच अवस्था ज्या शनी च्या प्रत्येक नक्षत्राच्या आहेत त्यात तो मागे मागे चालताना आणि पुढे पुढे सरकताना प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी काय काय देत आहे त्याचा विचार मांडताना ते आपणास उत्तम समजावे तारखेप्रमाणे हा त्या मागील हेतू समजावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply